ETV Bharat / city

मुंबईत १ कोटीच्या अमली पदार्थासह महिलेस अटक

मुंबईच्या डोंगरी भागात राहणाऱ्या एका महिलेकडून तब्बल १ कोटी रुपयांचे अमलीपदार्थ जप्त करण्यात आले आहे. या कारवाईत पोलिसांनी रोख ८ लाख रुपयेही जप्त केले आहेत.

author img

By

Published : Dec 14, 2020, 7:50 AM IST

Updated : Dec 14, 2020, 9:22 AM IST

१ कोटीच्या अमली पदार्थासह महिलेस अटक
१ कोटीच्या अमली पदार्थासह महिलेस अटक

मुंबई - शहरासह बॉलिवूडमध्ये अमलीपदार्थ विरोधी विभागाकडून कारवाई होत आहे. त्याचप्रमाणे मुंबई पोलिसांच्या अमली पदार्थविरोधी पथकाने मुंबईतील डोंगरी परिसरातून एका महिलेला अमली पदार्थ तस्करी संदर्भात अटक केली आहे. या कारवाईत तिच्याकडून एक कोटी दहा लाख रुपयांचे एक किलो हून अधिक वजनाचे एमडी अमली पदार्थ जप्त केले आहे.

अमली पदार्थांसह 8 लाखांची रोकड जप्त-

या आरोपी महिलेकडून आठ लाख रुपयांची रोकड अमली पदार्थ विरोधी पथकाने जप्त केलेली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव सनम तारीख सय्यद (25) असून ही महिला गेल्या काही महिन्यांपासून डोंगरी परिसरामध्ये अमली पदार्थाची तस्करी करत होती. अमली पदार्थविरोधी पथकाने मिळालेल्या गुप्त माहितीवरून सदरच्या महिलेला ताब्यात घेऊन तिची झडती घेतली असता, तिच्या ताब्यातून 80 ग्रॅम अमली पदार्थ मिळून आले होते. त्यानंतर डोंगरी परिसरातील तिच्या घरी छापेमारी करण्यात आली. यामध्ये या महिलेच्या घरातून एक किलो एमडी अमली पदार्थ जप्त करण्यात आले. तसेच आठ लाख रुपयांची रोकड पोलिसांनी हस्तगत केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात जप्त करण्यात आलेल्या अंमली पदार्थाची किंमत ही 1 कोटी 10 लाख रुपये असल्याचे समोर आलेल आहे.

१ कोटीच्या अमली पदार्थासह महिलेस अटक

डोंगरी परिसरात असलेल्या इतर ड्रग्स पेडलरला अमली पदार्थ पुरविन्याचे काम ही महिला करत असल्याचे पोलिसांच्या तपासात समोर आले आहे. या अमली पदार्थांच्या तस्करीत आणखीन किती जण सहभागी आहेत, याचा तपास पोलीस करीत आहेत.

मुंबईत एलटीटी स्थानकावरूनही एनसीबीने जप्त केले ड्रग्ज-

एनसीबीकडून एलटीटी रेल्वे स्थानकावर 6 किलो 600 ग्रॅम चरस जप्त करण्यात आला. त्यानंतर या प्रकरणी आफताब शेख (28), सबीर सय्यद(30) आणि शमीम कुरेशी या आरोपींना अटक करण्यात आली आहे. अटक आरोपी हे कुर्ला परिसरातील रहिवाशी असून त्यांनी आणलेले चरस हे काश्मीरवरून आणले होते. या संदर्भात एनसीबीकडून अधिक तपास केला जात आहे.

Last Updated : Dec 14, 2020, 9:22 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.