मुंबई - वरिष्ठ आयपीएस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्या अडचणीत ( IPS officer Rashmi Shukla ) वाढ झाली. अनधिकृत फोन टॅपिंग केल्याप्रकरणी त्यांच्यावर आणखी गुन्हा दाखल झाला ( illegal phone tapping case ) आहे.
मुंबई पोलिसांनी टेलिग्राफ कायद्यांतर्गत त्यांच्याविरोधात ( Mumbai Police filed case against IPS ) गुन्हा नोंदविला आहे. सूत्रांनी सांगितले की शुक्ला हे एसआयडीचे प्रमुख असताना त्यांनी आपल्या अधिकाराचा गैरवापर करून बेकायदेशीरपणे फोन टॅप ( Rashmi Shukla illegal phone tapping ) केले होते.
रश्मी शुक्ला यांच्या विरोधात पुण्यात देखील सर्वात प्रथम फोन टॅपिंग प्रकरणात गुन्हा दाखल करण्यात आला होता. फोन टॅपिंग प्रकरणात दाखल झालेली एफआयआर रद्द करण्याची मागणी करण्यासाठी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. न्यायालयाने 25 मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा देण्यास सांगितले होते. फोन टॅपिंग प्रकरणी शुक्ला यांच्या विरोधात पुण्यातील बंड गार्डन पीएस येथे गुन्हा दाखल आहे.
रश्मी शुक्लांवर कारवाई होणार
राष्ट्रवादी काँग्रेस, काँग्रेससह विविध राजकीय पक्षांमधील महत्वाच्या नेत्यांचे फोन बेकायदेशीरपणे अभिवेक्षण फोन टॅपींग केल्याप्रकरणी दाखल गुन्ह्यात पुण्याच्या तत्कालीन पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांचा पुणे पोलिसांकडून जबाब नोंदविण्यात येणार आहे. त्यानंतर पुढील कारवाई केली जाणार असल्याचे पुणे पोलिसांनी स्पष्ट केले. या प्रकरणात शुक्ला यांनी बेकायदेशीरपणे मंत्र्यांची संभाषण रेकॉर्ड केल्याचा आरोप ठेवण्यात आला आहे. गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनीही शुक्लांवर कारवाई होणार असल्याचे स्पष्ट केले. यानंतर अटक टाळण्यासाठी शुक्ला यांनी उच्च न्यायालयात अटकेपासून संरक्षण मिळविले आहे. दरम्यान, कॉंग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले, शालेय शिक्षण राज्य मंत्री बच्चु कडू, आशिष देशमुख व संजय काकडे यांचे तब्बल साठ दिवस फोन टॅप केल्याचे तक्रारीमध्ये नमूद करण्यात आले आहे.
25 मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा
पुण्याच्या माजी पुणे पोलीस आयुक्त आयुक्त रश्मी शुक्ला यांच्याविरोधात बेकायदेशीर फोन टॅपिंगचे गंभीर आरोपावरून पुण्यातील बंड गार्डन पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला होता. हा गुन्हा रद्द करण्यात यावा, अशी मागणी करत वरिष्ठ रश्मी शुक्ला यांनी बुधवारी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावर मुंबई उच्च न्यायालयाने माजी पोलीस आयुक्त रश्मी शुक्ला यांना 25 मार्चपर्यंत अटकेपासून दिलासा दिला आहे.
हेही वाचा-Doctor Commits Suicide Gondia : धक्कादायक : 26 वर्षीय महिला डॉक्टरची गळफास घेऊन आत्महत्या
संजय पांडे यांच्या समितीने दिला अहवाल
शुक्ला या सध्या हैदराबाद येथे प्रतिनियुक्तीवर कार्यरत आहेत. शुक्ला यांच्यावर असलेल्या फोन टॅपींग प्रकरणात तत्कालीन पोलीस महासंचालक संजय पांडे यांच्या नेतृत्वाखाली एक समिती नेमण्यात आली होती. या समीतीने चौकशी करून राज्य सरकारला अहवाल दिला आहे. या अहवालानुसार राज्य सरकारने रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते.