ETV Bharat / city

Mumbai Rain : पावसाचे वाया जाणारे पाणी वाचवण्यासाठी पालिकेकडे उपाययोजना नाही - Mumbai Rain marathi news

मुंबईमध्ये चार महिन्याचा पाऊस काही दिवसातच ( mumbai rain ) पडतो. त्यामुळे ते पाणी समुद्रात जाऊन मिळते. मात्र, समुद्रात जाणारे पाणी वाचवण्यासाठी पालिकेने कोणत्याही उपाययोजना राबवल्या ( corporation does not have any measures save rain water ) नाहीत.

Mumbai Rain
Mumbai Rain
author img

By

Published : Jul 10, 2022, 8:07 PM IST

मुंबई - चार महिने पाऊस पडतो असे म्हटले जाते. मात्र, मुंबईमध्ये चार महिन्याचा पाऊस काही दिवसातच ( mumbai rain ) पडतो. यामुळे मुंबईमध्ये पाणी साचून ते पाणी समुद्राला जाऊन मिळते. समुद्रात जाऊन मिळणारे पाणी वाचवण्यासाठी पालिकेने रेन वॉटर हार्वेस्टिंग ही योजना राबवली पण ती फेल गेली आहे. तसेच, पाणी साठवण्यासाठी बोगदे बांधले जाणार होते. मात्र ते बोगदेही उभारण्यात आलेले नाहीत. समुद्रात वाहून जाणारे पाणी वाचवण्यासाठी महापालिकेकडे कोणतीही उपायोजना नाही. समुद्राला जाऊन मिळणारे पाणी वाचवल्यास मुंबईकरांना पाणी कपातीपासून मुक्ती मिळवणार ( corporation does not have any measures save rain water ) आहे.

दिवसांत ३२.३७ टक्के पाऊस - मुंबईमध्ये यंदा ११ जूनला पाऊस पडला. त्यानंतर पावसाने पाठ फिरवली. २९ जून पासून २ जुलैपर्यंत पुन्हा पाऊस पडला. त्यानंतर ४ जुलैपासून पुन्हा पावसाने हजेरी लावली आहे. मुंबईमध्ये सुमारे २४७२ मिलीमीटर इतका पाऊस पडतो. त्यापैकी आतापर्यंत केवळ ५ दिवसांत ३२.३७ टक्के पावसाची नोंद झाली आहे. शहर विभागात ७८७.२३, पूर्व उपनगरात ७९१.२६, पश्चिम उपनगरात ८२१.८६ मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे.

रेन वॉटर हार्वेस्टिंग योजना फेल - मुंबईमध्ये कमी दिवसांत जास्त पाऊस पडत आहे. हे पावसाचे पाणी साठवून ठेवता यावे, नंतर त्याचा वापर झाडांना पाणी घालणे, कपडे धुणे, वाहने धुणे यासाठी करावा म्हणून रेन वॉटर हार्वेस्टिंग ही योजना राबवण्याचा निर्णय महानगरपालिकेने घेतला होता. शहरात नव्याने उत्तुंग इमारती उभ्या राहिल्या मात्र रेन वॉटर हार्वेस्टिंग ही योजना राबवली गेली नाही.

पाणी साठवण्यासाठी बोगदे - जपान टोकियोमध्ये जलबोगद्यात साठवलेले पावसाचे पाणी नंतर समुद्रात सोडले जाते. पावसाचे पाणी मोठ-मोठ्या जलबोगद्यांमध्ये साठविण्याचा प्रकल्प मुंबईत राबवावयाचा झाल्यास, त्यासाठी 'जपान इंटरनॅशनल को-ऑपरेटिव्ह एजन्सी' (JICA) ची मदत मिळविण्याचाही प्रयत्न करण्यात येईल असे २०१९ मध्ये ठरवण्यात आले होते. मात्र, या प्रकल्पाचेही पुढे काहीही झाले नाही.

धरणात १६ टक्के पाणीसाठा - मोडक सागर धरणात ५१०८७, तानसा २०६५८, मध्य वैतरणा २२१०६, भातसा १,२५,००४, विहार ९७९४ तर तुळशी ४०९५ दशलक्ष लिटर इतका पाणीसाठा आहे. पालिकेच्या सात पैकी सहा धरणात २ लाख ३२ हजार ७४४ ( १६.०८ टक्के) हा पाणीसाठा जुलै अखेर पर्यंत पुरेल इतका आहे. गेल्या वर्षी सातही धरणात २,७०,९३७ दशलक्ष लिटर पाणी ( १८.७२ टक्के) साठा उपलब्ध होता. तलावांत मागील वर्षापेक्षा ३८ हजार १९३ दशलक्ष लिटर पाणी साठा कमी आहे.

१० टक्के पाणी कपात - मुंबईमध्ये २७ जूनपासून १० टक्के पाणीकपात लागू करण्यात आली आहे. मुंबईत सलग तिसऱ्यांदा मॉन्सून कालावधीतील जून महिन्यात पडणारा पाऊस समाधानकारक झालेला नाही. त्यामुळे पर्यावरणीय बदलांच्या परिणामांचा अभ्यास आगामी काळात पाण्याचे नियोजनासाठी करावा लागेल, अशी प्रतिक्रिया एका अधिकाऱ्याने दिली.

रोज ३८५० दशलक्ष लिटर पाण्याची गरज - मुंबईला अप्पर वैतरणा, मोडक सागर, तानसा, मध्य वैतरणा, भातसा, विहार व तुळशी या ७ धरणांतून दररोज ३८५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा होतो. मुंबईकरांची वर्षभराची तहान भागवण्यासाठी सातही धरणांत १४ लाख ४७ हजार ३६३ दशलक्ष लिटर पाण्याची गरज भासते. ठाणे, भिवंडी महानगरपालिकेला दररोज १५० दशलक्ष लिटर पाणी पुरवठा करण्यात येत असून, पाऊस आणखी लांबल्यास मुंबईकरांसह ठाणे, भिवंडीकरांनाही दीर्घकालीन पाणी कपातीला सामोरे जावे लागणार आहे.

पालिका नियोजन शून्य - धरणांमध्ये पाणीसाठा कमी असल्याने महापालिका १० टक्के पाणी कपात करत आहे. पाणीसाठा नसल्याने पाणी कपात योग्य आहे. पण, समजा जुलैमध्ये पाऊस आला नाही तर त्यासाठी काय उपाययोजना केल्या, पाऊस पडला नाही तर पालिका गप्प बसणार का ? असे प्रश्न पालिकेतील माजी विरोधी पक्ष नेते रवी राजा यांनी उपस्थित केले आहेत. मुंबई महानगरपालिकेचा ४० हजार कोटींचा अर्थसंकल्प आहे. अशा मोठ्या महापालिकेने पुढील चार महिने नागरिकांना पाणी कसे देता येईल याचे नियोजन करायला हवे. पालिका प्रशासन बिन योजनेचे प्रशासन आहे. ते काहीही योजना करत नाही. कंत्राटदारांना कामे देऊन आपले कसे भले करायचे हेच काम केले जात आहे. पाऊस पडला नाही, तर पालिका गप्प बसणार का? असा प्रश्न रवी राजा यांनी उपस्थित केला आहे.

हेही वाचा- Weather Update: राज्यात पावसाशी संबंधित घटनांत 76 जणांचा मृत्यू

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.