मुंबई - पोलीस अधिकारी सचिन वाझे यांना एनआयएने अटक केल्यानंतर पोलीस खात्यातील इतर पोलिसांच्या चौकशीचा ससेमिरा सुरू झाला आहे. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि पोलीस महासंचालक हेमंत नगराळे मुंबई पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्यात बैठक सुरू आहे. तब्बल दोन तास सुरू असलेल्या या बैठकीत मनसुख हिरेन आत्महत्या प्रकरणाच्या तपासाबाबत चर्चा सुरू असल्याचे समजते.
पुढील तपासाची दिशा ठरणार..
मुकेश अंबानी यांच्या निवासस्थानाबाहेर स्फोटकांची गाडी आणि मनसुख हिरेन यांचा मृत्यू या प्रकरणाचा तपास करणारे सचिन वाझे यांनाच अटक करण्यात आली आहे. त्यामुळे मुंबई पोलीस दलाच्या प्रतिमेवर शंकाकुशंका निर्माण केल्या जाऊ लागल्या आहेत. या प्रकरणात अनेक गंभीर चुका केल्या आहेत, हे एनआयएच्या चौकशीत पुढे येत आहे. एनआयएने इतर पोलिसांच्या चौकशीला सुरुवात केली आहे. यामुळे राज्य सरकारचीही मोठी अडचण होताना दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी पोलीस महासंचालक हेमंत नगराळे, मुंबई पोलीस आयुक्त परमबीर सिंग यांच्यासोबत बैठक बोलवले आहे बैठकीत मुकेश अंबानी यांच्या घराबाहेर परिसरात ठेवलेल्या स्कार्पिओ आणि संशयास्पद मृत्यू झालेल्या मनसुख हिरेन यांच्या तपासाबाबत आढावा घेण्यात येत आहे. तसेच पुढील तपासाची दिशा काय असेल, याबाबतही चर्चा सुरू असल्याचे समजत आहे.