ETV Bharat / city

Rana Couple : राणा दाम्पत्याविरोधात 85 पानी आरोपपत्र दाखल; पुढील सुनावणी 16 जूनला

author img

By

Published : Jun 8, 2022, 5:21 PM IST

अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध पोलिसांनी आज ( 8 मे ) न्यायालयात आरोपपत्र दाखल केले ( mumbai police filed chargesheet against rana couple ) आहे.

Rana Couple
Rana Couple

मुंबई - अमरावतीच्या अपक्ष खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्याविरुद्ध पोलिसांनी आज ( 8 मे ) न्यायालयात आरोपपत्र दाखल केले ( mumbai police filed chargesheet against rana couple ) आहे. मुंबई पोलिसांनी ८५ पानी आरोपपत्रात २३ जणांचे जबाब नोंदवले आहेत. खार पोलिसांनी राणा दाम्पत्याविरुद्ध बोरिवली न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. राणा दाम्पत्याविरुद्ध आयपीसी कलम ३५३ आणि ३४ अंतर्गत हे आरोपपत्र दाखल करण्यात आले आहे.

नवनीत राणा आणि रवी राणांच्या वतीने वकील धर्मेंद्र कुबेर हे न्यायालयात हजर राहिले. प्रसारमाध्यमांशी बोलताना धर्मेंद्र कुबेर यांनी म्हटलं की, आज पोलिसांनी नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरुद्ध आरोपपत्र दाखल केले आहे. न्यायालयाने आज दोघांनाही कोर्टात उपस्थित राहण्यापासून सूट दिली आहे. पुढील सुनावणीची तारीख १६ जून निश्चित करण्यात आली आहे.

राणा दाम्पत्याचे वकील प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना

काय आहे प्रकरण? - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या खाजगी निवासस्थान असलेल्या मातोश्री बंगल्याबाहेर राणा दाम्पत्याच्या वतीने हनुमान चालीसाचे पठण करण्यात येणार होते. मात्र, त्यापूर्वी कायदा सुवस्था निर्माण होण्याच्या कारणावरुन मुंबई पोलिसांचे पथक राणा दाम्पत्याच्या घरी पोहचले. तेव्हा पोलिसांशी त्यांचा वाद झाला. याप्रकरणी पोलिसांनी सरकारी कामात अडथळा आणल्याच्या आरोपावरुन आयपीसी कलम 353 आणि 34 अंतर्गत गुन्हा दाखल केला होता.

हेही वाचा - Navneet Rana : 'सभेपूर्वी मुख्यमंत्र्यांनी औरंगाबादच्या समस्या...'; नवनीत राणांचा ठाकरेंना सल्ला

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.