ETV Bharat / city

Hanuman Chalisa Row : पोलीस आयुक्त संजय पांडेंनी घेतला कायदा, सुव्यवस्थेचा आढावा, पोलीस ठाण्यांना दिल्या भेटी

मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे ( Mumbai CP Sanjay Pandey ) यांनी आज शहरातील विविध पोलीस ठाण्यांना भेटी देत शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा आढावा ( CP Reviews Mumbai Law Order Situation ) घेतला. मनसेकडून करण्यात येत असलेल्या हनुमान चालीसा पठण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर ( Hanuman Chalisa Agitation MNS ) मुंबईत तणावाचे वातावरण आहे.

CP Sanjay Pandey
पोलीस आयुक्त संजय पांडे
author img

By

Published : May 4, 2022, 9:45 AM IST

मुंबई : मनसेच्या हनुमान चालीसा पठण ( Hanuman Chalisa Agitation MNS ) आंदोलनावरून आता मुंबईत तणावाचे वातावरण आहे. याच पार्श्वभूमीवर मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे ( Mumbai CP Sanjay Pandey ) यांनी मुंबईतील विविध पोलीस ठाण्याना भेटी देत स्वतः कायदा आणि सुव्यवस्थेच्या परिस्थितीचा आढावा ( CP Reviews Mumbai Law Order Situation ) घेतला.

मनसैनिक आक्रमक : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे उतरवण्याबाबत दिलेला अल्टिमेटम संपल्यानंतर आज पहाटेपासून मनसैनिक याबाबत ज्या ठिकाणी भोंग्या वरून अजान पठण केले जाईल त्याला उत्तर देण्यासाठी त्याठिकाणी हनुमान चालीसा लावण्यासाठी तयारीत होते. राज्यभरातील मनसैनिक यासाठी आक्रमक झाले होते.

  • Maharashtra | Mumbai Police Commissioner Sanjay Pandey is on a round to various police stations to review the law and order situation in the city.

    Visuals from Dharavi Police Station pic.twitter.com/aCUKFaL6KZ

    — ANI (@ANI) May 4, 2022 " class="align-text-top noRightClick twitterSection" data=" ">

राज ठाकरेंच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला : मशीदीवरील भोंगे न हटवल्यास मशीदीसमोर हनुमान चालीसा पठण करण्याचे आवाहन राज ठाकरेंनी मनसे कार्यकर्त्यांना केले होते. राज ठाकरेंनी दिलेला अल्टीमेटम संपला असून आजपासून मनसे कार्यकर्ते राज्यभर भोंग्याविरोधात आंदोलन करत आहेत. हनुमान चालीसा प्रकरणावरुन कोणताही अनुचित प्रकार होऊ नये, त्यामुळे राज ठाकरेंचे निवासस्थान असलेल्या शिवतिर्थावर तगडा पोलीस बंदोबस्त लावण्यात आला आहे. मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेऊन आहेत.

काय आहे हनुमान चालीसा प्रकरण - मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी औरंगाबादेत सभा घेऊन मशीदीवर लावण्यात आलेले भोंगे काढण्याचे आवाहन केले होते. याबाबत सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे पालन करण्याचेही त्यांनी बजावले होते. मात्र 3 तारखेनंतर भोंगे न हटवल्यास मनसे मशीदीसमोर भोंगे लावून हनुमान चालीसा पठण करेल असा अल्टीमेटम राज ठाकरेंनी सरकारला दिला होता.

ईदमुळे ढकलली आंदोलनाची तारीख पुढे - राज ठाकरेंनी औरंगाबादच्या विराट सभेत मशीदीवरील भोंगे काडण्याचा अल्टीमेटम सरकारला दिला होता. मात्र मुस्लीम बांधवांचा ईद हा सण 3 तारखेला असल्याने कोणाच्या सणात विघ्न आणायचे नाही, असे स्पष्ट केले होते. त्यामुळे त्यांनी सभेत जाहीर केलेली 3 तारीख पुढे ढकलून 4 तारखेपासून आंदोलन करण्याचे आवाहन केले होते.

हेही वाचा : Loudspeaker Row LIVE Updates : चारकोपमध्ये इमारतीच्या टेरेसवर चढून मनसेचा झेंडा फडकावत हनुमान चालीसा

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.