मुंबई - मुंबईत लसीकरणाला मोठ्या प्रमाणात प्रतिसाद मिळत आहे. यामुळे लसीचा सातत्याने तुटवडा जाणवत आहे. लसीच्या तुटवड्यामुळे 132 पैकी 37 लसीकरण केंद्रांवर आज रविवारी लसीकरण करण्यात आले, इतर केंद्र बंद ठेवण्यात आली. त्यानंतरही 23 हजार 419 लाभार्थ्यांचे लसीकरण करण्यात आले. लसीचा साठा उपलब्ध झाल्याने पुढील तीन दिवस लसीकरण सूरु राहील अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
लसीकरणाची आकडेवारी -
मुंबईत रविवारी 23 हजार 419 हजार लाभार्थ्यांना लस देण्यात आली. त्यात 12 हजार 137 लाभार्थ्यांना पहिला तर 11 हजार 282 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 22 लाख 37 हजार 283 लाभार्थ्यांना लस देण्यात आली त्यात 18 लाख 69 हजार 576 लाभार्थ्यांना पहिला तर 3 लाख 67 हजार 707 लाभार्थ्यांना दुसरा डोस देण्यात आला. आतापर्यंत एकूण 2 लाख 75 हजार 793 आरोग्य कर्मचारी, 3 लाख 15 हजार 308 फ्रंटलाईन वर्कर, 8 लाख 71 हजार 185 जेष्ठ नागरिक तर 45 ते 59 वर्षामधील गंभीर आजार असलेल्या 7 लाख 74 हजार 997 लाभार्थ्यांना लस देण्यात आली.
लसीचा साठा उपलब्ध -
मुंबईत रोज 30 ते 50 हजार लाभार्थ्यांचे लसीकरण केले जात आहे. यामुळे लसीचा तुटवडा जाणवू लागला आहे. लसीचा तुटवडा असल्याने 132 पैकी 37 केंद्रांवर आज लसीकरण करण्यात आले. आज लसीचा साठा आला नसता तर लसीकरण ठप्प होणार होते. मात्र 1 लाख 58 हजार लसीचा साठा महापालिकेकडे उपलब्ध झाला आहे. यामुळे पुढील तीन दिवस लसीकरण मोहीम सुरू राहील अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाकडून देण्यात आली आहे.
लसीकरण मोहीम -
मुंबईत कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी 16 जानेवारीपासून कोरोना लसीकरणाला सुरुवात झाली. सुरुवातीला आरोग्य कर्मचारी व फ्रंट लाईन वर्करना लस दिली जात होती. 1 मार्चपासून 60 वर्षावरील वयोवृद्ध तसेच 45 ते 59 वर्षामधील विविध गंभीर आजार असलेल्या नागरिकांना लस दिली जात आहे.
एकूण लसीकरण -
आरोग्य कर्मचारी - 2,75,793
फ्रंटलाईन वर्कर - 3,15,308
जेष्ठ नागरिक - 8,71,185
45 ते 59 वय - 7,74,997
एकूण - 22,37,283