ETV Bharat / city

Bachchu Kadu Grants Bail : माजी मंत्री बच्चू कडू यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून जामीन मंजूर - मंत्रालयातील आयटी विभागाच्या सचिवांना मारहाण

माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना जामीन former minister Bachchu Kadu mumbai Sessions Court grants bail मंजूर केला आहे. मंत्रालयातील आयटी विभागाच्या सचिवांना मारहाण प्रकरणातील गुन्ह्यांमध्ये त्यांना जामीन मंजूर झाला आहे.

Bachchu Kadu
Bachchu Kadu
author img

By

Published : Sep 21, 2022, 12:04 PM IST

Updated : Sep 21, 2022, 8:16 PM IST

मुंबई - माजी मंत्री आणि आमदार बच्चू कडू यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाने त्यांना जामीन former minister Bachchu Kadu mumbai Sessions Court grants bail मंजूर केला आहे. मंत्रालयातील आयटी विभागाच्या सचिवांना मारहाण प्रकरणातील गुन्ह्यांमध्ये त्यांना जामीन मंजूर झाला आहे. मागील आठवड्यात गिरगाव कोर्टाने बच्चू कडू यांना अटक करून 14 दिवसाच्या न्यायालयांकडे पाठवल्यानंतर सत्र न्यायालयाने अंतरिम दिलासा दिला होता. आज जामीन मंजूर केला आहे.

मुंबई सत्र न्यायालय - मंत्रालयातील आयटी विभागाच्या सचिवांना मारहाण प्रकरणात गिरगावकर समोर हजर होत नसल्याने, बच्चू कडू यांच्या विरोधात जामीन पात्र वॉरंट जारी करण्यात आला होता. हा रद्द करण्यासाठी गिरगाव महानगर दंडाधिकारी न्यायालयात बच्चू कडू यांनी धाव घेतली होती. त्यांना अटक करण्याचे निर्देश न्यायाधीशांनी दिले होते. त्यानंतर त्यांची 14 दिवसांसाठी न्यायालयीन कोठडीत रवानगी करण्यात आली होती. मात्र, मुंबई सत्र न्यायालयात त्यांनी धाव घेतल्याने त्यांना मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पी एम एल ए कोर्टाचे न्यायाधीश राहुल रोकडे यांनी कडू यांना जामीन मंजूर केला आहे.

काय आहे प्रकरण - 26 सप्टेंबर 2018 रोजी पोर्टलसंबधित प्रकरणाबाबत मंत्रालयमध्ये काम करणाऱ्या तत्कालीन माहिती तंत्रज्ञान संचालक पी. प्रदीप यांना भेटण्यासाठी बच्चू कडू गेले होते. त्यावेळी झालेल्या बाचाबाचीमध्ये बच्चू कडू यांनी टेबलवर असलेला लॅपटॉप उचलून प्रदीप यांच्यावर उगारल्याचा आरोप त्यांच्यावर करण्यात आला आहे. या घटनेचे तीव्र पडसाद कर्मचारी संघटनेत उमटले होते आणि मंत्रालय कर्मचाऱ्यांनी काम बंद आंदोलनही केलं होतं. त्यानंतर बच्चू कडू यांच्यावर आंदोलन करताना सरकारी कर्मचाऱ्यांच्या कामात अडथळा आणल्याबद्दल आयपीसी कलम 353, 504 आणि 506 अंतर्गत फौजदारी तक्रार मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात दाखल करण्यात आली आहे.

Last Updated : Sep 21, 2022, 8:16 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.