मुंबई - मुंबईत गेले काही दिवस कोरोना विषाणूच्या रुग्णांची संख्या वाढली होती. रोज 7 ते 11 हजाराच्यावर रुग्ण आढळून येत होते त्यात गेल्या काही दिवसात घट होत आली आहे. गेले दोन दिवस तेराशे ते चौदाशे रुग्ण आढळून येत होते त्यात आज घट होऊन 1057 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे. आज 48 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 1312 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला आहे.
रुग्ण दुपटीचा कालावधी 334 दिवस -
मुंबईत आज 1 हजार 057 रुग्ण आढळून आले आहेत. यामुळे कोरोनाग्रस्तांचा आकडा 6 लाख 98 हजार 867 वर पोहचला आहे. आज 48 रुग्णांचा मृत्यू झाल्याने मृतांचा आकडा 14 हजार 671 वर पोहचला आहे. 1 हजार 312 रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आल्याने रुग्ण बरे होण्याची संख्या 6 लाख 53 हजार 998 वर पोहचली आहे. मुंबईत सध्या 28 हजार 086 सक्रिय रुग्ण आहेत. रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 93 टक्के असून रुग्ण दुप्पटीचा कालावधी 334 दिवस इतका आहे. मुंबईत कोरोना रुग्ण आढळून आलेल्या 44 चाळी आणि झोपडपट्ट्या कंटेंनमेंट झोन म्हणून घोषित करण्यात आल्या आहेत. तर 208 इमारती रुग्ण आढळून आल्याने सील करण्यात आल्या आहेत. कोरोना रुग्णांचा शोध घेण्यासाठी आज 21 हजार 947 तर आतापर्यंत एकूण 60 लाख 93 हजार 947 चाचण्या करण्यात आल्या आहेत. अशी माहिती पालिकेच्या आरोग्य विभागाने दिली.
रुग्ण संख्येत चढ उतार सुरूच -
1 मे ला 3908, 2 मे ला 3672, 3 मे ला 2662, 4 मे ला 2554, 5 मे ला 3879, 6 मे ला 3056, 7 मे ला 3039, 8 मे ला 2678, 9 मे ला 2403, 10 मे ला 1794, 11 मे ला 1717, 12 मे ला 2116, 13 मे ला 1946, 14 मे ला 1657, 15 मे ला 1447, 16 मे ला 1544, 17 मे ला 1240, 18 मे ला 953, 19 मे ला 1350, 20 मे ला 1425, 21 मे ला 1416, 22 मे ला 1299, 23 मे ला 1431, 24 मे ला 1057 नवे रुग्ण आढळून आले आहेत.