ETV Bharat / city

Salman Khan : सलमान खानला अंतरिम दिलासा देण्यास मुंबई सत्र न्यायालयाचा नकार - Salman Khan Vs Ketan Kakkar Case

सुपरस्टार सलमान खानला अंतरिम दिलासा देण्यास मुंबई सत्र न्यायालयाने नकार दिला ( Interim Relief To Salman Khan Refused ) आहे. केतन कक्करच्या विरोधात सलमानने याचिका दाखल केली ( Salman Khan Vs Ketan Kakkar Case ) होती. त्यावर कक्करने बदनामीकारक विधानं करू नयेत, अशी मागणी करण्यात आली होती. मुंबई सत्र न्यायालयाने ( Mumbai Session Court ) तूर्तास तरी याबाबत आदेश न देता विनंती फेटाळून लावली.

सलमान खान
सलमान खान
author img

By

Published : Mar 23, 2022, 4:52 PM IST

मुंबई : बॉलीवूड अभिनेता सलमान खान सतत वेगवेगळ्या कारणांसाठी चर्चेत असतो. सलमानने शेजाऱ्याविरोधात अब्रुनुकसानीचा दावा केला आहे. सलमानने मुंबई सत्र न्यायालयात पनवेल येथील फार्म हाऊसजवळील जमिनीच्या मालकाविरोधात अब्रुनुकसानीचा खटला दाखल केला आहे. या याचिकेवर आज मुंबई सत्र न्यायालयाने निकाल देत सलमान खानला अंतरिम दिलासा देण्यास नकार दिला आहे. न्यायाधीश अनिल लद्दाद यांनी हा निकाल दिला आहे. त्यामुळे सलमान खान यांच्या अडचणी वाढल्या आहेत. कोर्टानं हा खटला प्रलंबित असेपर्यंत संबंधित जमीन मालकाने कुठलीही बदनामीकारक विधाने करू नयेत, असे अंतरिम आदेश तातडीनं देण्याची विनंतीही सलमानने केली होती. मात्र, तूर्तास तसे कोणतेही आदेश न देता कोर्टानं सलमान खानची मागणी फेटाळून लावली आहे.

ट्विटर, फेसबुक, युट्युब, गुगल प्रतिवादी सलमान खानने दाखल केलेल्या याचिकेत म्हटले आहे की, केतन कक्करने एका यूट्यूब चॅनलवर बोलताना आपल्याबद्दल आक्षेपार्ह शब्द वापरले होते. त्यामुळे माझ्याबद्दल असलेला हा आक्षेपार्ह कंटेट काढून टाकला जावा आणि ज्या प्लॅटफॉर्मवर हा कंटेट उपलब्ध आहे ते ब्लॉक केले जावे, अशी मागणी सलमान खानने याचिकेत केली होती. त्यासोबतच सदर व्हिडीओतील अन्य दोन जणांना प्रतिवादी करण्यात आले होते. याप्रकरणी ट्विटर, फेसबुक, यूट्युब आणि गुगललाही सलमाननं प्रतिवादी केले होते.

केतन क्ककडचा व्हिडिओ आरोप काय किर्तन क्ककड यांनी व्हिडीओ पोस्ट आणि ट्विटरवरून केलेले आरोप हे खोटे अपमानास्पद आणि बदनामी असून, त्यामुळे सलमान आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांना नाहक त्रासाला सामोरे जावे लागत असल्याचा दावा सलमानच्यावतीनं बाजू मांडताना केला गेला. मुळात सलमान आणि एनआरआय असलेल्या कक्कडमध्ये जागेच्या अतिक्रमणावरून वाद आहे. मात्र कक्कड यानं केलेले हे सर्व आरोप वैयक्तिक पातळीवरचे आहेत. चाईल्ड ट्रॅफिकिंग, ड्रग ट्रॅफिकिंग, बलात्कार, सुशांत सिंगला ठार मारले, अंडरवर्ल्डशी संबंध, लँड माफिया, दहशतवादी असे अनेक आरोप कोणताही पुरावा नसताना कक्कड यांच्याकडनं केले गेले आहेत. तसेच या प्रकरणाला धार्मिक रंगही देण्याचा प्रयत्नही केला गेला आहे. असा आरोपही सलमानच्यावतीनं कोर्टात करण्यात आला.

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.