मुंबई- नागपूरहून हैदराबादला जाणाऱ्या एअर ॲम्बुलन्सला तांत्रिक बिघाडामुळे ऐनवेळी मुंबईच्या दिशेने वळावे लागले. त्यासाठी मुंबई विमानतळावर इमर्जन्सी घोषित केली होती. सुरक्षितपणे या एअर ॲम्बुलन्सचे मुंबई विमानतळावर लँडिंग करण्यात आलेले आहे. या एअर ॲम्बुलन्समध्ये क्रूचे दोन मेंबर्स, रुग्ण आणि डॉक्टर सुरक्षित असल्याची माहिती मुंबई विमानतळ प्रशासनाने दिली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, हैद्राबादवरून नागपूरसाठी बिक्राफ्ट व्हीटी-जे आयएल एअर ॲम्बुलन्स एका रुग्णाला घेऊन निघाली होती. मात्र लँडिंग गिअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे ही एअर ॲम्बुलन्सच्या इमर्जन्सी लँडिंगसाठी छत्रपती शिवाजी महाराज मुंबई विमानतळाकडे वळविण्यात आले होते. त्यामुळे मुंबई विमानतळावर इमर्जन्सी घोषित केली होती. परिणामी काही काळ विमानतळावर खळबळ उडाली होती. या विमानाच्या सुरक्षित लँडिंगकरिता मुंबई एअरपोर्टवरील कर्मचाऱ्यांपासून ते अग्निशमन दलापर्यंत सर्वजण विमानतळावर सज्ज होते. या विमानाची सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग होईपर्यंत अनेक विमाने आकाशात घिरट्या घालत होते.
विमानातील सर्वजण सुरक्षितग
विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार हे विमान रात्री 9 वाजून 9 मिनिटांनी सुरक्षित इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेले आहे. या विमानात एकूण 5 जण होते. ज्यामध्ये दोन क्रू मेंबर, एक रुग्ण, एक डॉक्टर आणि एक वैद्यकीय सहाय्यकाचा समावेश होता.
घटनेची चौकशी करणार-
मुंबई विमानतळ प्रशासनाने दिलेल्या माहितीनुसार या घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार आहेत. हे एक खासगी बिक्राफ्ट व्हीटी-जे आयएल एअर ॲम्बुलन्स होते. या एअर ॲम्बुलन्सच्या लँडिंग गिअरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यामुळे या विमानाचे चाक निघाले होते. वेळेवर आणि सुरक्षित या विमानाचे इमर्जन्सी लँडिंग करण्यात आलेले आहे. यात कसलीही जीवितहानी झाली नाही. या घटनेची सखोल चौकशी करण्यात येणार आहे.
अनेक विमानांना उड्डाणांना उशीर
छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळावर बिक्राफ्ट व्हीटी-जे आयएल एअर ॲम्बुलन्सच इमर्जन्सी लँडिंग करण्यात आली. त्यामुळे इतर विमानांच्या नियोजित उड्डाणांच्या वेळापत्रकावर मोठा परिणाम झालेला आहे. सुरक्षेच्या दृष्टिकोनातून अनेक विमानांना लेटमार्क लागलेला आहे.
हेही वाचा-मुंबई : नेस्कोत उभारले जाणार देशातील पहिले स्वतंत्र पीडियाट्रीक कोविड सेंटर
कोरोनाच्या संकटाने देशांतर्गत हवाई वाहतूक क्षेत्राला फटका
कोरोनामुळे गेल्या वर्षी हवाई वाहतूक क्षेत्राला मोठा फटका बसला आहे. मात्र,आता हवाई वाहतूक हळूहळू धावपट्टीवर येत असल्याचे चित्र दिसून येत होते. मात्र, कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमुळे पुन्हा एकदा हवाई वाहतुकीला मोठा फटका बसला असून मार्च महिन्यांच्या तुलनेत एप्रिलमध्ये देशांतर्गत विमान प्रवाशांची संख्या सुमारे 40 टक्यांनी घटली आहे.
हेही वाचा-भांडुपच्या उत्साही मित्र मंडळाकडून लसीकरण मोहिमेबाबत डोगराळ भागामध्ये जनजागृती