ETV Bharat / city

नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या टीमकडून प्रभाकर साईलची 11 तासांहून अधिक चौकशी

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाकर साईल आणि त्यांचे वकील तुषाल खांद्रे सकाळी 11.55 वाजता सीआरपीएफ कॅम्पमध्ये दक्षता पथकात पोहोचले होते. रात्री उशिरा 11.25 वाजेपर्यंत प्रभाकर साईलची चौकशी सुरू होती. सोमवारी प्रभाकरची 10 तासांहून अधिक वेळ चौकशी करण्यात आली.

प्रभाकर साईल
प्रभाकर साईल
author img

By

Published : Nov 10, 2021, 1:16 PM IST

Updated : Nov 10, 2021, 1:27 PM IST

मुंबई - नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोच्या दक्षता पथकाने मंगळवारी प्रभाकर साईल 11 तासांहून अधिक वेळ चौकशी केली. प्रभाकर साईल हा मुंबईतील ड्रग्ज प्रकरणातील साक्षीदार केपी गोसावी याचा बॉडीगार्ड असल्याचे सांगितले जाते. या प्रकरणात यापूर्वी अटक करण्यात आलेला शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला लाच मागितल्याप्रकरणी प्रभाकरची चौकशी करण्यात आली आहे.

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, प्रभाकर साईल आणि त्यांचे वकील तुषाल खांद्रे सकाळी 11.55 वाजता सीआरपीएफ कॅम्पमध्ये दक्षता पथकात पोहोचले होते. रात्री उशिरा 11.25 वाजेपर्यंत प्रभाकर साईलची चौकशी सुरू होती. सोमवारी प्रभाकरची 10 तासांहून अधिक वेळ चौकशी करण्यात आली. मंगळवारीही दक्षता पथकाने प्रभाकरवर प्रश्नांचा भडिमार केला. प्रभाकर साईलची 11 नोव्हेंबरला पुन्हा चौकशी होणार असल्याची माहिती साईलचे वकील हेमंत इंगळे यांनी दिली आहे.

प्रभाकर साईलची 11 नोव्हेंबरला पुन्हा चौकशी

हेही वाचा-'उनकी नींद खो गई है, अब चैन खोने का वक्त आ गया है'; नवाब मलिक यांचे सूचक ट्विट

प्रभाकर साईलचा हा आहे आरोप-

तपास यंत्रणेने गुरुवारी प्रभाकर साईलला चौकशीसाठी बोलावले आहे. दक्षता पथकाचे नेतृत्व एनसीबीचे उपमहासंचालक ज्ञानेश्वर सिंह करत आहेत. क्रूझ ड्रग्ज प्रकरणामध्ये अटक करण्यात आलेल्या आर्यन खानच्या सुटकेच्या बदल्यात 25 कोटी रुपयांचे व्यवहार झाल्याचे प्रभाकर साईल यांनी प्रतिज्ञापत्रात सांगितले होते. या डीलमधून मिळालेले आठ कोटी रुपये एनसीबीचे अधिकारी समीर वानखेडे यांना देण्यात येतील, असे गोसावी यांनी सांगितल्याचा दावा साईलने केला होता. प्रभाकर साईलच्या या आरोपांनंतर एनसीबीने या प्रकरणाचा तपास सुरू केला. मात्र, समीर वानखेडे यांनी आपल्यावरील सर्व आरोप फेटाळून लावले होते.

हेही वाचा-इंधन दरवाढीच्या नावाखाली 23 लाख कोटींची वसुली; पृथ्वीराज चव्हाण यांचा मोदी सरकारवर गंभीर आरोप

गेल्या महिन्यात ज्ञानेश्वर सिंह यांच्या नेतृत्वाखालील पथकाला प्रभाकर साईल यांचा जबाब नोंदविता आला नाही. मात्र, याप्रकरणी समीर वानखेडेसह इतर आठ जणांचे जबाब नोंदवण्यात आले आहेत.

हेही वाचा-फडणवीसांनी 'या' लोकांच्या मदतीने वसुलीचे रॅकेट चालवले, मलिकांचा गंभीर आरोप; पहा मलिकांची पत्रकार परिषद

एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी बजावली होती नोटीस-

प्रभाकर साईलने एक व्हिडिओ प्रसारित करत वानखेडेंनी आर्यनच्या सुटकेसाठी 25 कोटी रुपये खंडणी मागितल्याचा आरोप केला होता. या प्रकरणाची दिल्लीच्या एनसीबी टीमकडून चौकशी करण्यात येत आहे. प्रभाकरला काही दिवसांपूर्वीच नोटीस पाठवल्याचा दावा एनसीबीच्या अधिकाऱ्यांनी केला होता. तो न आल्याने एनसीबीने मुंबई पोलिसांनाही पत्र लिहिले होते.

Last Updated : Nov 10, 2021, 1:27 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.