मुंबई - भुलेश्वर येथील एका ज्वेलर्स दुकानातील सोने आणि रोख रक्कम असा 8 कोटी 19 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. या प्रकरणाचा तपास करत आरोपींचा छडा मुंबई पोलिसांनी लावला आहे. चोरीच्या गुन्ह्यात एकुण 12 जणांचा समावेश असून 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच 7 कोटी 12 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. तपासासाठी राजस्थान आणि उत्तरप्रदेश येथे एकूण 6 टीम गेल्या होत्या. गणेश कुमार हा या चोरीतील म्होरक्या होता. आरोपींकडून चार टप्प्यात आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांच्याकडून मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे, अशी माहिती पोलीस महानिरीक्षक विश्वास नांगरे पाटील यांनी दिली.
मुंबई पोलिसांकडून ज्वेलर्स दुकानातील चोरीचा पर्दाफाश; 7 कोटी रुपयांचा मुद्देमाल जप्त - विश्वास नांगरे पाटीप पत्रकारपरिषद
भुलेश्वर येथील एका ज्वेलर्स दुकानातील सोने आणि रोख रक्कम असा 8 कोटी 19 लाख रुपयांचा मुद्देमाल चोरीला गेला होता. या प्रकरणाचा तपास करत आरोपींचा छडा मुंबई पोलिसांनी लावला आहे. चोरीच्या गुन्ह्यात एकुण 12 जणांचा समावेश असून 10 आरोपींना अटक करण्यात आली आहे. तसेच 7 कोटी 12 लाख रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.