ETV Bharat / city

वरळी : जिजामाता नगर दवाखाना व आरोग्य केंद्राचे लोकार्पण

जिजामाता नगर येथील नूतनीकरण केलेल्या जिजामाता नगर दवाखाना व आरोग्य केंद्राचे लोकार्पण मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले.

जिजामाता नगर दवाखाना व आरोग्य केंद्र
जिजामाता नगर दवाखाना व आरोग्य केंद्राचे लोकार्पण प्रसंगी आदित्य ठाकरे
author img

By

Published : May 27, 2021, 4:42 PM IST

मुंबई - जी/दक्षिण विभागातील जी/दक्षिण प्रभाग समिती अध्यक्ष व स्थानिक नगरसेवक दत्ता नरवणकर यांच्या प्रयत्नाने जिजामाता नगर येथील नूतनीकरण केलेल्या जिजामाता नगर दवाखाना व आरोग्य केंद्राचे लोकार्पण मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री व राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले. यामुळे या विभागातील नागरिकांना चांगल्या प्रकारची आरोग्य सेवा उपलब्ध होणार आहे.

यांची होती उपस्थिती

मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर, खासदार अरविंद सावंत यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या कार्यक्रमाला बेस्ट समिती अध्यक्ष आशिष चेंबूरकर, माजी आमदार सचिन अहिर, माजी आमदार सुनील शिंदे, जी/दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त शरद उघडे तसेच संबंधित वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते. प्रारंभी, मान्यवरांनी संपूर्ण आरोग्य केंद्राची पाहणी करून संबंधित डॉक्टरांशी चर्चा केली. या आरोग्य केंद्रामध्ये बाह्यरुग्ण चिकित्सा, उच्च रक्तदाब व मधुमेह तपासणी, रेबीज विरोधी लस, धनुर्वात प्रतिबंधक लस तसेच सामान्य लसीकरण व कोरोनाबाबत विशेष मार्गदर्शन करण्यात येणार आहे. या आरोग्य केंद्रांमध्ये एकूण ३५ कर्मचाऱ्यांचा स्टाफ कार्यरत राहणार असून उल्लेखित केलेल्या सेवा नियमितपणे देण्यात येणार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.