ETV Bharat / city

Mahaparinirvan Din 2022 : चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायीेसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचे पालिका आयुक्तांचे निर्देश

यंदाच्या 6 डिसेंबर रोजी महापरिनिर्वाण दिनावर कोणतेही निर्बंध नसणार आहेत. मुंबईत दादर चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आहे. या स्मारकात बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात. या अनुयायांना लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंग चहल यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत.( Municipal Commissioner instructions to provide facilities for followers coming to Chaityabhoomi )

Mahaparinirvan Din 2022
चैत्यभूमीवर येणाऱ्या अनुयायीेसाठी सुविधा उपलब्ध करून देण्याचे पालिका आयुक्तांचे निर्देश
author img

By

Published : Oct 8, 2022, 3:04 PM IST

मुंबई - मुंबईमध्ये गेले २ वर्षे कोरोनाचा प्रसार असल्याने निर्बंध लागू होते. यामुळे सर्वच सण साजरा करण्यासाठी काही निर्बंध लावण्यात आले होते. कोरोनाचा प्रसार कमी झाल्याने मुंबईत यंदा सर्वच सण धुमधडाक्यात साजरे करण्यात आले आहेत. यंदाच्या महापरिनिर्वाण दिनावर ( Mahaparinirvan Din ) कोणतेही निर्बंध नसणार आहेत. मुंबईत दादर चैत्यभूमी येथे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मारक आहे. या स्मारकात बाबासाहेबांना अभिवादन करण्यासाठी लाखोंच्या संख्येने अनुयायी येतात. या अनुयायांना लागणाऱ्या सर्व सोयी सुविधा उपलब्ध करून देण्याचे निर्देश पालिका आयुक्त डॉ. इकबाल सिंग चहल ( Municipal Commissioner Dr. Ekbal singh chahal ) यांनी पालिका प्रशासनाला दिले आहेत. ( Municipal Commissioner instructions to provide facilities for followers coming to Chaityabhoomi )

कोविड पूर्व परिस्थितीनुसार नियोजन - सन २०२० व २०२१ या २ वर्षात महापरिनिर्वाण दिनी कोविडच्या पार्श्वभूमीवर निर्बधांचे पालन करुन अनुयायांनी बाबासाहेबांना अभिवादन केले होते. या दोन्ही वर्षी बृहन्मुंबई महानगरपालिकेने केलेल्या विनंतीला व आवाहनांना अनुयायांनी सकारात्मक प्रतिसाद देऊन चैत्यभूमीवर करडी केली नव्हती. या सहकार्यासाठी अनुयायांचे पालिका आयुक्तांनी आभार मानले आहेत. महापालिकेच्या सर्व यंत्रणांना यंदाच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्तची व्यवस्था ही कोविड पूर्व परिस्थितीनुसार म्हणजेच सन २०१९ च्या धर्तीवर करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले आहेत. महापालिका मुख्यालयात महापरिनिर्वाण दिन समन्वय बैठकीत उपस्थितांना मार्गदर्शन करतेवेळी आयुक्त बोलत होते.

सेवा-सुविधांचे नियोजन करण्याचे निर्देश - या बैठकी दरम्यान बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या परिमंडळ २ चे उप आयुक्त रमाकांत बिरादार यांनी ६ डिसेंबरच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त प्रस्तावित करण्यात आलेल्या विविध सेवा-सुविधांची माहिती उपस्थितांना संगणकीय सादरीकरणाद्वारे दिली. यामध्ये प्रामुख्याने नियंत्रण कक्ष, सुशोभिकरण, टेहाळणी मनोरा, निर्देशक फुगा, छायाचित्रांचे प्रदर्शन, रांगेतील व्यवस्था, शासकीय मानवंदना, हेलिकॉप्टर पुष्पवृष्टी, माहिती पुस्तिका, स्वच्छता व्यवस्था, वैद्यकीय व्यवस्था, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, प्रसाधनगृहे, निवासी मंडप, विद्युत व्यवस्था, सुरक्षा व्यवस्था, अग्निशमन व्यवस्था, इत्यादी बाबींची माहिती उपस्थितांना देण्यात आली. बृहन्मुंबई महानगरपालिकेद्वारे सन २०१९ मध्ये दादर येथील चैत्यभूमी व शिवाजी पार्क परिसरात पुरविण्यात आलेल्या व्यवस्थेच्या व सोयी-सुविधांच्या धर्तीवर यंदाचे नियोजन करण्यात येत आहे. याबाबत ज्या ठिकाणी गरज असेल, त्या ठिकाणी अधिक प्रमाणात सेवा-सुविधांचे नियोजन करण्याचे निर्देश त्यांनी दिले. तसेच सर्व यंत्रणांनी आपापसात सुयोग्‍य समन्‍वय साधून कार्यवाही करण्याचे आणि अधिकाधिक प्रभावीपणे सेवा-सुविधा उपलब्ध करुन देण्याचे आदेशही आयुक्‍तांनी दिले.

बैठकीत उपस्थित - महापरिनिर्वाण दिनानिमित्तच्या बैठकीला अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पूर्व उपनगरे) आश्विनी भिडे, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) आशीष शर्मा, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) डॉ. संजीव कुमार, ‘बेस्ट’ उपक्रमाचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्र, मुंबई पोलिस दलाचे अतिरिक्त आयुक्त ज्ञानेश्वर चव्हाण, पोलिस उप आयुक्त प्रणय अशोक, पोलिस उप आयुक्त (वाहतूक) राजतिलक रोशन, पालिकेचे वरिष्ठ अधिकारी तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर महापरिनिर्वाण दिन समन्‍वय समितीचे व संबंधित संस्थांचे पदाधिकारी उपस्थित होते.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.