मुंबई - माजी मंत्री अनिल देशमुख ( Anil Deshmukh ) प्रकरणात सीबीआयने मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे ( Mumbai Police Commissioner Sanjay Pandey ) यांची शुक्रवारी ( दि11 ) सीबीआय कार्यालयात ( CBI ) चौकशी केली आहे. पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्यासंदर्भात तक्रारदारावर दबाव टाकण्याच्या भूमिकेवरून संजय पांडे यांची 6 तास चौकशी झाली असल्याची माहिती सूत्रांकडून मिळाली आहे. माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे सध्या आर्थर रोड जेलमध्ये आहे.
पांडे यांनी परमबीर सिंह यांना तक्रार मागे घेण्यास सांगितले होते. ज्याची तक्रार स्वत: सिंह यांनीही केली होती. सीबीआय कथित पोलीस बदली पोस्टिंग प्रकरणाचा तपास करत असून ज्यामध्ये महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख आरोपी आहेत. अनिल देशमुख सध्या मनी लाँड्रींग बेनामी संपत्तीसह कथित पोलीस बदल्यांच्या प्रकरणात तुरुंगात आहेत. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी मुख्यमंत्र्यांना लिहिलेल्या लेटर बॉम्बमुळे अडचणीत सापडलेले देशमुखांची ईडी मनी लाँड्रिंग आरोपाअंतर्गत चौकशी सुरू आहे. 1 नोव्हेंबरला ईडीने देशमुखांना अटक केली आणि कोठडीत रवानगी केली होती. तेव्हापासून देशमुख आर्थर रोड कारागृहात आहेत.
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर माजी पोलीस आयुक्त परमवीर सिंह यांनी हा आरोप लावल्यानंतर अॅड. जयश्री पाटील यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात यावी यासाठी सीबीआयला तक्रार नोंदवली होती. त्यानंतर सीबीआयने या प्रकरणात दोन जणांना अटकही केली आहे. काही दिवसांपूर्वी जयश्री पाटील यांची सीबीआयने या प्रकरणात जबाब नोंदवला आहे. त्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी पोलीस आयुक्त संजय पांडे यांचा जवाब नोंदविला तर राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहे.
नेमका प्रकरण काय..? - शंभर कोटींच्या वसुलीचे जे आरोप अनिल देशमुख यांच्यावर झाले आहेत. त्या प्रकरणी त्यांच्यावर ईडी आणि सीबीआय यांच्याकडून चौकशी केली आहे. त्यानंतर त्यांच्या निवासस्थानी आणि कार्यालयांवर आयकर विभागाने छापेमारी केली. जून, जुलै आणि ऑगस्ट महिन्यात ईडीने विविध ठिकाणी छापेमारी केली. त्यानंतर त्यांचे स्वीय सचिव संजीव पलांडे यांनाही अटक केली. तसंच कुंदन शिंदे यांनाही अटक केली.
हेही वाचा - Police Transfer Corruption Case : देवेंद्र फडणवीस उद्या सकाळी बीकेसी सायबर पोलीस ठाण्यात हजर होणार