ETV Bharat / city

Mumbai High Court : मलिक आणि देशमुखांना उच्च न्यायालयाचा झटका; विधानपरिषदेसाठी मतदान करण्याची परवानगी नाकारली - विधान परिषद निवडणूक अनिल देशमुख याचिका

नवाब मलिक आणि माजी मंत्री अनिल देशमुख यांनी विधानपरिषदेत मतदार करण्याची परवानगी द्यावी, अशी याचिका केली होती. मात्र उच्च न्यायालयाने ही याचिका फेटाळली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीला मोठा झटका मानला जातो आहे.

Mumbai High Court
Mumbai High Court
author img

By

Published : Jun 17, 2022, 2:46 PM IST

Updated : Jun 17, 2022, 5:12 PM IST

मुंबई - महाविकास आघाडीला मुंबई उच्च न्यायालयाचा पुन्हा झटका मिळाला आहे. नवाब मलिक आणि अनिल देशमुख यांनी दाखल केलेल्या विधानपरिषद निवडणुकीत मतदानाच्या परवानगी करिता केलेला अर्ज मुंबई उच्च न्यायालयाने आज फेटाळून लावला आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे टेन्शन वाढले आहे.

राज्यसभेनंतर आता विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी राजकारण तापताना दिसत आहे. विधानपरिषदेच्या पार्श्वभूमीवर पुन्हा एकदा या दोन्ही नेत्यांनी मतदानाची परवानगी मिळण्यासाठी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. गुरुवारी झालेल्या सुनावणीवेळी देशमुख आणि मलिकांचे वकील आणि ईडीचे वकील यांच्यात जोरदार खडाजंगी पाहायला मिळाली. मात्र, उच्च न्यायालयाने शुक्रवारी या प्रकरणाचा निकाल लावत अनिल देशमुख आणि नवाब मलिक यांना विधान परिषदेच्या निवडणुकीसाठी मतदानाची परवानगी नाकारली.

केवळ मतदानाच्या दिवशी मत टाकण्यासाठी पोलीस सुरक्षा व्यवस्थेत पाठवण्याचे निर्देश द्यावेत एवढीच मर्यादित विनंती असल्याचे मलिक आणि देशमुखांच्या वकिलांनी न्यायालयाला सांगितले. तर लोकप्रतिनिधी कायद्याच्या कलम 62 (5) अन्वये कोणत्याही प्रकारच्या कैद्याला कोणत्याही निवडणुकीत मतदान करण्याचा अधिकारच नाही. मग न्यायालयाने विशेषाधिकारात परवानगी देण्याचा प्रश्नच येत नाही, असा युक्तीवाद ईडीतर्फे अतिरिक्त महान्यायअभिकर्ता अनिल सिंग यांनी केला. दोन्ही पक्षांच्या बाजू ऐकल्यानंतर गुरुवारी न्यायालयाने हा निर्णय राखून ठेवला होता. तर शुक्रवारी दुपारी या याचिकेवर झालेल्या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने आपला निर्णय दिला आहे.

दरम्यान विधानपरिषदेवर निवडून येण्यासाठी पहिल्या पसंतीची 27 मतांची आवश्यकता आहे. राज्यसभेप्रमाणे मतदान झाले तर भाजपकडे 123 संख्याबळ आहे. त्यामुळे भाजपच्या 4 जागा सहज निवडून येऊ शकतात. पाचव्या उमेदवारासाठी भाजपला 12 मते कमी पडतात. तर दुसरीकडे महाविकास आघाडीकडे 161 संख्याबळ आहे. त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीचे प्रत्येकी दोन आमदार विधानपरिषदेत जातील. तसेच मित्र पक्ष आणि अपक्षांच्या मदतीने काँग्रेसच्या वाट्यालाही दोन जागा येऊ शकतात.

विधानसभेतील संख्याबळ

  • शिवसेना -54
  • राष्ट्रवादी-53
  • काँग्रेसचे -44
  • बहुजन विकास आघाडी - 3
  • समाजवादी पार्टी - 2
  • एमआयएम - 2
  • प्रहार जनशक्ती पक्ष - 2
  • कम्युनिस्ट पक्ष - 1
  • स्वाभिमानी शेतकरी संघटना - 1
  • मनसे - 1
  • राष्ट्रीय समाज पक्ष - 1
  • क्रांतीकारी शेतकरी पक्ष - 1
  • जनसुराज्य शक्ती - 1
  • शेतकरी कामगार पक्ष - 1
  • अपक्ष -13

हेही वाचा - SSC Result Declared : दहावीचा निकाल जाहीर; यंदाही मुलींची बाजी, तर 'या' विभागाचा निकाल सर्वाधिक

Last Updated : Jun 17, 2022, 5:12 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.