ETV Bharat / city

Goregaon Ransom Case : गोरेगाव खंडणी प्रकरणातील विमल सिंग याचा जामीन मंजूर - मुंबई उच्च न्यायालय

मुंबईतील खंडणी प्रकारणात अटकेत असलेल्या विनय सिंह याचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने ( Mumbai Sessions Court ) मंजूर केला ( Grants Bail to Vimal Singh ) आहे. व्यापारी विमल अग्रवाने यांनी दिलेल्या तक्रारीवरुन मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात परमबीर सिंह, सचिन वाझे, विनय सिंह, अल्पेश पटेल व रियाज भाटी यांच्याविरोधात विविध कलमान्वये खंडणीचा गुन्हा दाखल झाला ( Goregaon Ransom Case ) आहे.

मुंबई सत्र न्यायालय
मुंबई सत्र न्यायालय
author img

By

Published : Jan 20, 2022, 6:32 PM IST

मुंबई - व्यापारी विमल अग्रवालने परमबीर सिंह, सचिन वाझे, विनय सिंह आणि आणखी दोन जणां विरोधात गोरेगाव पोलीस ठाण्यात ( Goregaon Police Station ) खंडणीबाबत ( Goregaon Ransom Case ) तक्रार दिली होती. त्यानुसार गुन्हा दाखल झाला होता. या प्रकरणात आतापर्यंत चार आरोपींना अटक करण्यात आली होती. आज (दि. २० जानेवारी) विनय सिंह यांचा जामीन अर्ज मुंबई सत्र न्यायालयाने ( Mumbai Sessions Court ) मंजूर केले आहे. 30 हजाराच्या कॅश सिक्युरिटीवर जामीन मंजूर केला ( Grants Bail to Vimal Singh ) आहे.

काय आहे प्रकरण..? - गोरेगावमधील विमल अग्रवाल नावाच्या व्यापाऱ्याने परमबीर सिंह, सचिन वाझे, सुमित सिंह, अल्पेश पटेल, विनय सिंह आणि रियाज भाटी यांच्याविरोधात तक्रार दाखल केली होती. त्यानुसार अग्रवाल यांचे भागिदारीत गोरेगाव येथे रेस्टॉरंट आणि बार आहे. अंधेरीमध्ये स्टोअर आणि बार आहे. हे दोन्ही चालू ठेवण्यासाठी सचिन वाझे आणि अन्य आरोपींनी 9 लाख रुपये घेतले होते. ही वसुली जानेवारी-फेब्रुवारी, 2020 पासून ते मार्च, 2021 या काळात केली आहे, असा आरोप अग्रवाल यांनी तक्रारीत केला होता. अग्रवाल यांच्या आरोपानंतर मुंबई पोलिसांनी याप्रकरणी भारतीय दंड संहितेचे कलम 384, 385, 388, 389, 120 ब आणि 34 नुसार गुन्हा दाखल केला आहे.

विनय सिंह स्वतः झाला होता पोलिसांसमोर हजर - पोलिसांनी केलेल्या तपासानंतर परमबीर सिंह यांच्यासोबत विनय सिंहही बरेच दिवस फरार होता. त्यामुळे परमबीर सिंह यांच्यासोबतच पोलिसांनी विनयलाही फरार घोषीत करण्याची प्रक्रीया सुरू करण्याची विनंती न्यायालयाला केली होती. न्यायालयानेही विनय सिंह याला फरार घोषित करण्याची परवानगी दिली होती. या विरोधात विनय सिंहने मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. मुंबई उच्च न्यायालयाने विनय सिंहला फरार घोषीत करण्याचा निर्णय नंतर रद्द केला होता. त्यानंतर विनय सिंह याने गोरेगाव पोलीस ठाण्यात हजर राहून स्वतःला अटक करून घेतली होती. खंडणी प्रकरणात आत्तापर्यंत ही तिसरी अटक आहे. यापूर्वी, सुमित सिंह उर्फ चिंटू आणि अल्पेश पटेल या दोघांना अटक केलेली आहे तर रियाझ भाटी हा अद्याप फरार आहे.

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.