मुंबई - मुंबईमध्ये गेले दोन वर्षे कोरोना विषाणूचा प्रसार आहे. हा प्रसार सध्या कमी झाला असला तरी या कालावधीत कोरोना, अल्फा, केपा, नाइंटिन ए, द्वेन्टि ए, डेल्टा, डेल्टा डेरिव्हेटिव्ह, ओमायक्रोन, स्टेल्थ बी 2 या व्हेरियंटचे रुग्ण मुंबईत आढळून आले ( Mumbai Corona Variants ) आहेत. पालिकेने केलेल्या उपाययोजना, नागरिकांनी दिलेली साथ यामुळे या सर्व व्हेरियंटवर मात करणे शक्य झाले ( Mumbaikars defeated various variants of Corona ) आहे.
जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्यामधून आले हे व्हेरियंट समोर - मुंबईत कोरोनाच्या कोणत्या व्हेरियंटचा प्रसार आहे, तो किती प्रमाणात आहे यासाठी जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्या ( Genome Sequencing Test ) करण्यात आल्या आहेत. या चाचण्यांमध्ये ऑगस्ट 2021 मधील पहिल्या फेरीत 188 रुग्णांची जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात आली. त्यात 128 रुग्ण डेल्टा, 2 रुग्ण अल्फा तर केपा व इतर व्हेरियंटचे 24 रुग्ण आढळून आले. सप्टेंबर 2021 मधील दुसऱ्या फेरीत 376 रुग्णांची जिनोम सिक्वेन्सिंग करण्यात आली. त्यात 304 रुग्ण डेल्टा व्हेरियंट चे, 2 रुग्ण नाइंटिन ए, 4 रुग्ण द्वेन्टि ए या व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले. ऑक्टोबर 2021 मध्ये तिसऱ्या फेरीत 343 रुग्णांची चाचणी करण्यात आली. त्यात डेल्टा व्हेरियंटचे 185, डेल्टा डेरिव्हेटिव्हचे 117 रुग्ण आढळून आले. नोव्हेंबर 2021 मधील चौथ्या फेरीत 281 रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात 210 रुग्ण डेल्टाचे तर 71 रुग्ण डेल्टा डेरिव्हेटिव्हचे आढळून आले आहेत. डिसेंबर 2021 मध्ये पाचव्या फेरीत 221 रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात डेल्टा डेरिव्हेटिव्हचे 115 तर 2 रुग्ण ओमायक्रोनचे आढळून आले. डिसेंबर 2021 मधील सहाव्या फेरीत 297 रुग्णांच्या चाचण्या करण्यात आल्या. त्यात 183 रुग्ण डेल्टा डेरिव्हेटिव्हचे, 105 रुग्ण डेल्टाचे तर 7 रुग्ण ओमायक्रोनचे आढळून आले आहेत. सातव्या फेरीत डेल्टा व्हेरियंटचे 13 टक्के, डेल्टा डेरिव्हेटिव्हचे 32 टक्के तर ओमायक्रोनाचे 55 टक्के रुग्ण आढळून आले. आठव्या फेरीत ओमायक्रोनचे 89 टक्के, डेल्टा डेरिव्हेटिव्हचे 8 टक्के तर डेल्टाचे 3 टक्के रुग्ण आढळून आले. नवव्या फेरीत 95 टक्के ओमायक्रोनचे रुग्ण, 1.8 टक्के डेल्टा डेरिव्हेटिव्ह, 0.53 टक्के डेल्टाचे आढळून आले आहेत.
स्टेल्थ बी 2 वर मात - जगभरात कोरोनाच्या स्टेल्थ बी 2 व्हेरियंटमुळे अनेक देशात लॉकडाऊन लागला आहे. मात्र मुंबईत स्टेल्थ बी 2 व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत. तर मार्च महिन्यात करण्यात आलेल्या चाचण्यांमधून स्टेल्थ बी 2 व्हेरियंटचे 271 रुग्ण आढळून आले त्यासर्व रुग्णांनी मुंबईत कोरोनाच्या विविध व्हेरियंटचे रुग्ण आढळून आले आहेत. या सर्व व्हेरियंटवर मुंबईकरांनी मात केली आहे. पालिकेने केलेल्या उपाययोजना, राबवलेली लसीकरण मोहीम यामुळे रुग्णसंख्या वाढलेली नाही. जे रुग्ण आढळून आले त्यावर मुंबईकरांनी मात केली आहे अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
जिनोम सिक्वेन्सिंग का - मुंबईत कोरोनाच्या कोणत्या व्हेरियंटचे रुग्ण आढळून येत आहेत याची माहिती मिळवण्यासाठी पॉजिटीव्ह रुग्णांचे नमुने घेऊन जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्या केल्या जातात. कोरोना पॉजिटीव्ह तसेच जे रुग्ण लवकर बरे होत नाहीत अशा रुग्णांचे नमुने जिनोम सिक्वेन्सिंग चाचण्यांसाठी पाठवले जातात. यामुळे रुग्णांना नेमका कोणत्या व्हेरियंटचा संसर्ग आहे याची माहिती मिळते. अशी माहिती मिळाल्याने रुग्णांवर वेळीच उपचार करता येतात. तसेच एखाद्या व्हेरियंटचा प्रसार मोठ्या प्रमाणात होत असल्यास त्याला रोखण्यासाठी उपाययोजना करणे शक्य होते अशी माहिती पालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी यांनी दिली.
या व्हेरियंटचा प्रसार -
कोरोना
अल्फा
केपा
नाइंटिन ए
द्वेन्टि ए
डेल्टा
डेल्टा डेरिव्हेटिव्ह
ओमायक्रोन
स्टेल्थ बी 2