ETV Bharat / city

Narayan Rane : सुशांतसिंग आणि दिशा सालियन यांची हत्या, नारायण राणे यांचे खळबळजनक ट्विट

नारायण राणे
नारायण राणे
author img

By

Published : Feb 18, 2022, 5:48 PM IST

Updated : Feb 18, 2022, 11:13 PM IST

17:57 February 18

नारायण राणे यांच्या बंगल्याची पाहणी

मुंबई - नारायण राणे यांच्या बंगल्याची पाहणी करायला गेलेले पालिकेचे पथक परत आले.

- घरात कोणीही नसल्याने पाहणी करता आली नाही.

- पालिका पथक पुन्हा सोमवारी भेट देणार असल्याची माहिती.

17:44 February 18

नारायण राणे यांचे खळबळजनक ट्विट, सुशांतसिंग दिशा सालियन यांची हत्या झाल्याचा दावा

  • खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी
    लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले.

    — Narayan Rane (@MeNarayanRane) February 18, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली आहे, असे ट्विट करत राणे यांनी एकच खळबळ उडवून दिली आहे.

ट्विट करत नारायण राणे म्हणाले की, खासदार विनायक राऊत यांच्यासाठी खास बातमी. लवकरच सुशांतसिंग व सामुदायिक बलात्कार करून तिची हत्या केली त्या दिशा सालियन या दोघांचीही आत्महत्या नव्हे हत्या झाली त्यांचीही चौकशी परत होईल एवढेच नाही तर मातोश्रीच्या चौघांवर ईडीची नोटीस तयार असल्याचे कळाले. विनायक राऊत हे घडल्यावर आपले “बॉस ” आणि आपण कुठे धावणार ?, असा सवालही राणे यांनी विचारला आहे.

मुंबई पालिकेचे पथक राणेंच्या निवासस्थानी

नारायण राणे यांच्या जुहू येथील अधीश बंगल्यात अनधिकृत बांधकाम झाल्याची तक्रार मुंबई महापालिकेला मिळाली होती. त्यानुसार पालिकेचे पथक राणे यांच्या निवासस्थानी पोहचले आहे. यावरुन वाद शिवसेनेवर टिकास्र सुरु आहे. त्यातच आता नारायण राणे यांनी ट्विट करत थेट मातोश्री बंगल्यावर ईडीची धाड पडणार असल्याचा इशारा दिला आहे. दरम्यान, उद्या नारायण राणे जुहू या निवासस्थानी पत्रकार परिषद घेणार आहेत. त्यामुळे आगामी काळात राणे विरुद्ध शिवसेना हा वाद आणखी चिघळण्याची शक्यता आहे.

सुशांतने केली होती आत्महत्या

१४ जून २०२० रोजी सुशांत सिंह त्याच्या वांद्रे येथील राहत्या घरी लटकलेल्या अवस्थेत आढळला होता. त्यानंतर फिल्म इंडस्ट्रीमध्ये दोन गट निर्माण झाले. सुशांतची आत्महत्या नसून ती हत्या असल्याचा आरोप केला गेला. मुंबई पोलिसांकडून हा तपास सीबीआयकडे देण्यात आला. त्यानंतर वर्ष उलटूनही या तपासाला विराम देण्यात आलेला नाही. या प्रकरणामध्ये ड्रगचा मुद्द समोर आल्यानंतर तपासाला वेगळे वळण मिळाले. सुशांतची कथित गर्ल फ्रेंड रिया चक्रवर्ती व तिच्या भावाला या प्रकरणात अटक करण्यात आली होती. सुशांतचा रुममेट सिध्दार्थ पिठानी याला न्यायालयीन कोठडी मिळाली होती. सुशांतच्या मृत्यूनंतर एम्सने दिलेल्या अहवालात ही आत्महत्या असल्याचे म्हटले होते. मात्र सीबीआयने अद्यापही याबाबतचा निर्णय गुलदस्त्यातच ठेवलाय.

असा झाला होता दिशाचा मृत्यू

28 वर्षीय दिशा सालियानने 8 जून रोजी मलाड भागातील एका उंच इमारतीतून उडी मारून आत्महत्या केली होती. दिशा सालियानच्या मृत्यूच्या संदर्भात मालवणी पोलीस ठाण्यात अपघाती मृत्यू अहवाल नोंदविला गेला आहे. दिशा सालियान मृत्यूचे प्रकरण सीबीआयकडे सोपवावे आणि उच्च न्यायालयाने त्याचे निरीक्षण करावे, अशी विनंती न्यायालयात करण्यात आली होती. तथापि, दिशा सालियन आत्महत्याप्रकरणी मुंबई पोलिसांकडून लवकरच न्यायालयात क्लोजर रिपोर्ट सादर करण्यात येणार आहे.

दिशाच्या कुटुंबाची भूमिका -

दिशाचे वडील सतीश सालियान यांनी मालवणी पोलीस ठाण्यांमध्ये ऑगस्ट महिन्यात तक्रार दाखल केली होती. वेगवेगळ्या समाज माध्यमांवर काही बॉलीवूड व राजकारणी व्यक्तींकडून दिशाच्या आत्महत्येसंदर्भात चुकीच्या गोष्टी पसरवल्या जात होत्या. याचा कुटुंबाला नाहक मानसिक त्रास होत आहे. अशी तक्रार दिशाच्या वडीलांनी दिली होती. या बरोबरच मुंबई पोलिसांनी आतापर्यंत जो काही तपास केला आहे. त्या तपासाला घेऊन आम्ही समाधानी असून आमचा कुणावरही संशय किंवा आरोप नसल्याचंही त्यांनी स्पष्ट केले होते.

नारायण राणे हा स्वार्थी, बेईमान आणि पदासाठी लाचार -विनायक राऊत

एकेकाळी शरद पवार, काँग्रेसवर आरोप करणारे उद्धव ठाकरे आणि संजय राऊत आज मांडीला मांडी लावून बसल्याची टीका केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केली. शिवसेनेकडून या टीकेला जोरदार प्रत्युत्तर देण्यात आले. नारायण राणे हा स्वार्थी, बेईमान आणि पदासाठी लाचारी स्वीकारलेला पहिला माणूस आहे, अशा शब्दांत शिवसेना खासदार विनायक राऊत यांनी नारायण राणेंवर पत्रकार परिषदेत हल्लाबोल चढवला होता. केंद्रीय तपास यंत्रणांच्या वाढत्या दबावावर शिवसेना खासदार संजय राऊत यांनी पत्रकार परिषदेत जोरदार टीकास्त्र चढवले. भाजपचे नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी प्रत्युत्तर देताना शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि खासदार संजय राऊत यांना लक्ष्य केले. संजय राऊत यांचा मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर डोळा असल्याचा आरोप त्यांनी केला. शिवसेनेकडून या आरोपांचे खंडन करण्यात आले.

स्वतःच्या पक्षाशी इमान न राखणारा माणूस

खासदार राऊत शिवसेनेचे आमचे नेते असून त्यांना भाजप आणि नारायण राणे यांनी ईडीच्या माध्यमातून जरी त्रास देण्याचा प्रयत्न केला असला तरी ते कोणत्याही कारणाने डगमगले नाहीत. त्यांनी निधड्या छातीने पत्रकार परिषद घेत घोटाळ्याविषयी सगळे खुलासे केले. मात्र, नारायण राणेंसारखी लाचारी पत्करली नाही, असा दावा विनायक राऊत यांनी केला. राणे यांच्या मागे ईडी लागल्यावर मागल्या दाराने ते भाजपमध्ये सहभागी झाले. स्वतःच्या स्वार्थासाठी नारायण राणे सगळ्या पक्षांमध्ये जाऊन आलेले आहेत. स्‍वतःच्‍या पक्षाशी देखील इमान न राखणारा लाचार माणूस आहे, असा घणाघात विनायक राऊत यांनी केला.

उद्धव ठाकरे आदर्श मुख्यमंत्री

जे नारायण राणे भाजप आणि मोदी प्रेमाचे गोडवे गात आहेत, त्यांनी यापूर्वी भाजप असो किंवा आरएसएसवर अक्षरशः खालच्या पातळीवर जाऊन टीका केली, असे विनायक राऊत म्हणाले. व्हिडिओच्या माध्यमातून त्यांनी नारायण राणे आणि नितेश राणे यांच्या विधानांचा भंडाफोड केला. नारायण राणे लाचारीने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असले तरी, कोरोनाच्या काळात संपूर्ण देशवासियांनी उद्धव ठाकरे यांना आदर्श मुख्यमंत्री म्हणून त्यांचा गौरव केला आहे. यशस्वी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची तुलना होत असल्याने नारायण राणे आक्रस्ताळपणामुळे उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करत असल्याचे विनायक राऊत म्हणाले.

किरीट सोमैयांनी राणेंवर केले होते आरोप

नारायण राणे ज्यांच्या बरोबरीने आज आमच्यावर टीका करत आहेत. त्या किरीट सोमैयांनी आदरणीय राणे यांच्या विरोधात आरोपांची मालिका चालवली होती. त्यावेळी नारायण राणेंच्या पत्नीच्या नावे असणारी हॉटेल्स, मायनिंग आणि जमीन व्यवहाराबाबत अनेक घोटाळ्याच्या टीका करत राणे यांच्यावर शंभर बोगस कंपन्या तयार केल्याचा आरोप केला होता, असे विनायक राऊत म्हणाले. एकेकाळी काँग्रेस आणि राष्ट्रवादीवर आरोप करणारी शिवसेना आता त्यांच्या मांडीला मांडी लावून बसल्याचा नारायण राणे यांनी उल्लेख केला. विनायक राऊत यांनी या सगळ्या गोष्टी पूर्वी झालेल्या आम्ही नाकारत नाही. मात्र, ज्यांच्या रक्तात बेईमानी आहे, त्यांना धडा शिकवण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे महाविकास आघाडीत सामील झाले आणि मुख्यमंत्रिपदाची सूत्रे हाती घेतल्याचे विनायक राऊत म्हणाले.

Last Updated : Feb 18, 2022, 11:13 PM IST

For All Latest Updates

TAGGED:

narayan rane
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.