मुंबई - महाराष्ट्र पोलिसांकडून राज्यात वेगवेगळ्या ठिकाणी दाखल करण्यात आलेल्या गुन्ह्यांच्या संदर्भात न्यायालयामध्ये आरोपपत्र सादर केले. यानंतर खटला चालवून आरोपींना दोषी सिद्ध होऊन शिक्षा होण्याचे प्रमाण तब्बल 31. 35 टक्क्यांपर्यंत गेल्याचे समोर आले आहे. मागच्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी दोषी सिद्ध होण्याच्या प्रमाणात 8 टक्क्यांची वृद्धी झाली. तसेच राज्यातील शहरी व ग्रामीण पोलिसांच्या 49 पोलीस विभागांच्या अंतर्गत आरोपींना दोषी सिद्ध होण्याचे प्रमाण वाढले आहे.
राज्यात मुंबई रेल्वे पोलीस दोषसिद्धीत अव्वल दोषसिद्धी वाढलेल्या पोलीस विभागाची स्थिती-मुंबई रेल्वे पोलिसांच्या दाखल गुन्ह्यांमध्ये दोषसिद्ध होण्याचे प्रमाण तब्बल 91.15 टक्के असल्याचे समोर आले असून त्यापाठोपाठ पिंपरी-चिंचवड पोलिसांनी केलेल्या कारवाई दरम्यान 70.96 टक्के दोष सिद्धी प्रमाण समोर आले आहे. पुणे रेल्वे पोलिसांकडून 70.3 टक्के आरोपींना शिक्षा झाली असून पुणे शहरात करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान 62.71 % आरोपींना दोषसिद्ध होऊन शिक्षा झाल्याचे समोर आले आहे. सोलापूर शहर पोलिसांनी केलेल्या कारवाईदरम्यान तब्बल 69.65% प्रकरणातील आरोपींना दोषसिद्धी झाली आहे.
या पोलिसांची कामगिरी सर्वाधिक खराब-
राज्यात वाशिम जिल्ह्यातील पोलिसांनी केलेल्या कारवाई दरम्यान दोषसिद्धीचे सर्वात कमी प्रमाण आढळून आले आहे. हे प्रमाण 4.35 टक्के असून नागपूर शहर पोलिसांनी केलेल्या कारवाई दरम्यान फक्त 4.39% प्रकरणांमध्ये आरोपींना शिक्षा झाल्याचे समोर आले आहे. त्या खालोखाल गोंदिया पोलिसांनी केलेल्या कारवाई दरम्यान 4.5% प्रकरणांमध्ये दोषसिद्धी झाली असून वर्धा येथे करण्यात आलेल्या कारवाई दरम्यान केवळ 7.28 टक्के आरोपींना शिक्षा झाल्याचे समोर आलेल आहे.
गंभीर गुन्ह्यात दोषसिद्धी होणे महत्वाचे-