ETV Bharat / city

'शिवसेनेत असताना मी संजय राऊतचा बाप होतो' - narayan rane father sanjay raut

शिवसेनेत असताना मी संजय राऊतचा बाप होतो. माझ्यापुढे संजय राऊत कधी येतही नसत, असे विधान खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषदेत केले आहे.

narayan rane
नारायण राणे
author img

By

Published : Jan 17, 2020, 10:21 AM IST

मुंबई - छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज म्हणवणाऱ्यांनी त्यांचे वंशज असल्याचे पुरावे द्यावे, असे विधान खासदार संजय राऊत यांनी एका मुलाखतीत केले. त्यांच्या या वक्तव्यानंतर राज्यात अनेक प्रतिक्रिया उमटत आहे. राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी देखील पत्रकार परिषदेत संजय राऊत यांच्यावर आगपाखड केली आहे. संजय राऊत आता बोलतायत, पण 'शिवसेनेत असताना मी संजय राऊतचा बाप होतो' असे विधान करत राणे यांनी राऊतांवर चांगलेच तोंडसुख घेतले.

खासदार नारायण राणे यांची खासदार संजय राऊत यांच्यावर जोरदार टीका...

हेही वाचा... 'चंद्रकांत पाटलांना सत्ता गेल्याच्या धक्क्यातून सावरण्याची शक्ती मिळो'

शिवसेनेत सध्या काय चालले आहे, याची मला चांगली माहिती आहे. आपण शिवसेनेत असताना संजय राऊत यांना काहीही महत्व नव्हते. मी बाळासाहेबांच्या जवळ आलो की, संजय राऊत आमच्यापासून बराच लांब उभा राहत होते. शिवसेनेत असताना त्यावेळी मी संजय राऊतांचा बाप होतो, असे वक्तव्य राणे यांनी भाजप कार्यालयात पत्रकार परिषदेत केले.

हेही वाचा... इंदिरा गांधी यांच्या संदर्भात एकही अपशब्द खपवून घेणार नाही; अशोक चव्हाणांचा संजय राऊतांना इशारा

संजय राऊत यांनी पुण्यात एका मुलाखती दरम्यान बोलताना, कुख्यात गुंड दाऊद याच्यासोबत आपले बोलणे झाल्याचा आणि त्याला आपण दम देखील दिल्याचे म्हटले. यावर बोलताना राणे यांनी, राऊत यांच्यावर टीका केली. 'संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे. त्यांना उपचाराची गरज आहे. राऊत यांचे जर दाऊदशी बोलले झाले असेल, त्याला दम दिला असेल तर त्याचे राऊत यांच्यासोबत काय बोलणे झाले ? असा सवाल राणे यांनी उपस्थित केला. तसेच राऊत यांच्या विधानाची चौकशी राज्याच्या गृहमंत्र्यांनी केली पाहिजे, अशी मागणीही नारायण राणे यांनी केली.

Intro:शिवसेनेत असताना मी संजय राऊतचा बाप होतो - नारायण राणे

छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशजांनी पुरावे द्यावे असे विधान केल्या नंतर शिवसेनेचे नेते संजय राऊत यांच्यावर राज्यभरात टीका होत असून माजी मुख्यमंत्री आणि भाजपचे खासदार नारायण राणे यांनी राऊत यांच्यावर आगपाखड केली आहे . " शिवसेनेत असताना मी संजय राऊतचा बाप होतो " या शब्दात राणे यांनी राऊत यांच्यावर तोंड सुख घेतले आहे . शिवसेनेत काय चालत काय चालत नाही याची मला चंगली माहिती आहे . सेनेत असताना संजय राऊत यांचे काहीही महत्व नव्हते . मी साहेबांच्या जवळ आलो की राऊत आमच्यापासून बराच लांब उभा राहत असे त्यावेळी मी राऊतचा बाप होतो , असे वादग्रस्त वक्तव्य राणे यांनी भाजप कार्यालयात केले .

संजय राऊत यांनी एका वर्तमान पत्राच्या कार्यक्रमात काही वादग्रस्त विधान केली . यावर देशभरात खळबळ उडाली आहे . छत्रपती शिवाजी महाराजांच्य आताच्या वंशजांनी त्यांच्या वारसाचे पुरावे द्यावेत. तसेच एकेकाळी कुख्यात दाऊदशी बोलणे झाले असून दाऊदला दम ही दिल्याचे राऊत यांनी वक्तव्य केले आहे . यावर बोलताना राणे यांनी राऊत यांच्यावर आगपाखड केली . संजय राऊत यांचे मानसिक संतुलन बिघडले आहे . त्यांना उपचाराची गरज आहे . राऊत यांचे जर दाऊदशी बोलले झाले असेल , त्याला दम दिला असेल तर त्यांचे राऊत यांच्याशी काय बोलणे झाले याची चौकशी राज्याच्या गृहमंत्र्यांनी केली पाहिजे ,अशी मागणीही राणे यांनी केलीय . छत्रपती शिवाजी महाराजांच्या वंशजावर राऊत यांनी काहीही अनावश्यक बोलू नये याची किंमत राऊत यांना मोजावी लागेल असेही राणे म्हणले .
Body:फीड लाईव्ह कॅमेरा वरून पाठवले आहेConclusion:।
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.