ETV Bharat / city

Param Bir Singh's Warrant Cancelled : परमबीर सिंग यांच्याविरुद्धचे अजामीनपात्र वॉरंट रद्द

author img

By

Published : Nov 30, 2021, 12:25 PM IST

Updated : Nov 30, 2021, 1:31 PM IST

परमबीर सिंग गुरुवारी मुंबईत आल्यानंतर त्यांनी फरार घोषित अर्ज रद्द करण्यात यावा याकरिता शुक्रवारी अर्ज केला होता त्या अर्जावर आज न्यायालय निर्णय सुनावणी झाली. यावेळी किला कोटाने मरीन ड्राईव्ह खंडणी प्रकरणी परमबीर सिंग यांच्याविरुद्धचे अजामीनपात्र वॉरंट रद्द ( Param Bir Singh's cancelled non-bailable warrant ) केले आहे.

Param Bir Singh's Non-bailable Warrant Cancelled
परमबीर सिंग यांच्याविरुद्धचे अजामीनपात्र वॉरंट रद्द

मुंबई - मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यावर मुंबई मरीन लाईन पोलीस स्टेशनमध्ये खंडणी प्रकरणात मुंबई मुख्य महानगर दंडाधिकारी न्यायालयाने फरारी घोषीत केले होते. परमबीर सिंग गुरुवारी मुंबईत आल्यानंतर त्यांनी फरार घोषित अर्ज रद्द करण्यात यावा याकरिता शुक्रवारी अर्ज केला होता त्या अर्जावर आज न्यायालय निर्णय सुनावणी झाली. यावेळी किला कोटाने मरीन ड्राईव्ह खंडणी प्रकरणी परमबीर सिंग यांच्याविरुद्धचे अजामीनपात्र वॉरंट रद्द ( Param Bir Singh's cancelled non-bailable warrant ) केले आहे.

  • Mumbai's Esplanade Court cancelled non-bailable warrant against former Mumbai Police Commissioner Param Bir Singh in connection with the Marine Drive extortion case after he appeared before the court and filed an application for the same.

    (File Pic) pic.twitter.com/HXmjbOdmmS

    — ANI (@ANI) November 30, 2021 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

परमबीर सिंगविरुद्धचे अजामीनपात्र वॉरंट रद्द -

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर 100 कोटीचा वसुली प्रकरणात ( 100 crore recovery case ) आरोप केल्यानंतर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग मुंबईत दाखल झाले होते. त्यानंतर गोरेगाव पोलीस स्थानकात खंडणी प्रकरणाच्या तपासाकरिता कांदिवली युनिट 11 समोर त्यांची तब्बल 7 तास चौकशी करण्यात आली होती. मुंबईतील मरीन लाईन पोलीस स्टेशनमध्ये खंडणी प्रकरणात गुन्हा संदर्भात न्यायालयाने त्यांना फरार घोषित केले होते. परमबीर सिंग यांच्या वकिलाकडून शुक्रवार (दि 27) न्यायालयात फरार घोषित केलेला आदेश रद्द करण्यात यावा, याकरिता अर्ज करण्यात आला होता या अर्जावर आज मंगळवार (दि. 30) रोजी सुनावणी झाली आहे. आज परमबीर सिंग यांना न्यायालयाकडून दिलासा मिळला असून त्यांच्या विरोधातील अजामीनपात्र वॉरंट रद्द करण्यात आले आहे. यावेळी परमबीर सिंग यांनी न्यायालयात आपण चौकशीला पूर्ण सहकार्य करू असे सांगितले.

काय आहे प्रकरण?

गुन्हा मागे घेण्यासाठी बांधकाम व्यवसायिकाकडून खंडणी मागितल्याचा आरोप परमबीर सिंह यांच्यासह उपायुक्त अकबर पठाण, श्रीकांत शिंदे, पोलीस निरीक्षक आशा कोकरे, पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, संजय पाटील, सुनील जैन, आणि संजय पुनमिया यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके या पोलीस अधिकाऱ्यांवर कारवाई केली असून त्यांना अटक करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके हे वांद्रे गुन्हे शाखा कक्ष ९ मध्ये होते. श्यामसुंदर अग्रवाल यांचे पुतणे शरद अग्रवाल यांच्या तक्रारीवरून ठाण्याच्या कोपरी पोलीस स्टेशनमध्ये वसुलीचा गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी मरीन ड्राइव्ह पोलीस स्टेशनमध्ये नोंदवलेल्या प्रकरणाच्या तपासासाठी एसआयटीची स्थापना करण्यात आली होती आणि तपास करण्यात आला होता त्यानंतर तेच प्रकरण सीआयडीकडे हस्तांतरित करण्यात आले होते. ठाण्यातील बिल्डर अग्रवाल याने दिलेल्या तक्रारीवरून परमबीर सिंग, पोलीस उपायुक्त अकबर पठाण सह पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे, आशा कोरकेसह काही जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला होता. मरीन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता. आता याप्रकरणात पोलीस निरीक्षक नंदकुमार गोपाळे आणि आशा कोरके यांना अटक केली होती.

हेही वाचा - Param Bir Singh : परमबीर सिंग यांची सीआयडीकडून सलग 5 तास चौकशी

Last Updated : Nov 30, 2021, 1:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.