मुंबई - महाराष्ट्रात हिंदू - मुस्लीम संस्कृतीचे ऐक्य जपले जाते. दोघेही गुण्यागोविंदाने राहतात. परंतु, समाजात तेढ निर्माण करण्यासाठी मशिदीवरील भोंगे हटवण्याची मागणी सुरू असून, अशी राजनीती योग्य नाही. सुरुवातीपासून ( Muslim brothers on Azaan loudspeaker ) अजान केली जाते. केवळ दोन मिनिटांचा अवधी यासाठी लागतो. आजपर्यंत कधीही याविरोधात कोणी तक्रार केलेली नाही. असे असताना त्याचे विनाकारण राजकारण करणे योग्य नाही. लोकांसाठी जे अत्यावश्यक विकासकामे आहेत ती होणे अपेक्षित आहे, असे मत दादर येथील मशीद परिसरातील मुस्लीम बांधवांनी व्यक्त केले.
हेही वाचा - शिवसेनेचे 90 टक्के आमदार नाराज; चंद्रशेखर बावनकुळेंचा गौप्यस्फोट
भाजप नेते मोहित कंबोज यांची भोंगे हटवण्याची मागणी
मुंबई शहरातील मशिदींमध्ये लावलेले बेकायदे भोंगे हटवावेत, अशी मागणी भारतीय जनता पक्षाचे नेते मोहित कंबोज यांनी केली आहे. विशेषतः वांद्रे, वर्सोवा आणि मोहम्मद अली रोड येथील मशिदींवर कारवाई करण्यात यावी, असे ते म्हणाले आहेत.
मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे ( Mumbai Police Commissioner Sanjay Pandey ) यांनी शहरातील वाहतूक कोंडी, ध्वनी प्रदूषण आदी प्रश्न सोडवण्यासाठी चांगले उपक्रम ( congestion and noise pollution ) सुरू केले आहेत. ध्वनी प्रदूषणाच्या मुद्द्याला अनुसरूनच मुंबईतील मशिदींवर लावण्यात आलेले बेकायदेशीर भोंगे ( illegal loudspeakers ) हटवले पाहिजेत, असे मोहित कंबोज यांनी म्हटले. दोन दिवसांपूर्वी मुंबई शहरात मशिदींवर लावण्यात आलेले भोंगे हटविले पाहिजेत, अशा मागणीसाठी कंबोज यांनी पत्रकार परिषद घेतली होती.
बेकायदेशीर भोंगे आहेत ते काढावेत - मोहित भारतीय
मोहित कंबोज म्हणाले, की जुन्या काळात घड्याळ नव्हते. त्यामुळे, मुस्लीम समाजातील लोकांना नमाज पडण्याची वेळ कळण्याकरिता भोंगे लावले होते. मात्र, आता प्रत्येकाकडे घड्याळ असते, त्यामुळे भोंग्यांची काही गरज आहे, असे वाटत नाही. याचा अनेक लोकांना व विद्यार्थ्यांना त्रास होतो. त्यामुळे, जेवढे बेकायदेशीर भोंगे आहेत ते काढावेत, असे कंबोज म्हणाले. कंबोज यांनी हे स्पष्ट केले की, आम्ही कोणत्याही समाज आणि धर्माविरोधात नाही. अजान झाली पाहिजे, पण ती मशिदींमध्ये, अशी माझी विनंती आहे, असे कंबोज म्हणाले.
हेही वाचा - Punishment For Kissing Cheeks : गालाचा मुका घेणे पडले महागात.. तब्बल ७ वर्षानंतर आरोपीला शिक्षा..