मुंबई - दिल्लीपाठोपाठ मुंबईतही वायू प्रदूषणाची वाढले आहे. मुंबईतील कुलाबा या भागातील हवेच्या गुणवत्तेच्या निर्देशांकाची तुलना दिल्लीशी होऊ लागली आहे. आज मंगळवारी दिल्लीच्या हवेचा गुणवत्ता निर्देशांक हा 370 इतका होता. तर कुलाबा परिसरातील हाच निर्देशांक 374 इतका नोंद झाला आहे.
फटक्यांची आतिषबाजी ठरली कारणीभूत!
दिवाळी सुरू झाल्यापासून मुंबईच्या हवेचा निर्देशांक घसरत आहे. मुंबईतील काही भागाची हवेची पातळी दिल्लीपेक्षा जास्त घसरली आहे. मुंबईत कडक लॉकडाऊन झाल्यानंतर हवेची पातळी सुधारली होती. मात्र आता परिस्थिती नियंत्रणात आल्यानंतर हवेच्या गुणवत्तेत घसरण होत आहे. फटक्यांची आतिषबाजीसुद्धा या वाढीसाठी कारणीभूत आहे. मागील वर्षी असलेली फटाक्याची बंदी यामुळे मागील वर्षी हवेची गुणवत्ता दिवाळीमध्ये चांगली नोंद घेण्यात आली होती मात्र यावर्षी बंदी नसल्यामुळे हवेची गुणवत्ता घसरली आहे.
नागरिकांना वातावरणाचा त्रास -
लक्ष्मीपूजनाच्या दिवशी मुंबईच्या हवेची गुणवत्ता घसरली होती. वाढत्या हवा प्रदूषणाचा फटका नागरिकांच्या आरोग्याला देखील बसत आहे. प्रदुषित वातावरणामुळे वृद्ध आणि मुलांना धोका आहे. त्यांना या वातावरणाचा जास्त त्रास सहन करावा लागू शकतो असे सफर या निरीक्षण संस्थेने म्हटले आहे.
हेही वाचा - शांत शहर असलेल्या अमरावती शहराला हिंसाचाराचे गालबोट का लागले? समाज अभ्यासकांनी 'हे' व्यक्त केले मत
हेही वाचा - गडचिरोलीत 26 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालणारे सोमय मुंडे कोण आहेत? जाणून घ्या...