ETV Bharat / city

Yakub Menon grave: याकुब मेनन यांच्या समाधीवरील लाईटींग प्रकरणी नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका - Terrorist Yakub Menon grave case

उद्धव ठाकरे यांनी याकूब मेननच्या कबरीवर केलेली रोषणाई म्हणजे हे पाप आहे. (Narayan Rane criticism of Uddhav Thackeray) कृत्य हिंदुरुदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाला शोभत नसल्याची खोचक टीका नाव न घेता नारायण राणे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे. ते माध्यमांशी बोलत होते.

याकुब मेनन यांच्या समाधीवरील लाईटींग प्रकरणी नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

author img

By

Published : Sep 10, 2022, 7:02 PM IST

सिंधुदुर्ग - दहशतवादी याकूब मेनन याच्या कबरी वरती लाइटिंग करण हे शिवसेनेने केलेला पाप असून याला सर्वस्वी उद्धव ठाकरे जबाबदार आहेत. या सगळ्या घडामोडी महाविकास आघाडी सरकारच्या काळात घडलेल्या असून त्याला शिवसेना व महाविकास आघाडी जबाबदार असल्याची (Terrorist Yakub Menon grave case) टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी केली आहे.

या घटनेमुळे महाराष्ट्राची प्रतिमा खालावली - याबाबत भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, याकूब मेननच्या कबरीच्या सुशोभिकरणासाठी अलिखीत परवानगी महाविकास आघाडी सरकारने दिली. मविआ आणि उद्धव ठाकरेंनी मुख्यमंत्रिपदासाठी किती तडजोड केली हे यावरून स्पष्ट झाले आहे. भाजपा या प्रकाराचा तीव्र निषेध करत आहे. या घटनेमुळे महाराष्ट्राची प्रतिमा खालावली. या प्रकाराला जबाबदार असणाऱ्यांवर गंभीर गुन्हे दाखल करावेत अशी मागणी सरकारला करण्यात आली आहे.

मुख्यमंत्रिपदासाठी तडजोड का केली? - तसेच याकूबची कबर सुशोभिकरणासाठी ज्यांनी मदत केली त्यांचे नावे समोर आणा. हे देशद्रोही कृत्य असून त्यांच्यावर गुन्हे दाखल करावेत. तत्कालीन सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वात होते. कट्टर हिंदुत्ववादी स्वत:ला म्हणवणारे उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रिपदासाठी तडजोड का केली? याचं स्पष्टीकरण जनतेला दिले पाहिजे. या प्रकारासाठी सरकारमध्ये कोण कोण समाविष्ट होते ते समोर आले पाहिजे असं चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले आहेत.

शिवसेना दाऊदची प्रचारक झालीय - याकूब मेनन जिवंत ठेवला पाहिजे ही काँग्रेसने मांडलेली भूमिका होती. त्यावेळी केंद्रात कुणाचे सरकार होते? गृहमंत्री कोण होते? याचे उत्तर काँग्रेसने पहिले द्यावे. सुप्रीम कोर्टात काँग्रेसने काय भूमिका मांडली होती? याकूब मेननला जिवंत ठेवा अशी मागणी काँग्रेसचे मंत्री अस्लम शेख यांनी केली होती. सत्तेत असताना शिवसेना दाऊदची समर्थक होती हे आम्ही पाहिले. शिवसेना आता दाऊदची प्रचारक झाली आहे अशी टीकाही भाजपकडून करण्यात आली आहे,

महापौर तुमचा, मुख्यमंत्री तुम्ही - पाकिस्तानच्या मदतीने दाऊदने भारतावर, मुंबईवर हल्ला केला. त्यातला प्रमुख आरोपी याकूब मेनन ज्याला फाशी सुप्रीम कोर्टाच्या आदेशाने झाली. मग त्याच्या कबरीवर सुशोभिकरणाची परवानगी दिली कशी? अडीच वर्ष उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. कब्रिस्तानची जबाबदारी महापालिकेकडे असते. महापौर तुमचा, मुख्यमंत्री तुम्ही आणि दाऊदच्या माणसाच्या कबरीचे सुशोभिकरण सुरू आहे. पेग्विन सेनेने कबर बचाव कार्यक्रम सुरू करून पेग्विन सेनेच्या युवा अध्यक्षांनी त्याचे नेतृत्व करावे असा टोला मुंबई भाजपा अध्यक्ष आशिष शेलार यांनी शिवसेनेवर घणाघात केला आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.