ETV Bharat / city

एकनाथ खडसेंना दिलासा, भोसरी जमीन खरेदी प्रकरणात अंतरिम जामीन मंजूर - एकनाथ खडसे बातमी

एकनाथ खडसे यांच्यावर पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्याचे आरोप आहेत. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती.

Eknath Khadse
एकनाथ खडसे
author img

By

Published : Oct 25, 2021, 10:11 PM IST

मुंबई - राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्यावर पुण्यातील भोसरी जमीन घोटाळ्याचे आरोप आहेत. त्यांनी अटकपूर्व जामिनासाठी न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाकडून खडसेंना तात्पुरता दिलासा मिळाला आहे. मुंबई सत्र न्यायालयाच्या विशेष न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे.

भोसरी जमीन घोटाळा प्रकरणी एकनाथ खडसेंच्या पत्नी मंदाकिनी खडसेंना देखील काही दिवसांपूर्वी मुंबई उच्च न्यायालयाने दिलासा दिला होता. याप्रकरणी तूर्तास अटक न करण्याचे ईडीला निर्देश देण्यात आले आहेत. तसेच तपास यंत्रणेला या तपासात सहकार्य करण्याचे निर्देशही न्यायालयाने खडसेंना दिले आहेत.

हेही वाचा - एनसीबी आणि प्रभाकर साईलच्या सुरक्षा मुद्यावरुन मुख्यमंत्र्यांसोबत झाली चर्चा - गृहमंत्री

  • काय आहे प्रकरण?

फडणवीस सरकारमध्ये एकनाथ खडसे महसूल मंत्री असताना त्यांनी पुण्यातील भोसरी येथे 3.1 एकर एमआयडीसी प्लॉट खरेदी करण्यासाठी आपल्या पदाचा गैरवापर केल्याचा आरोप 2016 मध्ये झाला होता. 31 कोटी रुपयांची किंमत असलेल्या या भूखंडाची निव्वळ 3.7 कोटी रुपयांना विक्री झाल्याचा दावा केला होता. रेडी रेकनर दरापेक्षा खूपच कमी बाजारमूल्य दाखवून जमिनीची खरेदी झाल्याचा आरोप आहे.

हा भूखंड अब्बास उकानी यांच्या मालकीचा होता. त्यांच्याकडून एमआयडीसीने 1971 मध्ये तो अधिग्रहित केला होता, परंतु उकानी यांना नुकसान भरपाई देण्याचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित आहे. खडसे यांनी 12 एप्रिल, 2016 रोजी बैठक बोलावली आणि अधिकाऱ्यांना जमीन उकानींना परत द्यावी की त्यांना जास्त नुकसान भरपाई द्यावी याविषयी त्वरित निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचा दावा केला. लगेच 15 दिवसातच उकानी यांनी खडसे यांच्या पत्नी मंदाकिनी खडसे आणि जावई गिरीश चौधरी यांना भूखंड विक्री केल्याचं समोर आलं होतं.

हेही वाचा - "तीन वर्षांत देशातील सर्व रस्ते अमेरिकेतील रस्त्यांसारखे" ईटीव्ही भारतला दिलेल्या विशेष मुलाखतीत नितीन गडकरींचा विश्वास

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.