ETV Bharat / city

राज्यभरात महाविकास आघाडीचा ११ ऑक्टोबरला बंद; मुंबईत पोलिसांचा राहणार तगडा बंदोबस्त - मुंबई पोलीस अपडेट न्यूज

मुंबई पोलिसांकडून जास्तीत मनुष्यबळ हे शहरांमधील विविध रस्त्यांवर तैनात करण्यात येणार आहे. नवरात्रीनिमित्त यापूर्वीच पोलीस अधिक तैनात करण्यात आले आहेत. मात्र, बंद काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी जास्तीत मनुष्यबळ हे बंदोबस्तात वापरण्यात येणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

मुंबई पोलीस
मुंबई पोलीस
author img

By

Published : Oct 10, 2021, 11:56 PM IST

मुंबई - लखीमपूर हिंसाचाराचा निषेध व्यक्त करण्यासाठी महाविकास आघाडी सरकारने राज्यभरात ११ ऑक्टोबरला बंद पुकारला आहे. बंद काळात कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न होऊ नये, म्हणून मुंबई पोलिसांकडून देशाच्या आर्थिक राजधानीत तगडा बंदोबस्त ठेवण्यात येणार आहे.

राज्य राखीव पोलीस दलाच्या ३ तुकड्या, ५०० होमगार्ड आणि स्थानिक शस्त्र दलाचे ७०० लोक बंदोबस्तात असणार आहेत, ही माहिती मुंबई पोलिसांनी दिली आहे. मुंबई पोलिसांकडून जास्तीत मनुष्यबळ हे शहरांमधील विविध रस्त्यांवर तैनात करण्यात येणार आहे. पोलिसांकडून गस्तीचे प्रमाण वाढविण्यात येत आहे. नवरात्रीनिमित्त यापूर्वीच पोलीस अधिक तैनात करण्यात आले आहेत. मात्र, बंद काळात कोणतीही अनुचित घटना घडू नये, यासाठी जास्तीत मनुष्यबळ हे बंदोबस्तात वापरण्यात येणार असल्याचे पोलीस अधिकाऱ्याने सांगितले.

हेही वाचा-उद्या महाराष्ट्रात राज्यव्यापी बंद, अत्यावश्यक सेवा वगळता 'हे' राहणार बंद

शिवसेना सर्व ताकदीनिशी बंदमध्ये होणार सहभागी

सर्व ताकदीनिशी शिवसेना बंदमध्ये सहभागी होणार असल्याचे खासदार संजय राऊत यांनी शनिवारी म्हटले आहे. केंद्र सरकारच्या शेतकरीविरोधातील धोरणांबाबत शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करण्यात येणार असल्याचेही खासदार राऊत यांनी सांगितले. महाविकास आघाडीमध्ये सहभागी झालेल्या तिन्ही पक्षांनी म्हणजे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने बंदला पाठिंबा दिला आहे.

ही वाचा-'महाराष्ट्र बंद'ला भाजपा, मनसेचा विरोध

लखीपूरच्या घटनेत आजवर काय घडले आहे?

  • लखीमपूर खिरी येथे ३ ऑक्टोबरला झालेल्या हिंसाचारात एकूण ८ जणांचा मृत्यू झाला आहे.
  • केंद्रीय गृह राज्यमंत्री अजय मिश्रा यांचा पुत्र आशिष मिश्रासह इतरांवर गुन्हा दाखल झाला आहे. त्यांनी वाहनाने शेतकऱ्यांना चिरडल्याचा आरोप आहे. या घटनेनंतर काही लोकांना वाहन चालकांसह काही लोकांना ठार केले.
  • आशिष मिश्राला शनिवारी रात्री उशिरा अटक करण्यात आली आहे.

हेही वाचा-'महाराष्ट्र बंद' राजकीय हेतूनेच - गिरीश महाजन

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.