ETV Bharat / city

पत्नीसोबत अनैतिक संबंध ठेवणाऱ्या मित्राची हत्या - ईस्टर्न फ्री वे रोड

गेल्या काही वर्षांपासून मृत गणेश पोळ याचे त्याचा मित्र सुशांत साळुंखे याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. या बद्दल सुशांत साळुंखे याला कळल्यावर, सुशांत आणि गणेश या दोघांमध्ये खटके उडत होते. मात्र, तरीही हे प्रकरण थांबत नसल्याचे लक्षात येताच सुशांत साळुंखे याने गणेश पोळ याची हत्या केली आहे.

सुशांत साळुंखे आणि गणेश पोळ
author img

By

Published : Aug 14, 2019, 6:31 PM IST

Updated : Aug 14, 2019, 6:55 PM IST

मुंबई - पत्नीसोबत मित्राचे अनैतिक संबंध असल्याच्या वादातून, मुंबईतील भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेश पोळ या युवकाची हत्या करण्यात आली आहे. ही हत्या त्याच्याच मित्राने केल्याची माहिती समोर येत आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी सुशांत साळुंखे उर्फ कालाखट्टा या आरोपीला अटक केली आहे.

गेल्या काही वर्षांपासून मृत गणेश पोळ याचे त्याचा मित्र सुशांत साळुंखे याच्या पत्नीसोबत अनैतिक संबंध होते. याबद्दल आरोपी सुशांत साळुंखे याला कळल्यावर, सुशांत आणि गणेश या दोघांमध्ये खटके उडत होते. मात्र, काहीही केल्यास हे प्रकरण थांबत नसल्याचे लक्षात येताच सुशांत साळुंखे याने गणेश पोळ याचा काटा काढण्याचे ठरविले.

11 ऑगस्टला रात्री 10:30 वाजता, मुंबईतील भायखळा परिसरातील बॅरिस्टर नाथ पै रस्त्यावरून मोटारसायकलने गणेश पोळ हा त्याच्या एका सहकाऱ्यासोबत जात होता. यावेळी पाठीमागून आलेल्या सुशांत साळुंखे याने त्याच्या चारचाकी वाहनाने गणेशची दुचाकी अडवली. त्याला गाडीत बसण्यास सांगितले. गणेश गाडीत बसताच आरोपी सुशांत याने त्याचा गळा आवळून चॉपरने त्याच्या डोक्यात एका मागून एक घाव घालण्यास सुरुवात केली. या दरम्यान गणेशचा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच सुशांतने गणेशचा मृतदेह ईस्टर्न फ्री वे रोडवरील वडाळा परिसरातील झुडपात फेकून दिला.

या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यानंतर पोलिसांनी मृत गणेश पोळ याचा मृतदेह ताब्यात घेतला आहे. तसेच सुशांत साळुंखे यास अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Intro:पत्नीसोबत मित्राचे असलेल्या अनैतिकत संबंधातून वाद होऊन मुंबईतील भोईवाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत गणेश पोळ या युवकाची हत्या त्याच्याच मित्राने केल्याची घटना समोर येत आहे. या प्रकरणी भोईवाडा पोलिसांनी सुशांत साळुंखे उर्फ कालाखट्टा या आरोपीला अटक केली आहे.
Body:गेल्या काही वर्षांपासून मयत गणेश पोळ याचे त्याचा मित्र सुशांत साळुंखे याच्यासोबत प्रेमप्रकरण सुरू होते. या बद्दल आरोपी सुशांत साळुंखे यास कळल्यावर सुरवातीला आरोपी सुशांत व गणेश या दोघांमध्ये खटके उडत होते.मात्र काही केल्या हे प्रकरण न सुटल्याने सुशांत साळुंखे याने गणेश पोळ याचा काटा काढण्याचे ठरविले होते.

11 ऑगस्ट रोजी रात्री 10.30 वाजता मुंबईतील भायखळा परिसरातील बॅरिस्टर नाथ पै रस्त्यावरून मोटारसायकल वरून गणेश पोळ हा त्याच्या एका सहकाऱ्यासोबत जात असताना पाठीमागून आलेल्या सुशांत साळुंखे याने त्याच्या चारचाकी वाहनाने गणेश ची गाडी अडवत त्यास त्याच्या गाडीत बसण्यास संगीतले. गणेश पोळ हा गाडीत बसल्यावर आरोपी सुशांत याने त्याचा गळा आवळून चॉपर ने गणेश च्या डोक्यात एका मागून रक घाव घालण्यास सुरवात केली. या दरम्यान गणेश चा मृत्यू झाल्याचे लक्षात येताच त्याचा मृतदेह ईस्टर्न फ्री वे वरील वडाळा परिसरातील झुडपात फेकून दिला. Conclusion:या प्रकरणी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल झाल्यावर पोलिसांनी मयत गणेश पोळ याचा मृतदेह ताब्यात घेऊन तपास केला असता सुशांत साळुंखे यास अटक केली आहे. या प्रकरणी पोलीस अधिक तपास करीत आहेत.
Last Updated : Aug 14, 2019, 6:55 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.