ETV Bharat / city

Udaipur Killing : कन्हैया लालबाबत पोस्ट करणाऱ्या तरुणीला जीवे मारण्याची धमकी; जम्मू-कश्मीर मधून एकाला अटक

कन्हैया लाल यांच्या हत्येबाबत ( Udaipur Killing ) मुंबईतील 16 वर्षीय तरुणीला जीवे मारण्याची धमकी मिळाली ( Mumbai Girl Gets Death Threat Facebook Post ) होती. त्याप्रकरणी 30 वर्षीय व्यक्तीला जम्मू-कश्मीर मधून मुंबई पोलिसांनी अटक केली ( Mumbai Police One Arrested Jammu And Kashmir ) आहे.

mumbai police one arrested Jammu and Kashmir

author img

By

Published : Jul 11, 2022, 10:40 PM IST

मुंबई - माजी भाजप नेत्या तथा प्रवक्ता नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याला समर्थन देणारे कन्हैया लाल यांची काही दिवसांपूर्वी हत्या करण्यात आली ( Udaipur Killing ) होती. त्यांच्या हत्येबाबत सोशल मीडियावर पोस्ट करणाऱ्या मुंबईतील गिरगाव येथील 16 वर्षीय तरुणीला जीवे मारण्याची धमकी मिळाली ( Mumbai Girl Gets Death Threat Facebook Post ) होती. त्याप्रकरणी 30 वर्षीय व्यक्तीला जम्मू-कश्मीर मधून मुंबई पोलिसांनी अटक केली ( Mumbai Police One Arrested Jammu And Kashmir ) आहे. आरोपीला न्यायालयासमोर हजर केले असतात 3 दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

फयाज अहमद गुलाम मोहम्मद भट ( वय 30, जम्मू-कश्मीर ), असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. दक्षिण मुंबईतील गिरगाव येथील रहिवासी असलेल्या तरुणीने तिच्या फेसबुक वॉलवर कन्हैया लालच्या हत्येबाबत काही मत व्यक्त केली होती. त्यानंतर एका अनोळखी व्यक्तीने तिला व्हॉट्सअॅप कॉल केला आणि पोस्टमध्ये व्यक्त केलेल्या मताबद्दल तिला जीवे मारण्याची धमकी दिली. या संदर्भात अज्ञात व्यक्तीविरुद्ध जीवे मारण्याची धमकी दिल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

  • A person was apprehended from Jammu and Kashmir's Budgam after he allegedly gave a death threat to a minor girl after she posted a video on social media expressing her views on the killing of Kanhaiya Kumar in Udaipur. Accused sent to 3-day police remand: Mumbai Police pic.twitter.com/Zo7yrQG80B

    — ANI (@ANI) July 11, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

नमूद गुन्हा हा गंभीर स्वरूपाचा असल्याने या आरोपीचा शोध घेण्यासाठी मुंबई पोलिसांचेपथक श्रीनगर, जम्मू-कश्मीर येथे रवाना झाले. पोलीस पथकाने जम्मू-कश्मीर मध्ये आरोपी फयाज भटचा शोध घेतला. त्यास उमाराबाबाद येथून 9 जुलै रोजी रात्री अटक केली. सोमवारी ( 11 जुलै ) मुंबईमधील न्यायालयात आरोपीला हजर करण्यात आले. तेव्हा न्यायालयाने 14 जुलै पर्यंत पोलीस कोठडी मंजूर केली आहे.

देशभरात नपुर शर्मा तसेच उदयपूर येथील कन्हैयालाल यांची झालेली हत्या या मुद्द्यांवर वातावरण तापलेल आहे. राजस्थाननंतर आता महाराष्ट्रात हत्येचे प्रकरण समोर आले होते. नुपूर शर्मा संदर्भात कथित पोस्ट शेअर केल्याबद्दल ही हत्या झाली, असा तपास यंत्रणांचा दावा आहे.

हेही वाचा -Kangana Ranaut Defamation Case : कंगना रणौतला दिलासा, १४ जुलैला भटिंडा न्यायालयात राहावे लागणार नाही हजर

For All Latest Updates

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.