मुंबई - केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईतील जूहू येथील अधिश बंगल्यातील सीआरझेडच्या ( CRZ ) अटींच्या उल्लंघन प्रकरणी मुंबई महापालिकेनंतर ( Mumbai Municipal Corporation ) राणेंना आता मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने ( Mumbai Suburban Collectorate ) नोटीस बजावले आहे. मुंबई महापालिकेच्या पथकाने यापूर्वी नारायण राणे ( Narayan Rane notice ) यांच्या घराची पाहणी केली होती. तसेच मुंबई महानगरपालिकेने याआधी राणेंना नोटीस पाठवली होती.
महापालिकेची नोटीस : राज्यात महाविकास आघाडी आणि भाजपा यांच्यातील कुरघोडीचे राजकारण काही थांबताना दिसत नाही. केंद्रातील तपास यंत्रणांचा गैरवापर होत असल्याचा आरोप मविआकडून होत असताना राज्यातील सरकार भाजपा नेत्यांवर सूडाने कारवाई करत आहे, असा आरोप भाजपा नेत्यांकडून केला जात आहे. दरम्यान आज केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या अडचणींमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. मुंबईतील जूहू येथील अधिश बंगल्यातील सीआरझेडच्या अटींच्या उल्लंघन प्रकरणी मुंबई महापालिकेनंतर राणेंना आता मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाने नोटीस बजावले आहे. मुंबई महापालिकेच्या पथकाने यापूर्वी नारायण राणे यांच्या घराची पाहणी केली होती. तसेच मुंबई महानगरपालिकेने याआधी राणेंना नोटीस पाठवली होती. त्यानंतर आता जिल्हाधिकारी कार्यालयातून राणेंना नोटीस पाठवली गेली आहे. नारायण राणे यांना या प्रकरणी सुनावणीसाठी 10 जून रोजी उपस्थित राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
काय आहे प्रकरण ? : 2007 मध्ये पर्यावरण मंत्रालयाने सीआरझेड अंतर्गत एनओसी दिली होती. त्यातील 2 अटींचे उल्लंघन नारायण राणेंनी केले असल्याचे समोर आले आहे. नियमानुसार १ एफएसआय होता. त्याऐवजी 2.12 एफएसआय वापरला गेला. तसेच 2810 चौमी बांधकाम परवानगी होती. त्याऐवजी 4272 चौमी बांधकाम केले आहे. म्हणजे 1461 चौमी जादा बांधकाम केले आहे. मुंबई उपनगर जिल्हाधिकाऱ्यांच्या अंतर्गत येते सुनावणीला उपस्थित न राहिल्यास या विषयावर तुमच्याकडे कोणतेही पुरावे नाहीत, असे समजून आम्ही पुढील कारवाई करणार असल्याचे नोटीसीत नमूद करण्यात आले आहे. मुंबई महापालिकेनंतर आता मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयाचा बडगा उगारत जुहू येथील अधिश बंगला सीआरझेड उल्लंघनप्रकरणी नारायण राणेंना नोटीस दिली आहे. त्यामुळे नारायण राणेंच्या समोरील अडचणी वाढल्या आहेत. दरम्यान राज्य सरकार सूडबुद्धीने कुरघोडीचे राजकारण करत असल्याची टीका भाजपा नेत्यांनी दिली आहे.
हेही वाचा - नांदेडात खळबळ : माजी मंत्र्यांच्या घरात घुसला बंदूकधारी तरुण, केली खंडणीची मागणी