ETV Bharat / city

मुंबईत पूर्व उपनगरांत चार तर पश्चिम उपनगरात पाच प्रभाग वाढणार - western suburbs

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होणार असल्याने पालिकेने निवडणुकीची तयारी करताना २७ प्रभागांच्या सुधारित सीमांकनाचा मसुदा राज्याच्या निवडणूक आयोगाला ऑक्टोबरमध्ये सादर केला होता. यानुसार लोकसंख्या वाढलेल्या भागात नगरसेवकांची संख्यावाढ होणार आहे. काल बुधवारी राज्य सरकारने मंत्रीमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे.

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक
मुंबई महानगरपालिकेची निवडणूक
author img

By

Published : Nov 11, 2021, 1:31 PM IST

मुंबई - पुढील वर्षी फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीच्या (Mumbai Municipal Election) पार्श्वभूमीवर प्रभाग रचना केली जात आहे. काही प्रभागात लोकसंख्या वाढल्याने राज्य सरकारने पालिकेच्या नगरसेवकांची संख्या ९ ने वाढवली आहे. मुंबईच्या पूर्व आणि पश्चिम उपनगरातील प्रभागांची संख्या वाढणार असल्याचे समोर आले आहे. यात पूर्व उपनगरात चार तर पश्चिम उपनगरात पाच प्रभाग वाढणार आहे. मुंबई शहरात मात्र प्रभागात वाढ होणार नाही, असे पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.

लोकसंख्या वाढल्याने नगरसेवकांची संख्या वाढणार -

मुंबई महानगरपालिकेची निवडणूक फेब्रुवारी २०२२ मध्ये होणार असल्याने पालिकेने निवडणुकीची तयारी करताना २७ प्रभागांच्या सुधारित सीमांकनाचा मसुदा राज्याच्या निवडणूक आयोगाला ऑक्टोबरमध्ये सादर केला होता. यानुसार लोकसंख्या वाढलेल्या भागात नगरसेवकांची संख्यावाढ होणार आहे. काल बुधवारी राज्य सरकारने मंत्रीमंडळ बैठकीत याबाबत निर्णय घेण्यात आला आहे. मुंबई महापालिकेत २२७ नगरसेवक आहेत. त्यात ९ नगरसेवकांची वाढ करण्याचा निर्णय सरकारने घेतला आहे. यामुळे मुंबई महापालिकेतील नगरसेवकांची संख्या २३६ होणार आहे. मुंबई शहर विभागात ५६, पूर्व उपनगरात ६९ तर पश्चिम उपनरात १०२ प्रभाग असे मिळून २२७ प्रभाग आहेत. यात ९ प्रभाग वाढल्याने प्रभागांची संख्या आता २३६ होणार आहेत.

या भागातील नगरसेवक वाढणार -

  • पवई, विक्रोळी-जोगेश्वरी लिंक रोड
  • भांडूप-मुलुंड पश्चिम भाग
  • विक्रोळी-कांजूरमार्ग पूर्व
  • नाहूर, भांडूप पश्चिम
  • अंधेरी पश्चिम
  • गोरेगाव पश्चिम
  • मालाड पश्चिम
  • कांदिवली विभाग
  • बोरिवली-दहिसर

अशी वाढली नगरसेवकांची संख्या -

वर्ष - नगरसेवकांची संख्या

  • १९७२ - ६४
  • १९६३ - १४०
  • १९८२ - १७०
  • १९९२ - २२१
  • २००२ - २२७
  • २०२१ - २३६

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.