ETV Bharat / city

Nandkishor Chaturvedi: नंदकिशोर चतुर्वेदी भारतातून पसार, ईडीकडून शोध सुरू - नंदकिशोर चतुर्वेदी फरार

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची 6 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणातील महत्त्वाचे सूत्रधार नंदकिशोर चतुर्वेदी ( Nandkishor Chaturvedi ) हा फरार झाला आहे. देशातून पळ काढल्याची तपास यंत्रणांना माहिती मिळाली आहे.

Nandkishore Chaturvedi abscond India
ईडी
author img

By

Published : Mar 23, 2022, 2:20 PM IST

Updated : Mar 24, 2022, 12:57 PM IST

मुंबई - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे मेहुणे श्रीधर पाटणकर यांची 6 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त करण्यात आली आहे. या प्रकरणातील महत्त्वाचे सूत्रधार नंदकिशोर चतुर्वेदी हा फरार झाला आहे. देशातून पळ काढल्याची तपास यंत्रणांना माहिती मिळाली आहे. ईडी चतुर्वेदीच्या ( Nandkishor Chaturvedi ) मागावर आहे. तसेच, कारवाईच्या भीतीने तो भारत सोडून पसार झाल्याची माहिती सूत्रांकडून प्राप्त झाली आहे.

हेही वाचा - Property tax hike Mumbai: मुंबईकरांवर १ एप्रिलपासून मालमत्ता कर वाढीचा बोजा

गेल्या काही महिन्यांपासून नंदकिशोर चतुर्वेदी हा देश आणि मुंबई सोडून परदेशात गेला असल्याची माहिती मिळाली आहे. ईडीने केलेल्या कारवाईनंतर नंदकिशोर चतुर्वेदी हा रडारवर आला. मागील 9 महिन्यांपासून ईडी नंदकिशोर चतुर्वेदीच्या मागावर होते. या व्यक्तीच्या नावावर अनेक शेल कंपन्या आहेत. शेल कंपन्यांमार्फत हवाला पैसा जमा करण्याचे काम याच्याकडेच आहे. विशेष म्हणजे, नंदकिशोर चतुर्वेदी हा पेशाने सीए आहे. नंदकिशोर चतुर्वेदी हा हवाला ऑपरेटर असून त्याचे ठाकरे परिवाराशी अत्यंत जवळचे संबंध असल्याचा आरोप भाजपकडून केला जात आहे.

दुसरीकडे श्रीधर पाटणकर प्रकरणातही नंदकिशोर चतुर्वेदीचे नाव पुढे येत आहे. महेश पटेल यांनी नंदकिशोर चतुर्वेदींमार्फत आपल्या पुष्पक समुहातील पुष्पक रिअलिटी या कंपनीचा निधी वळवल्याचेही सांगितले जात आहे. पुष्पक रिअलिटीने एका व्यवहारासाठी विविध स्तरांचा वापर करून 20.02 कोटी रुपयांचा निधी नंदकिशोर चतुर्वेदी यांच्याकडे वळवला. नंदकिशोर चतुर्वेदी हे अनेक शेल कंपन्या चालवतात. त्यांच्या कंपन्यांपैकी एक कंपनी हमसफर डीलर प्रायव्हेट लिमिटेडमार्फत व्यवहार करण्यात आला होता.

काय आहे प्रकरण - श्रीधर पाटणकर हे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंची पत्नी रश्मी ठाकरे यांचे बंधू आहेत. ते साईबाबा गृहनिर्मिती प्रायव्हेट लिमिटेडचे मालक असून या कंपनीच्या मालकीच्या 11 सदनिका जप्त करण्यात आल्या. हमसफर डिलरने पाटणकरांच्या कंपनीला 30 कोटी कर्ज दिले होते. मात्र, हमसफर ही कंपनी बनावट असल्याचे ईडीचा आरोप आहे. नंदकिशोर चतुर्वेदी यांची हमसफर कंपनी आहे. त्यांच्याकडून पाटणकरांच्या कंपनीने विनातारण कर्ज घेतले. नंदकिशोर चतुर्वेदी आणि महेश पटेल यांनी पाटणकरांच्या कंपनीत पैसे दिले. या पैशातूनच ठाण्यात निलांबरी प्रोजेक्टचे बांधकाम करण्यात आले. नंदकिशोर चतुर्वेदी आणि महेश पटेल यांच्यावर मनी लॉन्ड्रिंगचा आरोप आहे. 2017 साली त्यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे.

श्रीधर पाटणकरांच्या अन्य मालमत्ताही ईडीच्या रडारवर- 'ईटीव्ही भारत'ने श्रीधर पाटणकर यांचा मालमत्तांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. त्यात ठाण्यातील पाचपखाडी परिसरातील पाचपखाडी ज्वेलर्स प्रकल्प पाटणकर यांच्या भागीदारीमध्ये असल्याचे समोर आले आहे. श्रीधर पाटणकर यांनी या प्रकल्पात करोडो रुपये देऊन भागीदारी केलेली आहे. हा प्रकल्प तीन भागीदारांमध्ये असून, त्यामध्ये श्रीधर पाटणकर यांचा देखील समावेश आहे.

पाचपखाडी ज्वेलर्स हे 22 वर्ष जुने असलेले पुनर्वसन प्रकल्प आहे. या प्रकल्पात अखेरच्या टप्प्यात श्रीधर पाटणकर यांनी भागीदारी केली आणि त्यांनी गुंतवलेल्या पैशांच्या मोबदल्यात त्यांना पाच सदनिका मिळाल्या आहेत. या सदनिका विकून त्यांना त्यांचा मोबदला मिळवायचा आहे, असे ठरवण्यात आले. आता या प्रकल्पात श्रीधर पाटणकर यांच्या सदनिका असून, त्या देखील ईडीच्या रडारवरती आहेत. त्याचप्रमाणे, पाचपखाडी ज्वेलर्स या प्रकल्पातील भागीदार असलेले श्रीधर पाटणकर हे येथील कार्यालयात नेहमी बसत. या प्रकल्पातील विविध ठेकेदारांचे श्रीधर पाटणकर स्वत: देणी द्यायचे, असे स्थानिक नागरिकांनी सांगितले आहे.

हेही वाचा - Home Minister's Announcement : प्रशासकीय यंत्रणा वसूलीचे षडयंत्र रचत असल्यास चौकशी करणार

Last Updated : Mar 24, 2022, 12:57 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.