मुंबई - शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्यातील राजकरण ढवळून निघाले आहे. राज्यात बंडखोर आमदारांचा शिवसैनिकांकडून निषेधही होत आहे. या राजकीय संघर्षाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील मालाडमधील ( Quran recitation at Shiv Sena office in Malad ) मालवणी भागात शिवसेना शाखेत मुस्लीम समाजातील मुलांनी नमाज आणि कुराण पठण केले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे सरकार टिकावे, शिवसेनेची सत्ता मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हातून जाऊ नये, अशी प्रार्थना ( Namaz at Shiv Sena office in Malad ) अनेक मुस्लीम मुले करत असल्याचे या व्हिडिओमध्ये दिसत आहे.
हेही वाचा - Maharashtra Political Crisis : काँग्रेस हायकमांड सोनिया गांधी यांचा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना फोन
महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या महाविकास आघाडीचे सरकार कायम राहावे, शिवसेना सोडून गुवाहाटीला गेलेल्या सर्व आमदारांना सद्बुद्धी मिळावी, म्हणून मुंबईतील शिवसेना शाखाप्रमुख अमिरुद्दीन तालुकदार यांनी मालाड मालवणी येथील शिवसेना कार्यालयात कुराण पठण ठेवले. मोठ्या संख्येने मुलांनी कुराण शरीफचे पठण केले आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडीचे सरकार महाराष्ट्रात कायम राहावे, अशी प्रार्थना केली.
एकनाथ शिंदेच्या बंडामुळे महाराष्ट्र ढवळून निघाला - नगरविकास मंत्री एकनाथ शिंदेच्या बंडामुळे महाराष्ट्र ढवळून निघाला आहे. त्यावरून मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, मंत्री आदित्य ठाकरे, खासदार संजय राऊत हे एकनाथ शिंदेवर सातत्याने टीकास्त्र करत आहेत. त्यातच आता एकनाथ शिंदे यांनी ट्वीट करत शिवसैनिकांना भावनिक आवाहन केले ( Eknath Shinde On Shivsainik ) आहे. मविआसारख्या अजगराच्या विळख्यातून शिवसेना आणि शिवसैनिकांना सोडवण्यासाठीच मी लढत आहे, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले ( Eknath Shinde Criticized Mahavikas Aghadi ) आहे.
हेही वाचा - शिवसेनेच्या राष्ट्रीय कार्यकारिणीत 6 ठराव मंजूर, उद्धव ठाकरेंना मिळाला 'हा' मोठा अधिकार