ETV Bharat / city

Mumbai Threat Message मुंबई उडाने की पूरी तैयारी है, धमकीच्या फोननंतर खळबळ, वाचा दिवसभरात काय घडलं - मुंबई पोलीस ट्रॅफिक कंट्रोल धमकीचे मेसेज

मुंबई पोलीस ट्रॅफिक कंट्रोल रुमच्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर पाकिस्तानमधून धमकीचे मेसेज आला आहे. 26 / 11 सारखा हल्ला करणार असा हा मेसेज आल्यानंतर खळबळ उडाली Mumbai Police traffic control Saturday received 26 11 attack threat आहे.

26 11 attack
26 11 attack
author img

By

Published : Aug 20, 2022, 9:51 PM IST

मुंबई - मुंबई ट्रॅफिक कंट्रोलला धमकीचा मेसेज देण्यात आला आहे. त्यामुळे खळबळ उडाली आहे. 26 / 11 सारखा हल्ला करणार, असा धमकीचा मेसेज देण्यात आला आहे. मुंबई पोलीस ट्रॅफिक कंट्रोल रुमच्या व्हॉट्सअ‍ॅप क्रमांकावर पाकिस्तानमधून हे धमकीचे मेसेजेस आले असल्याची माहिती मिळाली आहे. हा हल्ला करण्यासाठी भारतात असलेल्या ६ जणांची मदत घेणार असल्याचं धमकी देणाऱ्यांनी मेसेजमधून सांगितलं आहे. त्यामुळे ऐन सणासुदीच्या काळात मुंबईवर दहशतवादी हल्लाचे सावट परसले Mumbai Police traffic control Saturday received 26 11 attack threat आहे.

अज्ञात व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल - मुंबई पोलीस ट्रॅफिक कंट्रोलला पाक-आधारित फोन नंबरवरून 26/11 सारख्या दहशतवादी हल्ल्याचा धमकीचा मेसेज मिळाला होता. पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरुद्ध आयपीसीच्या कलम 506(2) अंतर्गत वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. मात्र, मुंबई पोलिसांनी विरार येथून एका संशयिताला ताब्यात घेतले असून त्याची चौकशी सुरु केली आहे. संबंधित व्यक्ती उत्तर प्रदेश येथील असल्याची माहिती प्राथमिक तपासात समोर आली आहे.

मुंबई पोलीस आयुक्तांचे आवाहन - 26/11 सारखा हल्ला करण्याची धमकी देणारा मेसेज मुंबई पोलिसांना आला होता. धमकीच्या मेसेजनंतर मुंबई पोलीस सतर्क झाले आहेत. यासंदर्भात तपास सुरु केला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसळकर यांनी मुंबईकरांनी घाबरुन जाऊ नये, पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सज्ज असल्याचे आवाहन त्यांनी केले आहे.

ते म्हणाले की, मुंबईकरांनी घाबरुन जाऊ नये, पोलीस आणि सुरक्षा यंत्रणा सज्ज आहेत. मुंबई गुन्हे शाखा याबाबात सखोल कारवाई करत आहे. तसेच, यासंदर्भात वरळी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. काल रात्री मुंबईच्या ट्रॅफिक पोलीस कंट्रोलला एक मेसेज आला होता, त्यात दहशत पसरवण्याबाबत बोलत होते, ते धमक्या देत होते. धमकी देणाऱ्यांचे काही साथीदार भारतातही सक्रिय असल्याचा उल्लेख मजकूरात आहे, अशी माहितीही विवेक फणसळकर यांनी दिली.

सागर कवच ऑपरेशन सुरू - मुंबई पोलीस हे प्रकरण हलक्यात घेणार नाहीत, आम्ही या प्रकरणाचा पूर्ण तपास करत आहोत. आम्ही कोणतीही शक्यता नाकारत नाही. आम्ही सागर कवच ऑपरेशन सुरू केले आहे आणि सागरी सीमा सुरक्षित करण्यासाठी यंत्रणांना सतर्क केले आहे, अशी माहिती मुंबईचे आयुक्त विवेक फणसळकर यांनी पत्रकार परिषदेत दिली.

हल्ल्याची धमकी देणाऱ्याने व्हॉट्सअ‍ॅपवर पाठवला यूपी एटीएसचा नंबर - 'जी मुबारक हो, मुंबई मे हमला होने वाला है २६ ११ की नई ताजी याद दिलाएगा,' असा मेसेज मुंबई वाहतूक पोलिसांच्या नियंत्रण कक्षाला शुक्रवारी रात्री आला आहे. त्यामुळे सर्व पोलीस ठाणे व यंत्रणा सज्ज करण्यात आल्या आहेत. याप्रकरणी रात्रभर कारवाई सुरु आहे. मुंबई पोलीस सतर्क झाले असून, मुंबईतील सुरक्षा वाढवली आहे. मात्र, धमकी देणाऱ्याने व्हॅट्सअॅप वर एकूण सात क्रमांक देखील वाहतूक नियंत्रण कक्षास शेअर केले आहेत. त्यापैकी एक नंबर हा उत्तर प्रदेश एटीएसचा असल्याचे निदर्शनास आले आहे.

धमकीचा मेसेज काय?

जी मुबारक हो! मुंबईवर हल्ला होणार आहे. 26-11 हल्ल्याची आठवण करून देणारा असा हल्ला असेल. मुंबईला उडवण्याची तयारी सध्या सुरु आहे. मुंबई उडवून देण्याची यूपी एटीएसची इच्छा आहे. मी पाकिस्तानातून असून माझ्यासोबत काही भारतीय आहेत. त्यांना मुंबई उडवायची आहे. तोहीद, इनाम अली, नदीम, आसिफ ज्यांना मामा नावानंही ओळखतात. खर्रस कुरेशी, मोहम्मद आसिफ, आमीर सिद्दीक, रिजवान हा मुजफ्फरनगरचा आहे. शादाब सर ऑफ सरफराज, मोहम्मद रियाज, मोहम्मद यासीर, मोहम्मद फैयाज आदी माणसं मला मदत करतील. मुंबई उडवण्याची तयारी पूर्ण झाली असून आता फक्त काही वेळ बाकी आहे. माझं लोकेशन इथे अॅड्रेस होईल, मात्र काम मुंबईत होणार. आमच्या लोकांचं कोणतंही ठिकाण नसतं… लोकेशन तुम्हाला आउट ऑफ कंट्री ट्रेस होईल, हल्ला मुंबईत होणार.

हेही वाचा - Mumbai Police Threatened सुरक्षा यंत्रणा सज्ज, मुंबईकरांनी घाबरुन जाऊ नये, मुंबई पोलीस आयुक्तांचे आवाहन

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.