मुंबई - महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले यांनी आज बाप्पाच्या दर्शनासाठी सिद्धिविनायक मंदिरात हजेरी लावली. नाना पटोले यांनी मुंबईतील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांना भेट दिली. सिद्धिविनायक मंदिर, चैत्यभूमी, माहिम दर्गा, माहिम चर्च, शिवाजी पार्क, दादर गुरुद्वारा येथे जाऊन पटोले यांनी अभिवादन केले.
महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष नाना पटोले यांच्यासह नवनियुक्त कार्याध्यक्ष आणि उपाध्यक्ष हे येत्या शुक्रवारी पदभार स्वीकारणार आहेत. 12 फेब्रुवारीला मुंबईतील ऑगस्ट क्रांती मैदानात हा कार्यक्रम पार पडणार आहे. यावेळी महाराष्ट्र प्रभारी एच. के. पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.
दरम्यान, आज (11 फेब्रुवारी) नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी मुंबईतील सर्वधर्मीय प्रार्थनास्थळांना भेट दिली. सिद्धिविनायक मंदिर, चैत्यभूमी, माहिम दर्गा, माहिम चर्च, शिवाजी पार्क, दादर गुरुद्वारा येथे जाऊन अभिवादन केले. आज सकाळी मुंबईतील प्रसिद्ध अशा सिद्धिविनायक मंदिरात जाऊन गणपती बाप्पाचा आशीर्वाद नाना पटोले यांनी घेतला. त्यांच्यासोबत शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड, नेते सचिन सावंत, एकनाथ गायकवाड यांच्यासह मुंबई काँग्रेस अध्यक्ष भाई जगताप उपस्थित होते.