ETV Bharat / city

सरकारने दिलेल्या जमिनीवर रामदेव बाबासह अंबानी कधी उद्योग उभे करणार? - Nana Patole questions in budget session

रिलायन्स डिफेन्स कंपनीसाठीही मिहानमध्ये २८९ एकर जमीन देण्यात आली आहे. या उद्योगातूनही प्रत्यक्ष २ हजार तर अप्रत्यक्ष १५ हजार रोजगार निर्मिती होईल, असा दावा करण्यात आला होता. पण, हा प्रकल्पही अद्याप उभा राहिलेला नाही.

Nana Patole
नाना पटोले
author img

By

Published : Mar 10, 2021, 3:01 PM IST

मुंबई- रामदेव बाबांच्या पतंजली समुहाच्या हर्बल अँड फूड पार्कसाठी तसेच अनिल अंबानीच्या उद्योगासाठी नागपूरच्या मिहान प्रकल्पामध्ये राज्य सरकारने नाममात्र दराने जमीन दिली. परंतु त्या जागेवर अद्याप उद्योग उभे राहिलेले नाहीत. शेतकऱ्यांची लाखमोलाची जमीन कवडीमोल भावाने देऊनही त्यावर अद्याप उद्योग का उभे राहिले नाहीत ? त्या जमिनीवर उद्योग कधी उभे राहणार ? असा प्रश्न काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभेत उपस्थित केला.

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले पटोले म्हणाले की, मिहान प्रकल्पामधील २३० एकर जमिनीवर रामदेवबाबांच्या पतंजली समूह हर्बल अँड फूड पार्कची निर्मिती करणार होते. रामदेव बाबांना ही जमीन ६६ वर्षांसाठी अतिशय कवडीमोल भावात दिली होती. या उद्योगामुळे ५० हजार रोजगार निर्मिती होईल, असा दावा करण्यात आला होता. तसेच दररोज ५ हजार कोटींचा कच्चा माल खरेदी केला जाईल, असा दावा करण्यात आला होता. परंतु चार वर्षे झाली तरी अद्याप या जागेवर पतंजलीचा उद्योग उभा राहिलेला नाही. अनिल अंबानी यांच्या रिलायन्स डिफेन्स कंपनीसाठीही मिहानमध्ये २८९ एकर जमीन देण्यात आली आहे. या उद्योगातूनही प्रत्यक्ष २ हजार तर अप्रत्यक्ष १५ हजार रोजगार निर्मिती होईल, असा दावा करण्यात आला होता. पण, हा प्रकल्पही अद्याप उभा राहिलेला नाही.

हेही वाचा-चार हजार द्या.. निगेटिव्ह कोरोना रिपोर्ट घेऊन जा; मानखुर्दमधील लॅबचा प्रकार

नाना पटोले यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नाला उत्तर देताना उद्योगमंत्री सुभाष देसाई म्हणाले की, रामदेवबाबा, अनिल अंबानींसह काहीजणांना उद्योग निर्मितीसाठी सरकारने जमिनी उपलब्ध करून दिल्या आहेत. पण, त्या जागेवर उद्योग उभे राहिले नाहीत. माहिती घेऊन योग्य ती कारवाई करू, असे उद्योगमंत्र्यांनी आश्वासन दिले.

हेही वाचा-पिंपरीत स्मार्ट सिटी प्रकल्पाच्या 27 सर्व्हरवर सायबर हल्ला; 5 कोटींचे नुकसान

दरम्यान, पंतजली उद्योगाने कोरोनावरील औषध तयार केल्याचा दावा केल्यानंतर रामदेव बाबा अडचणीत सापडले होते. तर उद्योगपती अनिल अंबानी यांनी कर्ज न फेडल्याने त्यांचे उद्योग दिवाळखोरीच्या उंबरठ्यावर आहेत.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.