ETV Bharat / city

मुंबई विद्यापीठाने दिले मोबाईल अॅपवर हॉलतिकीट; बीकॉमच्या विद्यार्थ्यांना दिलासा - hall ticket

मुंबई विद्यापीठाच्या बी. कॉम सत्र-६ ची परीक्षा ३ एप्रिलपासून सुरू होत आहेत. या परीक्षेची ५७ हजारांपेक्षा जास्त प्रवेशपत्रे (हॉल तिकीट) विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये देण्यात आलेली आहेत. त्यासोबत पहिल्यांदाच विद्यापीठाने संबधित परीक्षेच्या २० दिवस आधी प्रवेशपत्रे एका मोबाईल अॅपरही उपलब्ध करून दिली आहेत.

मुंबई विद्यापीठाने मोबाईल अॅपवर हॉलतिकीट उपलब्ध करून दिले आहे.
author img

By

Published : Mar 17, 2019, 9:15 AM IST

मुंबई - विद्यार्थ्यांना परीक्षा आणि त्या काळात येणाऱ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने मुंबई विद्यापीठाने बी. कॉमच्या ५५ हजार विद्यार्थ्यांना मोबाईलवर हॉलतिकिट उपलब्ध करून दिले आहे. एका अ्ॅपवर हे हॉलतिकिट उपलब्ध केले असल्याची माहिती आज विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून देण्यात आली.

मुंबई विद्यापीठाच्या बी. कॉम सत्र-६ ची परीक्षा ३ एप्रिलपासून सुरू होत आहेत. या परीक्षेची ५७ हजारांपेक्षा जास्त प्रवेशपत्रे (हॉल तिकीट) विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये देण्यात आलेली आहेत. त्यासोबत पहिल्यांदाच विद्यापीठाने संबधित परीक्षेच्या २० दिवस आधी प्रवेशपत्रे एका मोबाईल अॅपरही उपलब्ध करून दिली असून त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे. महाविद्यालयाच्या लॉगिनमध्येही प्रवेशपत्रे उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत.

हॉलतिकिटवरील तपशील दुरुस्तीसाठी 20 मार्चपूर्वी करा अर्ज

व्यक्तिगत तपशील, मराठीतील नाव, छायाचित्र व स्वाक्षरी या सर्व माहितीचा उपयोग विद्यापीठ गुणपत्रिका, पदवी, प्रमाणपत्रे व विविध प्रमाणपत्रे यावर करीत असल्याने या तपशिलात दुरुस्ती करणे आवश्यक आहे. दरम्यान, जर विद्यार्थ्यास त्याच्या तपशिलात दुरुस्ती करावयाची असेल तर त्यांनी तशी विनंती त्यांच्या सबंधित महाविद्यालयाकडे करायची आहे. महाविद्यालयांनी या दुरुस्त्या विद्यापीठाकडे पाठविल्यास, त्याचा तपशील दुरुस्त केला जाईल. या दुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांनी २० मार्च पूर्वी महाविद्यालयाकडे विनंती करणे आवश्यक असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.

बी.कॉम सत्र-५ ला विद्यार्थ्यांनी ज्या परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली, तेच परीक्षा केंद्र बीकॉम सत्र-६ च्या परीक्षेत निश्चित केलेले आहे. ही परीक्षा केंद्रे व त्यांचा पत्ता सत्र-६ च्या प्रवेशपत्रावर टाकण्यात आलेला आहे. यामुळे विद्यार्थ्यास ऐनवेळी परीक्षा केंद शोधण्यास वेळ लागणार नाही, असा दावा विद्यापीठाने केला आहे.

Intro:मुंबई विद्यापीठाने दिले मोबाईल ॲपवर हॉलतिकीटBody:मुंबई विद्यापीठाने दिले मोबाईल ॲपवर हॉलतिकीट
बीकॉमच्या 57 हजार विद्यार्थ्यांना मिळाला दिलासा
मुंबई, ता. 16 :
विद्यार्थ्यांना परीक्षा आणि त्या काळात येणाऱ्या अडचणींना सामोरे जावे लागत असल्याने त्यातून विद्यार्थ्यांची सुटका करण्यासाठी मुंबई विद्यापीठाने बी.कॉमच्या 55 हजार विद्यार्थ्यांचे हॉलतिकिट त्यांना मोबाईलवर उपलब्ध करून दिले आहे. त्यासाठी विद्यापीठाने एका ॲपवर हे हॉलतिकिट उपलब्ध केले असल्याची माहिती आज विद्यापीठाच्या परीक्षा विभागाकडून देण्यात आली.
मुंबई विद्यापीठाच्या बीकॉम सत्र-6 ची परीक्षा 3 एप्रिलपासून सुरू होत आहेत. या परीक्षेची 57 हजारापेक्षा जास्त प्रवेशपत्रे (हॉल तिकीट) विद्यार्थ्यांच्या लॉगिनमध्ये देण्यात आलेली असून त्यासोबत पहिल्यांदाच विद्यापीठाने संबधित परीक्षेच्या 20 दिवस आधी आणि एका मोबाईल ॲपरही उपलब्ध करून दिली असून त्यामुळे हजारो विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
विद्यापीठाने 57 हजाराहून अधिक विद्यार्थ्यांना ही प्रवेशपत्रे देण्यात आली असून, ही प्रवेश पत्रे विद्यार्थ्यांच्या मोबाईल ॲपसोबतच ई-सुविधाच्या लॉगिनमध्ये, तसेच महाविद्यालयाच्या लॉगिन मध्येही उपलब्ध करून देण्यात आलेली आहेत. विद्यार्थ्यांनी परीक्षेचे प्रवेशपत्र डाउनलोड केल्यानंतर प्रवेशपत्रावरील इंग्रजीतील नाव, मराठीतील नाव, आईचे नाव व विषय काळजीपूर्वक तपासावे. तसेच स्वतःचे छायाचित्र व स्वाक्षरी देखील पहावी, कारण अनेक विद्यार्थ्यांचे छायाचित्र व स्वाक्षरी ही प्रथम वर्षात प्रवेश घेतानाची असते. विद्यार्थी ज्यावेळी मुंबई विद्यापीठात प्रथम वर्षात प्रवेश घेतो, त्यावेळी त्याचा व्यक्तिगत तपशील, छायाचित्र व स्वाक्षरी ही त्यावेळची असते यामुळे तीन वर्षानंतर, त्यात काही बदल होण्याची शक्यता असते. तसेच विद्यापीठाच्या नियमानुसार विद्यार्थ्यांचे आडनाव, नाव, वडिलांचे नाव व आईचे नाव अशी क्रमवारी प्रवेश घेतेवेळेस प्रवेशाच्या नोंदणी अर्जात असणे आवश्यक असते व या नावाचा तपशील मराठीतूनही (देवनागरी लिपीत) असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्याचे छायाचित्र व स्वाक्षरी ही देखील प्रवेश नोंदणीच्या वेळेची असते. यामध्ये काही बदल असण्याची शक्यता असू शकते किंवा विषयामध्येही काही दुरुस्ती असण्याची शक्यता असते. व्यक्तिगत तपशील, मराठीतील नाव, छायाचित्र व स्वाक्षरी या सर्व माहितीचा उपयोग विद्यापीठ गुणपत्रिका, पदवी, प्रमाणपत्रे व विविध प्रमाणपत्रे यावर करीत असल्याने या तपशिलात दुरुस्ती करणे आवश्यक आहे.
दरम्यान, जर विद्यार्थ्यास त्याच्या तपशिलात दुरुस्ती करावयाची असेल तर त्यांनी तशी विनंती त्यांच्या सबंधित महाविद्यालयाकडे करावयाची आहे. व महाविद्यालयांनी या दुरुस्त्या विद्यापीठाकडे पाठविल्यास, त्याचा तपशील दुरुस्त केला जाईल. या दुरुस्तीसाठी विद्यार्थ्यांनी २० मार्च पूर्वी महाविद्यालयाकडे विनंती करणे आवश्यक असल्याचे विद्यापीठाने म्हटले आहे.
विद्यार्थ्यांना बीकॉम सत्र-6 परीक्षेच्या प्रवेश पत्रावर ज्या विद्यार्थ्यांनी बीकॉम सत्र-5 ला ज्या परीक्षा केंद्रावर परीक्षा दिली, तेच परीक्षा केंद्र बीकॉम सत्र-6 च्या परीक्षेत निश्चित केलेले आहे. ही परीक्षा केंद्रे व त्यांचा पत्ता सत्र-6 च्या प्रवेशपत्रावर टाकण्यात आलेला आहे. यामुळे विद्यार्थ्यास ऐनवेळी परीक्षा केंद शोधण्यास वेळ लागणार नाही, असा दावा विद्यापीठाने केला आहे.Conclusion:मुंबई विद्यापीठाने दिले मोबाईल ॲपवर हॉलतिकीट
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.