ETV Bharat / city

Narendra Modi Received Lata Mangeshkar Award : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दिला लतादीदींच्या आठवणींना उजाळा, म्हणाले... - पंतप्रधान मोदी लता मंगेशकर पुरस्कार भाषण

लता मंगेशकर यांच्या ( First Lata Mangeshkar Award ) स्मृतीप्रीत्यर्थ देण्यात येणारा पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांना आज प्रदान करण्यात आला आहे. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ( PM Modi Speech In Lata Mangeshkar Award Program ) 'मी हा पुरस्कार देशवासीयांना समर्पित करतो, अशी प्रतिक्रिया दिली.

Narendra Modi In Mumbai
Narendra Modi In Mumbai
author img

By

Published : Apr 24, 2022, 7:29 PM IST

Updated : Apr 24, 2022, 7:41 PM IST

मुंबई - गानकोकिळा लता मंगेशकर यांच्या ( First Lata Mangeshkar Award ) स्मृतीप्रीत्यर्थ देण्यात येणारा पहिला पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Narendra Modi ) यांना आज प्रदान करण्यात आला आहे. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी ( PM Modi Speech In Lata Mangeshkar Award Program ) यांनी म्हटले की, मी हा पुरस्कार देशवासीयांना समर्पित करतो. लतादीदी यांचे कार्यदेखील देशवासियांसाठी समर्पित होते. त्यामुळे त्यांच्या नावाने मिळालेला पुरस्कार हा मी देशाला समर्पित करत आहे. आपल्याला संगीताची शक्ती लतादीदीच्या माध्यमातून बघायला मिळाली, असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले.

काय म्हणाले नरेंद्र मोदी? - पुरस्कार स्वीकारल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, संगीतासारख्या गहन विषयाचा मी जाणकार नाही. मात्र, सांस्कृतिक दृष्ट्या संगीत ही साधना आणि भावना आहे असं मला वाटतं. अव्यक्तला व्यक्त करतात ते शब्द. ऊर्जेत चेतनेचा संचार करतो तो नाद आणि चेतनेत भाव आणि भावना भरते ते संगीत. तुम्ही निस्पृह बसले आहात, पण संगीताचा एक स्वर तुमच्या डोळ्यातून अश्रू बाहेर काढतो. संगीताचा स्वर तुम्हाला वैराग्याचा बोध करू शकतो. संगीताने जीवनात वीररस भरतो. संगीत मातृत्व आणि ममतेचा अनुबोध करून देतो. संगीत राष्ट्रभक्ती आणि कर्तव्य बोधाच्या शिखरावर पोहोचवतो. संगीताच्या या सामर्थ्याला आपण लता मंगेशकरांच्या रूपामुळे साक्षात पाहिलं आहे. त्यांचं दर्शन करण्याचा अनुभव मिळाला आहे. मंगेशकर कुटुंबाच्या प्रत्येक पिढीने या यज्ञात आहुती दिली असल्याचे ते म्हणाले.

पंतप्रधान नरेंद्र मोदी लतादीदींच्या आठवणींनी भावुक झाले. ते म्हणाले, मोठी बहीण म्हणून लतादीदींनी खूप प्रेम दिलं. यापेक्षा जीवनाचं सार्थक काय असेल. जेव्हा रक्षाबंधन येईल तेव्हा दीदी नसेल. मी पुरस्कार घेत नाही, पण बहिणीच्या नावाने पुरस्कार मिळतो. त्यामुळे मी आलो. मंगेशकर कुटुंबावर माझ्यावर हक्क आहे. आदिनाथचा मेसेज आला. तेव्हा मी किती बिझी आहे हे पाहिलं नाही. म्हटलं होकार द्या. मला नकार देणं शक्य नाही. मी हा पुरस्कार जनतेला अर्पित करतो. लतादीदी जनतेच्या दीदी होत्या. त्यामुळे हा पुरस्कारही जनतेला अर्पित करतो. मी विचार करत होतो की, दीदीशी माझं नातं कधीपासून किती जुनं आहे. कदाचित चार साडेचार दशक झाले असतील. सुधीर फडके यांनी माझा परिचय करून दिला होता. तेव्हापासून या कुटुंबासोबत अपार स्नेह अगणित घटना माझ्या जीवनाचा भाग बनल्या. माझ्यासाठी लतादीदी सूर साम्राज्ञीसह माझी मोठी बहीण होती. त्याचा मला अभिमान वाटतो, असं त्यांनी आवर्जुन नमूद केलं.

कार्यक्रमाला यांची उपस्थिती - मुंबईतील माटुंगा येथील षण्मुखानंद नाट्यगृहात आज सायंकाळी मास्टर दिनानाथ मंगेशकर स्मृती सोहळा संपन्न झाला. या सोहळ्यात पहिला लता मंगेशकर पुरस्काराचे वितरण करण्यात आले. पहिला लता मंगेशकर पुरस्कार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देण्यात आला. या सोहळ्यासाठी पंतप्रधान मोदी आज रविवारी मुंबईत दाखल झाले. तसेच या कार्यक्रमाला राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, मंत्री सुभाष देसाई, मंगेशकर कुटुंबीय आणि कलाक्षेत्रातील अनेक दिग्गज मंडळी उपस्थित होती. या कार्यक्रमाला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे उपस्थित नव्हते. मात्र, याच वेळेत मुख्यमंत्र्यांनी ज्येष्ठ महिला शिवसैनिक चंद्रभागा शिंदे यांची भेट घेण्यासाठी भोईवाडा परळ इथल्या दाभोळकर वाडी येथे हजेरी लावली. त्यामुळे भाजप आणि शिवसेनेत ताणल्या गेलेल्या संबंधाची प्रचिती आली.

११ एप्रिल रोजी या पुरस्काराची घोषणा - ११ एप्रिल रोजी या पुरस्काराची घोषणा करण्यात आली होती. त्यानंतर मास्टर दीनानाथ मंगेशकर स्मृती प्रतिष्ठान चॅरिटेबल ट्रस्टच्यावतीने पीएम मोदींना पहिला पुरस्कार जाहीर करण्यात आला. ज्यांनी आपल्या देशासाठी, तेथील लोकांसाठी आणि आपल्या समाजासाठी एक अग्रगण्य, तेजस्वी आणि अनुकरणीय योगदान दिले आहे, अशा व्यक्तींना दरवर्षी हा पुरस्कार देण्यात येणार असल्याचे ट्रस्टच्यावतीने सांगण्यात आले.

हेही वाचा - Ajit Pawar : भान ठेवा, उचकवण्याचं काम करू नका : अजितदादांनी टोचले राणांचे कान

Last Updated : Apr 24, 2022, 7:41 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.