मुंबई - शहर परिसरात आज (बुधवारी) कोरोनाचे 1125 नवे रुग्ण आढळून आले असून 42 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. यामुळे मुंबईमधील कोरोनाग्रस्तांचा आकडा 1 लाख 19 हजार 255 वर पोहचला आहे. तर, मृतांचा आकडा 6 हजार 588 वर पोहचला आहे. मुंबईमधून आज 711 रुग्ण बरे झाल्याने त्यांना डिस्चार्ज देण्यात आला.
आतापर्यंत एकूण 91 हजार 673 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने सध्या मुंबईत 20 हजार 697 सक्रिय रुग्ण आहेत. तर, मुंबईतील रुग्ण बरे होण्याचा दर 77 टक्क्यांवर पोहचला असून रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 80 दिवसांवर पोहचला आहे.
जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोना विषाणूमुळे मुंबईत आज 42 रुग्णांचा मृत्यू झाला. त्यापैकी 31 रुग्णांना दिर्घकालीन आजार होते. मृतांमध्ये 30 पुरुष तर 12 महिला रुग्ण आहेत. मुंबईतून आज 711 रुग्ण बरे झाल्याने त्यांना घरी सोडण्यात आले आहे. यामुळे डिस्चार्ज देण्यात आलेल्या रुग्णांचा आकडा 91 हजार 673 वर पोहचला आहे. मुंबईत कोरोनाचे 1 लाख 19 हजार 255 रुग्ण असून 91 हजार 673 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे. तर, 6 हजार 588 रुग्णांचा मृत्यू झाल्याने सध्या 20 हजार 697 सक्रिय रुग्ण आहेत.
मुंबईत कोरोनाचे रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 77 टक्क्यांवर पोहचले आहे. रुग्ण दुप्पट होण्याचा कालावधी 80 दिवस तर सरासरी दर 0.87 टक्के आहे. मुंबईत सध्या कोरोनाचे रुग्ण आढळून आलेल्या 621 चाळी आणि झोपडपट्टी कंटेन्मेंट झोन घोषित करून सील करण्यात आल्या आहेत. तसेच 5 हजार 609 इमारती व इमारतीच्या विंग, काही मजले सील करण्यात आले आहेत. तर, कोरोनाचे निदान करण्यासाठी 5 लाख 67 हजार 031 इतक्या चाचण्या करण्यात आल्या आहेत.