मुंबई - व्यावसायिकाला आयकर विभागाची भीती दाखवून खंडणी मागितल्याचा प्रकरणात फरार असलेल्या डीसीपी सौरभ त्रिपाठीच्या अडचणी वाढल्या ( Angadiya extortion case ) आहेत. याप्रकरणी डीसीपी सौरभ त्रिपाठीच्या निलंबनाचा प्रस्ताव मुंबई पोलिसांनी गृहविभागाकडे पाठवला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली ( Mumbai Police proposes suspension of Saurabh Tripathi ) आहे. खंडणी प्रकरणात सौरभ त्रिपाठी यांना फरार घोषित करण्यात यावं असा प्रस्ताव आज गृहविभागाकडे पाठवण्यात आला असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. मुंबई पोलिस दलामध्ये यापूर्वीही खंडणी प्रकरण मोठ्या प्रमाणात गाजले आहे. त्यामध्ये माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना देखील राजीनामा द्यावा लागला होता. त्यावेळी हे सर्व आरोप माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी लावले होते. त्यावेळी मोठ्या प्रमाणात पोलीस खात्याचा कारभार चव्हाट्यावर आला होता.
-
Mumbai Police has sent a proposal to suspend IPS officer Saurabh Tripathi to the Maharashtra Home Department.
— ANI (@ANI) March 16, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data="
Tripathi is an accused in the Angadiya Extortion case
">Mumbai Police has sent a proposal to suspend IPS officer Saurabh Tripathi to the Maharashtra Home Department.
— ANI (@ANI) March 16, 2022
Tripathi is an accused in the Angadiya Extortion caseMumbai Police has sent a proposal to suspend IPS officer Saurabh Tripathi to the Maharashtra Home Department.
— ANI (@ANI) March 16, 2022
Tripathi is an accused in the Angadiya Extortion case
अटकेची तलवार
मुंबई एलटी मार्ग पोलीस स्टेशनमध्ये कार्यरत असलेल्या 3 पोलीस अधिकाऱ्यांनी एका व्यावसायिकाला आयकर विभागाची भीती दाखवून खंडणी मागण्याच्या आरोपाखाली त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला होता. या प्रकरणी दोन पोलीस अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली होती. यातील पोलीस निरीक्षक ओम वंगाटे गुन्हा दाखल झाल्यापासून फरार होता. 3 मार्च रोजी एल टी मार्ग पोलिसांनी त्यांना अटक केली होती. त्यावेळी पोलिसांना ओम वंगाटे यांची पोलीस कसोटी मिळाली होती. मंगळवारी त्यांना न्यायालयासमोर हजर केले असता त्यांच्या रिमांड अर्जात डीसीपी सौरभ त्रिपाठीचे नाव फरार आरोपी म्हणून नमूद करण्यात आले आहे. तेव्हापासूनच त्याच्यावर अटकेची तलवार असल्याचे स्पष्ट झाले होते. या प्रकरणाचा तपास क्राइम इंटेलिजन्स युनिटने (सीआययू) करत आहे.
तक्रार मागे घेण्यास सांगितले
त्रिपाठी यांच्यावर या प्रकरणाशी संबंधित अंगडियाला प्रभावित करण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप आहे. त्रिपाठी यांनी त्यांची तक्रार मागे घेण्यास सांगितल्याचाही आरोप आहे. त्रिपाठी आणि अंगडिया यांच्यातील या संभाषणाचे ऑडिओ रेकॉर्डिंगही मुंबई पोलिसांना मिळाल्याचे सूत्रांनी सांगितले आहे. हे कॉल रेकॉर्डिंग स्वत अंगडियाने मुंबई पोलिसांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिले होते.
कोण आहेत सौरभ त्रिपाठी?
डीसीपी सौरभ त्रिपाठी हे 2010 बॅचचे आयपीएस अधिकारी आहेत. त्रिपाठी यांनी अहमदनगरचे पोलीस अधीक्षक म्हणून काम पाहिलेलं आहे. तिथे अण्णा हजारे यांच्या आंदोलनावेळी त्यांनी बंदोबस्तासाठी चांगलं काम केलेले होतं. त्यानंतर मुंबईत परिमंडळ 4 चे पोलीस उपायुक्त म्हणून त्यांची नेमणूक झाली. त्रिपाठी यांनी प्रोटेक्शन सिक्युरिटी विभागात डीसीपी म्हणून काम पाहिलं आहे. त्यांची नियुक्ती परिमंडळ 2 मध्ये पोलीस उपायुक्त म्हणून करण्यात आली होती, जिथे त्यांच्यावर खंडणीचे आरोप झाले. आरोपानंतर त्यांची बदली डीसीपी ऑपरेशन या ठिकाणी करण्यात आली पण, त्यांनी अद्याप चार्ज घेतला नाही. दरम्यान त्रिपाठी यांना पहिले आरोपी म्हणून घोषित करण्यात आलंय आणि गृहविभागाला निलंबनाचा प्रस्ताव पाठवण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
एलटी मार्ग पोलीस ठाण्यातील तीन अधिकाऱ्यानी आंगाडिया व्यावसायिकाकडून खंडणी उकळल्याचं समोर आलं होतं. या प्रकरणामध्ये डीसीपी सौरभ त्रिपाठी यांचा समावेश असल्याचं समोर आलं. पोलीस निरीक्षक ओम वंगाटे यांच्या चौकशीत त्रिपाठी यांचं नाव समोर आलं. सौरभ त्रिपाठी यांच्यावर अंगाडिया असोसिएशनकडून महिना 10 लाख खंडणी मागत असल्याचा आरोप करण्यात आला. या प्रकरणी सौरभ त्रिपाठी यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.