ETV Bharat / city

पालिकेने शिष्यवृत्तीच्या रक्कमेत वाढ करावी- अंजली नाईक

विद्यार्थ्‍याचे मनोबल उंचावण्‍यासाठी शिष्‍यवृत्‍ती पात्र विद्यार्थ्‍यांना पुरस्‍कार स्‍वरुपात १ हजार रुपये देण्‍यात येतात. ही रक्कम वाढवून २ हजार रुपये करण्‍याची सूचना शिक्षण समिती अध्‍यक्षा अंजली नाईक यांनी केली आहे.

शिष्यवृत्ती
author img

By

Published : Aug 1, 2019, 12:48 PM IST

मुंबई- महापालिका शाळेमधील विद्यार्थी शिक्षणासोबत खेळ व इतर उपक्रमांमध्‍ये मागे नाहीत. शिष्‍यवृत्ती परीक्षेत प्राविण्‍य मिळवलेल्या विद्यार्थ्‍यांची संख्या पाहता त्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रकमेत दुप्पट वाढ करावी अशी सूचना शिक्षण समिती अध्‍यक्षा अंजली नाईक यांनी केली.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे यांच्यावतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (आठवी) परीक्षेत पालिकेच्या तब्बल २३९ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या पाचवीच्या १७० तर आठवीच्या ६९ विद्यार्थ्यांचा सत्कार शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांच्या उपस्थितीत कालिदास नाटयमंदिर, मुलुंड येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी स्थानिक नगरसेवक प्रकाश गंगाधरे, नगरसेविका रजनी केणी, नाटय अभिनेते विद्याधर जोशी, शिक्षणाधिकारी महेश पालकर आदी मान्यवर उपस्थित होते.

महापालिका शाळेत गरीब घरातील मुले शिक्षण घेत असतात. महापालिका शाळांमध्‍ये शिक्षणासोबत विविध शालेय उपक्रम मोठया प्रमाणात राबविण्‍यात येत असून यामध्येही महापालिका शाळेतील विद्यार्थी हे अव्‍वलच आहेत. विद्यार्थ्‍याचे मनोबल आणखी उंचाविण्‍यासाठी शिष्‍यवृत्‍ती पात्र विद्यार्थ्‍यांना पुरस्‍कार स्‍वरुपात १ हजार रुपये देण्‍यात येतात. ही रक्कम वाढवून २ हजार रुपये करण्‍याची सूचना अंजली नाईक यांनी यावेळी केली.

चांगले नागरिक बना - विद्याधर जोशी

सिने व नाटय अभिनेते विद्याधर जोशी यावेळी मार्गदर्शन करताना म्‍हणाले की, मी सुध्‍दा चेंबुरच्‍या मनपा शाळेचा विद्यार्थी असून माझे वडील महापालिका शाळेत मुख्‍याध्‍यापक होते. यावेळी जास्‍त मार्गदर्शन न करता विद्यार्थ्‍यांनी रस्‍त्‍यांवर कचरा टाकणार नाही, प्‍लॉस्टिकचा वापर करणार नाही, मुंबई शहर स्‍वच्‍छ व सुंदर करण्‍यासाठी हातभार लावेल तसेच सुशिक्षीत होऊन देशाचा चांगला नागरिक बनण्‍याचा प्रयत्‍न करेल असा कानमंत्र विद्यार्थ्‍यांना त्‍यांनी यावेळी दिला

Intro:मुंबई - महापालिका शाळेमधील विद्यार्थी शिक्षणासोबत खेळ व इतर उपक्रमांमध्‍ये मागे नाहीत. शिष्‍यवृत्ती परीक्षेत प्राविण्‍य मिळवलेल्या विद्यार्थ्‍यांची संख्या पाहता त्यांना देण्यात येणाऱ्या शिष्यवृत्तीच्या रक्कमेत दुप्पट वाढ करावी अशी सूचना शिक्षण समिती अध्‍यक्षा अंजली नाईक यांनी केली. Body:महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणेच्या वतीने घेण्यात आलेल्या पूर्व उच्च माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षा (पाचवी) आणि पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती (आठवी) परीक्षेत पालिकेच्या तब्बल २३९ विद्यार्थ्यांनी घवघवीत यश मिळवले आहे. या परीक्षेत यशस्वी ठरलेल्या पाचवीच्या १७० तर आठवीच्या ६९ विद्यार्थ्यांचा सत्कार शिक्षण समिती अध्यक्षा अंजली नाईक यांच्या उपस्थितीत कालिदास नाटयमंदिर, मुलुंड येथे आयोजित करण्यात आला होता. याप्रसंगी स्थानिक नगरसेवक प्रकाश गंगाधरे, नगरसेविका रजनी केणी, नाटय अभिनेते विद्याधर जोशी, शिक्षणाधिकारी महेश पालकर आदी मान्यवर उपस्थित होते.

यावेळी बोलताना महापालिका शाळेत गरीब घरातील शिक्षण घेत असतात. महापालिका शाळांमध्‍ये शिक्षणासोबत विविध शालेय उपक्रम मोठया प्रमाणात राबविण्‍यात येत असून यामध्‍येही महापालिका शाळेतील विद्यार्थी हा अव्‍वलच असल्‍याचे त्‍या म्‍हणाल्‍या. त्‍यासोबतच विद्यार्थ्‍याचे मनोबल आणखी उंचाविण्‍यासाठी शिष्‍यवृत्‍ती पात्र विद्यार्थ्‍यांना पुरस्‍कार स्‍वरुपात १ हजार रुपये देण्‍यात येतात. ही रक्कम वाढवून २ हजार रुपये करण्‍याची सूचना त्‍यांनी केली.

चांगले नागरिक बना - विद्याधर जोशी
सिने व नाटय अभिनेते विद्याधर जोशी यावेळी मार्गदर्शन करताना म्‍हणाले की, मी सुध्‍दा चेंबुरच्‍या मनपा शाळेचा विद्यार्थी असून माझे वडील महापालिका शाळेत मुख्‍याध्‍यापक होते. यावेळी विद्यार्थ्‍यांना जास्‍त मार्गदर्शन न करता विद्यार्थ्‍यांनी रस्‍त्‍यांवर कचरा टाकणार नाही, प्‍लॉस्टिकचा वापर करणार नाही, मुंबई शहर स्‍वच्‍छ व सुंदर करण्‍यासाठी हातभार लावेल तसेच सुशिक्षीत होऊन देशाचा चांगला नागरिक बनण्‍याचा प्रयत्‍न करेल असा कानमंत्र विद्यार्थ्‍यांना त्‍यांनी यावेळी दिला.Conclusion:
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.