ETV Bharat / city

ठाकरे सरकारचे कपडे अंडरवर्ल्डमध्ये कसे भिजलेत? हे फडणीसांनी दाखवून दिलं - अशिष शेलार - आशिष शेलारांची मलिकांवर टीका

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर टीकास्त्र सोडले. आशिष शेलार म्हणाले की, फडणवीसांनी मलिकांवर चार आरोप केले आहेत. त्यापैकी तीन आरोप मलिक यांनी मान्य केले असल्याचा दावा भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केला.

ashish shelar
ashish shelar
author img

By

Published : Nov 9, 2021, 4:45 PM IST

Updated : Nov 9, 2021, 6:42 PM IST

मुंबई - राज्याचे विधानसभा विरोधी पक्षनेते व माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी नवाब मालिकांवर केलेल्या आरोपावर मलिक यांनी पत्रकार परिषदेत थातुरमातुर उत्तर देऊन विषय संपवण्याचा प्रयत्न केला. पण हा विषय कितीही प्रयत्न केला तरी संपणार नाही सत्य बाहेरच येईल व पुराव्यानिशी चौकशी केली जाईल असे भाजप नेते व आमदार आशिष शेलार यांनी म्हटले आहे.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्रकार परिषदेनंतर भाजप नेते आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेत राष्ट्रवादीचे नेते व अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांच्यावर टीकास्त्र सोडले. आशिष शेलार म्हणाले की, फडणवीसांनी मलिकांवर चार आरोप केले आहेत. त्यापैकी तीन आरोप मलिक यांनी मान्य केले असल्याचा दावा भाजप नेते आमदार आशिष शेलार यांनी केला. मुख्यमंत्र्यांनी आता या प्रकरणात स्वत:च एफआयआर दाखल करावा आणि चौकशी करावी, अशी मागणी आशिष शेलार यांनी केली.

राज्यातल्या ठाकरे सरकारचे कपडे कसे अंडरवर्ल्डमध्ये भिजलेले आहेत हे फडणवीस यांनी उघड केले असल्याचे शेलार यांनी म्हटले. फडणवीस यांनी केलेले आरोप मलिक यांनी मान्य केले असल्याचा दावा शेलार यांनी केला. दीडपट कमी किंमतीत जागा मिळवली हे नवाब मलिक यांनी मान्य केले असल्याचे शेलार यांनी म्हटले. आम्हाला 25 रु. स्क्वेअर फूट मध्ये जमीन घ्यावी लागली असे नवाब मलिक सांगत आहेत, असेही शेलार यांनी म्हटले. संपूर्ण इमारत भाडयाने कमी किंमतीत कशी मिळते, नवाब मलिक सामान्य जनतेला मूर्ख समजतात का, असा सवालही शेलार यांनी केला.

हे ही वाचा - उद्या सकाळी दहा वाजता फडणवीसांचं अंडरवर्ल्डशी असलेलं नात उघड करणार - नवाब मलिक

राज्यातील ठाकरे सरकारचे कपडे अंडरवर्ल्ड मध्ये कसे भिजले आहेत हे फडणवीस जी यांनी दाखवले आहे. सरदार शहावली खान या 93 बॉम्ब प्रकरणी आरोपीशी नवाब मलिक यांचे आर्थिक व्यवहार आहेत. मोहम्मद सलिम यांचे आर्थिक व्यवहार नवाब मलिक यांच्याशी आहेत. कवडी मोलाने जमिनीची मालकी मिळवली. नवाब मलिक सरदार शहावली खान आरोपांवर कबुल करतात, असे शेलार म्हणाले.

अंडरवर्ल्डसोबत असलेले संबंध झाकण्यासाठी चांडाळचौकटी काम करत असून मुंबई 1993 बॉम्ब प्रकरणी आरोपीसोबत मलिक यांचे संबंध असल्याचे शेलार यांनी म्हटले. राज्याचे मंत्री आरोपांची कबुली देत आहेत. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी स्वत: एफआयर दाखल करून चौकशी करावी अशी मागणी शेलार यांनी केली.

हे ही वाचा - नवाब मलिकांनी अंडरवर्ल्डशी संबंध असलेल्या व्यक्तींकडून जमीन विकत घेतली; देवेंद्र फडणवीसांचा आरोप

फडणवीस यांनी मलिकांवर केलेले आरोप -

नवाब मलिक यांनी कुर्ल्यातील एलबीएस रोड या मोक्याच्या ठिकाणावरील तीन एकर जमीन फक्त तीस लाखात कशी घेतली? ज्या लोकांकडून मलिकांच्या कंपनीने जमीन घेतली ते 1993 च्या बॉम्बस्फोटातील आरोपी आहेत. गुन्हेगाराकडून मलिकांनी जमीन कशी विकत घेतली, असा प्रश्न विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केला. कुर्ल्यातील एलबीएस रोडवरील जागेशिवाय मलिकांनी अन्य चार ठिकाणीही मलिकांनी स्वस्तात जमीन खरेदी केली आहे. या जमीन व्यवहारात अंडरवर्ल्डचा हात आहे. याचे सर्व पुरावे माझ्याकडे आहेत असे फडणवीस यांनी म्हटले.

पोलिसांमार्फत चौकशी करावी -

आमदार अँड आशिष शेलार यांनी दुपारी प्रदेश कार्यालयात पत्रकार परिषद घेऊन संवाद साधला. यावेळी ते म्हणाले की, राज्यातल्या ठाकरे सरकारचे कपडे कसे अंडरवर्ल्डमध्ये भिजलेले आहेत हे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी उघड केले आहेत. त्यामुळे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी याची दखल घेऊन पोलीसांमार्फत चौकशी करावी अशी मागणी आमदार अँड आशिष शेलार यांनी केली.

देवेंद्र फडणवीस यांचे ४ आरोप -

देवेंद्र फडणवीस यांनी एकुण चार आरोप केले. त्यापैकी पहिला सरदार शहावली हा मुंबईच्या ९३ च्या बाँम्बस्फोट मधील शिक्षापात्र आरोपी असून त्याच्याशी
नवाब मलिक यांचे आर्थिक व्यवहार झाले.

दुसरा महमद सलिम पटेल हा दाऊदची बहिण हसीना पारकरचा ड्रायव्हर व फ्रंट मँन, पॉवर आँफ अटर्नी होल्डर आणि अटक झालेला आरोपी यांच्या मार्फत व्यवहार करुन फायदा करुन दिला.

तीसरा आरोप
मुंबई बाँम्ब स्फोटातील आरोपीं जे टाडा खाली अटक झाले त्या आरोपींची जी जमीन सील होऊन सरकार जमा होईल म्हणून त्यांना मदत करण्यासाठी त्यांची जमीन स्वतःकडे वळवली, घेतल्याचे दाखवली.

आणि चौथा आरोपींची जमीन कवडीमोल किंमतीने घेऊन त्यांचा फायदा केला. यातील तीन आरोप नवाब मलिक यांनी कबूल केले आणि हसीना पारकर या विषयात बोलण्याची हिंम्मत नसल्याने त्याबद्दल मौन राखून तो आरोप मौन धरुन कबूल केला. म्हणजे नवाब मलिक यांची पत्रकार परिषदेत म्हणजे.. कबूल.. कबूल.. कबूल.. असा कबुलीनामा होता, अशी टीका आमदार आशिष शेलार यांनी केली आहे.

हे कसले नवाबी भाडेकरू -

नवाब मलिक यांनी या आरोपांच्या समर्थ जे सांगितले त्यामध्ये ते म्हणतात की त्या जागेत आमची दुकाने होती. त्यासह संपूर्ण कंम्पाऊंची मालकी मिळवली. तेही 30 लाख ठरवून 20 लाख एवढ्या कवडीमोल किमंतीत मालकी मिळवली. मुंबईतील हे कसले "नवाबी भाडेकरु ?" ज्यांना सरकारी दरापेक्षा कमी दरात जागेची मालकी मालकाने दिली. मुंबईतील भाडेकरुंचा प्रश्न एवढ्या सहजपणे सुटत असेल तर मग मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जीआर काढून वर्षानुवर्षे न्यायालयात लढणाऱ्या मुंबईतील भाडेकरुंना हाच नियम लावावा, अशी उपरोधिक मागणी ही आमदार आशिष शेलार यांनी केली.

मुंबईतील खाजगी जागेवरील झोपडपट्टीची मालकी देण्यासाठी आज सुध्दा सरकार रेडीरेकनरच्या 25% रक्कम जमा करुन घेते मग नवाब मलिक यांना एवढी जागा कशी काय हस्तांतरीत करुन मिळाली असा सवाल करीत आमदार अँड आशिष शेलार यांनी या व्यवहारातील सांगितल्या जाणाऱ्या हास्यास्पद बाबी समोर आणल्या. या व्यवहारात सरदार शहावली याचे वडील वाँचमेन असल्याने त्यानी आपले नाव जागेला चढवले म्हणून त्याला पैसै दिले हे मग हा मुंबईतील वाचमनला नवा नवाबी धंदा सांगताय का? असा सवाल करीत आमदार अँड आशिष शेलार यांनी नवाब मलिक सांगत असलेल्या नवाबी दर, नवाबी धंदे, नवाबी व्यवहार, नवाबी भाडेकरु, नवाबी मालक याची खिल्ली उडवली. तसेच हा विषय एवढा सरळ नसून मुंबईला 1993 ला बाँम्ब स्फोट झाले आणि त्यातील दोषी आरोपींना मदत करण्यासाठी 2005 ला हे व्यवहार झालेले असल्याने हा विषय गंभीर असल्याने मुख्यमंत्र्यांनी एफआयआर दाखल करुन चौकशी कराली अशी मागणी सुध्दा आमदार अँड आशिष शेलार यांनी केली

Last Updated : Nov 9, 2021, 6:42 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.