मुंबई - उत्तर मुंबई गुन्हेगारी मुक्त करण्यासाठी पोलिसांच्या सर्व प्रकारच्या समस्या जाणून घेण्यासाठी पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी उत्तर मुंबई येथील विविध पोलिस ठाण्यांना भेट दिली. यावेळी त्यांनी पोलिस उपायुक्त परिमंडळ 12 च्या कार्यालयाच्या नूतनीकरणाचे उद्घाटन केले.
पोलीस उपायुक्त परिमंडळ 12 च्या नूतनीकरणाचे केले उद्घाटन -
उत्तर मुंबई गुन्हेगारीमुक्त करण्यासाठी आणि पोलिसांच्या सर्व प्रकारच्या समस्या जाणून घेण्यासाठी नवनिर्वाचित पोलीस आयुक्त हेमंत नगराळे यांनी उत्तर मुंबई येथील विविध पोलीस ठाण्यांना भेट दिली. या वेळी त्यांनी उपायुक्त परिमंडळ 12 च्या कार्यालयाचे उद्घाटनही केले. यावेळी त्यांच्या सोबत उप आयुक्त डी. एस. स्वामी, पोलीस सह आयुक्त विश्वास नांगरे पाटील सुद्धा उपस्थित होते. या उद्घाटनानंतर त्यांनी नूतनीकरण करण्यात आलेल्या अद्यायावत पोलीस उपायुक्त कार्यालयाची पाहणी केली. यावेळी त्यांनी सहकार्यांशी वेगवेगळ्या विषयांवर चर्चा केल्याचे समजते आहे.