ETV Bharat / city

Servant Killed by couple : मुलीला छेडल्याच्या संशयातून पती-पत्नीकडून नोकराची हत्या; मुलुंडमधील घटना - Servant Killed by couple

पोलिसांच्या माहितीनुसार मृत अब्दुल खलील शेख (वय ६९) हे गोवंडीच्या शिवाजी परिसरात राहत होते. ते ओळख असलेल्या मुलुंड येथे राहणाऱ्या सलिम अख्तर (वय ३८) या आरोपीच्या घरी जेवण तयार ( Mulund servant murder case ) करण्याचे काम करत होते. मात्र, शनिवारी मध्यरात्री आरोपीने पत्नीसमवेत नोकराची हत्या ( Mulund servant murder case ) केली.

आरोपी समवेत पोलीस
आरोपी समवेत पोलीस
author img

By

Published : Jan 3, 2022, 10:07 PM IST

मुंबई - मुलीला छेडल्याच्या संशयातून पती-पत्नीने घरात काम करणाऱ्या वृद्ध नोकराची हत्या केल्याची घटना रविवारी मुलुंड ( Mulund servant murder case ) येथे घडली होती. मानखुर्द पोलिसांनी तपास करत अवघ्या काही तासात आरोपी पती-पत्नीला अटक ( husband wife arrest in Murder case ) केली आहे. अब्दुल खलील शेख असे मृत नोकराचे नाव आहे.

पोलिसांच्या माहितीनुसार मृत अब्दुल खलील शेख (वय ६९) हे गोवंडीच्या शिवाजी परिसरात राहत होते. ते ओळख असलेल्या मुलुंड येथे राहणाऱ्या सलिम अख्तर (वय ३८) या आरोपीच्या घरी जेवण तयार करण्याचे काम करत होते. मात्र, शनिवारी मध्यरात्री आरोपी याने अब्दुल खलील शेख यांना अचानक मारहाण करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा-MLA Raju Karemare Arrest in Bhandara : आमदार राजू कारेमोरे यांना न्यायालयाकडून जामिन नामंजूर; 15 जानेवारीपर्यंत न्यायालयीन कोठडी

गंभीर अवस्थेत शेख यांना रस्त्यावर सोडले!

आरोपी यांच्या १२ वर्षाच्या मुलीला छेडल्याच्या संशयातून त्याने ही मारहाण केली. यामध्ये शेख गंभीर जखमी झाले होते. त्यानंतर आरोपी पती-पत्नीने शेख यांना गंभीर अवस्थेत मध्यरात्री मानखुर्द-घाटकोपर जोडरस्त्यावर सोडून दिले.

हेही वाचा-Small Boy Body Found Nagpur : कोलार नदीच्या कॅनलमध्ये आढळला चिमुकल्याचा मृतदेह; पोलीस तपास सुरु

पळून जाण्याच्या तयारी असलेल्या आरोपींना अटक

रविवारी सकाळी शेख यांचा मृतदेह काही रहिवाशांनी पाहिल्यानंतर त्यांनी तत्काळ ही माहिती ( husband wife arrest in Murder case ) मानखुर्द पोलिसांना दिली. त्यानुसार पोलिसांनी मृत व्यक्तीची ओळख पटवून गुन्हा दाखल केला. आरोपीला शोधण्यासाठी मानखुर्द पोलिसांनी 5 पथके तयार केली होती. तसेच तांत्रिक बाबी, सीसीटीव्ही आणि खबऱ्यांच्या मार्फत व मृत व्यक्तीचा फोटो समाज माध्यमावर व्हायरल केला. त्यातून मृत व्यक्तीचे नातेवाईक मानखुर्द पोलीस ठाण्यात पोहोचले. त्यांनी दिलेल्या माहितीवरून पोलिसांनी तत्काळ मुलुंड येथे आरोपीच्या घरी दोन पथक पाठवले. मात्र, आरोपीने पत्नी आणि मुलांसह घरातून पळ काढला. आरोपी पटना येथे जाण्याच्या तयारीत होते. मानखुर्द पोलिसांना माहिती मिळताच त्यांनी पत्नी फिरोजा जाफर (वय ३५) हिच्यासह पतीला चेंबूर येथून अटक केल्याची माहिती प्रभारी पोलीस निरीक्षक दत्तात्रय खाडे यांनी दिली.

हेही वाचा-Woman Beat Police in Police Station : तरुणीने चौकीतच केली पोलिसांना मारहाण, गुन्हा दाखल

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.