ETV Bharat / city

अनंत चतुर्दशीसाठी मुंबई पोलीस सज्ज, पुण्यात 'अशी' आहे तयारी

19 तारखेला अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन होणार आहे. यावेळी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाली आहे. संवेदनशील ठिकाणी आणि भागांत गस्त घालण्यात येणार आहे. विसर्जनाच्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त असणार आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी एएनआयला दिली.

author img

By

Published : Sep 18, 2021, 7:00 PM IST

Updated : Sep 18, 2021, 9:29 PM IST

Mumbai Police
मुंबई पोलीस

मुंबई/पुणे - 19 तारखेला अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणपती विसर्जन होणार आहे. यावेळी कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राखण्यासाठी मुंबई पोलीस सज्ज झाली आहे. संवेदनशील ठिकाणी आणि भागांत गस्त घालण्यात येणार आहे. विसर्जनाच्या ठिकाणी कडक पोलीस बंदोबस्त असणार आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी एएनआयला दिली.

हेही वाचा - ....आता कोथळा काढायची भाषा केली जाते; शरद पवारांनी नेत्यांची केली कानउघडणी

लाईट, क्रेन, जलतरणपटू, रुग्णवाहिका, अग्निशमन सेवा आणि इतर सर्व सुरक्षा उपायांची व्यवस्था संबंधित विभागांच्या समन्वयाने केली जात आहे. तोडफोड विरोधी उपाय, रात्रीची गस्त आणि गुड मॉर्निंग स्क्वाडच्या मोहिमा देखील होणार आहे. त्याचबरोबर, अतिरिक्त मनुष्यबळाची देखील तैनाती होत आहे. यात विविध शाखांमधील 100 अधिकारी आणि 1 हजार 500 व्यक्ती, एसआरपीएफच्या 3 कंपनी, सीआरपीएफची 1 कंपनी, 500 होमगार्ड, बाहेरील युनिटमधील 275 कॉन्स्टेबलचा समावेश आहे, अशी माहिती मुंबई पोलिसांनी दिली.

१७ - १८ सप्टेंबरच्या रात्री ऑल आऊट ऑपरेशन

गुन्हेगारी कारवायांना आळा घालण्यासाठी १७ - १८ सप्टेंबरच्या रात्री ऑलआऊट ऑपरेशन आयोजित करण्यात आले होते. नाकाबंदी आणि शोधमोहीम राबवण्यात आली. हॉटेल आणि लॉजसह बेकायदेशीर कारवाया, महत्वाची आस्थापने आणि संवेदनशील ठिकाणे तपासली गेली. औषधे, अवैध शस्त्रे, अवैध दारू, मद्यधुंद वाहन चालवणे इत्यादींवर गुन्हे दाखल करण्यात आले. गणपती मंडळे, शांतता समिती, मोहल्ला समित्या आणि सर्व भागधारकांसोबत बैठका घेण्यात आल्या आणि शांततेत विसर्जनासाठी योग्य सूचना देण्यात आल्या.

हेही वाचा - मुख्यमंत्र्यांच्या 'भावी सहकारी' वक्तव्यानंतर संजय राऊत यांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट

पुण्यात अशी असेल विसर्जन तयारी

पुणे शहरात उद्या (रविवारी) गणेश विसर्जनाच्या दिवशी सात हजार पोलिसांचा बंदोबस्त असणार आहे. मानाच्या गणपतीचे सकाळी 10 वाजल्यापासून मंडपातच विसर्जन होणार आहे. त्या ठिकाणी नागरिकांना दर्शनासाठी बंदी आहे. गणेश विसर्जनाच्या दिवशी शहरातील व्यापारी बाजारपेठा बंद राहणार आहेत. त्यामुळे नागरिकांनी गरज असल्यास बाहेर पडावे. रविवारी सकाळी दहा वाजता मानाच्या पहिल्या गणपतींचे विसर्जन सुरुवात होईल व रात्री सातपर्यंत सर्व मानाच्या गणपतींचे विसर्जन होईल. सर्वच मानाच्या गणपतींचे विसर्जन मंडपातील हौदात होणार आहे.

असा असणार पोलीस बंदोबस्त

- पुण्यासह राज्यभर अनंत चतुर्दशीला लाडक्या गणपती बाप्पाला निरोप देण्यात येणार आहे. कोरोनाचे सावट असल्याने यंदाही मिरवणुका निघणार नाहीत. अनेक मंडळांनी मंडपाजवळ कृत्रिम हौद तयार केले आहेत.

- दंगल नियंत्रणाची दहा पथके

- बॉम्ब शोधक व नाशक विभागाची आठ पथके

- शीघ्र कृती दलाची 16 पथके

- मुख्यालयाकडून 1,100 अतिरिक्त पोलीस फौजफाटा

- गुन्हे शाखेच्या दहा पोलिसांच्या 20 टीम

- एक हजार विशेष अधिकाऱ्यांची मदत

गणेश विसर्जनाच्या दिवशी शहर आणि परिसरातील सर्व दुकाने बंद राहणार - अजित पवार

राज्यात कोरोनाचे सावट असून यंदादेखील होत असलेल्या गणेश उत्सवासाठी पोलिसांकडे नियमावली लागू करण्यात आली आहे. प्रतिष्ठापना आणि विसर्जन सोहळ्यासाठी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकां यंदाही परवानगी देण्यात आलेली नाही. तर अनंत चतुर्दशी म्हणजेच गणपती विसर्जनाच्या दिवशी पुणे पिंपरी-चिंचवड आणि कॅंटोन्मेंट परिसरातील सर्व च्या सर्व दुकाने बंद राहणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली.

Last Updated : Sep 18, 2021, 9:29 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.