मुंबई - कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भावामुळे दुसऱ्यांदा राज्यात लॉकडाऊनचा कालावधी वाढविण्यात आलेला आहे. त्यामुळे मुंबई-पुणे आणि कोल्हापूर-मुंबई रेल्वे गाड्यांमध्ये अल्प प्रवाशी प्रवास करत असून, रेल्वे प्रशासनाने प्रवाशांच्या कमी प्रतिसादामुळे मुंबई-कोल्हापूर, मुंबई-पुणे दरम्यान धावणाऱ्या रेल्वे गाड्या पुढील सूचना मिळेपर्यंत रद्द करण्यात आलेल्या आहे.
रद्द केलेल्या गाड्या
मध्य रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार, गाडी क्रमांक 01029 मुंबई-कोल्हापूर विशेष 19 मे पासून आणि गाडी क्रमांक 01030 कोल्हापूर-मुंबई विशेष 18 मे पासून रद्द केल्या आहेत. गाडी क्रमांक 01141 मुंबई-अदिलाबाद विशेष 17 मेपासून आणि गाडी क्रमांक 01142 अदिलाबाद-मुंबई विशेष 18 मे पासून रद्द केल्या आहेत. गाडी क्रमांक 01311 सोलापूर-हसन विशेष 13 मेपासून आणि गाडी क्रमांक 01312 हसन-सोलापूर विशेष 14 मेपासून रद्द केल्या आहेत. गाडी क्रमांक 02123/ 01124 मुंबई-पुणे मुंबई विशेष 14 मेपासून रद्द केल्या आहेत. 14 मे रोजी सुटणारी गाडी क्रमांक 04156 कानपूर सेंट्रल-मुंबई विशेष आणि 16 मे रोजी सुटणारी गाडी क्रमांक 04155 मुंबई- कानपूर सेंट्रल विशेष गाडी रद्द करण्यात आली आहे, अशी माहिती मध्य रेल्वे प्रशासनाच्यावतीने देण्यात आली.
हेही वाचा - अंबरनाथमध्ये 'सैराट'; प्रेमविवाह केल्याच्या वादातून तरुणाची हत्या