मुंबई: प्राप्त माहितीनुसार 15 दिवसाच्या चिमुकल्या मुलीला विकण्याचा प्रयत्न करणाऱ्या ( illegal trafficking of a 15 day old girlchild) दोन महिलांना पोलिसांनी अटक केली ( arrested two women) असुन त्या चिमुकलीची सुटका करण्यात आली आहे. त्या महिला वरळी आणि गोवंडी भागातील रहिवासी आहेत. पुण्यातील एका जोडप्याने काही महिन्यांपूर्वी दत्तक केंद्रात जाऊन मुल दत्तक घेण्यासाठी अर्ज केला होता. त्यांना मोबाईल फोनवर एक मेसेज आला त्यात म्हणले होते की, एका महिलेला कायदेशीर औपचारिकता पूर्ण न करता, नवजात मुलगी 4.5 लाखात द्यायची आहे जर तुम्हाला हे बाळ हवे असेल तर संपर्क साधा.
त्यानंतर त्या व्यक्तीने काही गैरप्रकार होत असावा अशी शंका आल्या मुळे त्याने या संदर्भातील माहिती पुण्यातील महिला व बालकल्याण आयुक्तांच्या कार्यालयात दिली. हे मेसेज मुंबईतून आल्याचे प्राथमिक तपासात समोर आले, या प्रकरणाची चौकशी करण्यासाठी शहरातील समाजसेवा शाखेला सतर्क करण्यात आले. माहिती मिळाल्यानंतर, पोलीसांनी स्वत: एका महिला कॉन्स्टेबल आणि पुरुष पोलिस अधिकारी यांचा समावेश असलेली एक टीम तयार केली आणि आम्ही भावी पालक असल्याचे भासवत आरोपीशी संपर्क साधला आणि एक नवजात मुलगी दत्तक घ्यायची आहे असे सांगितले.
दूरध्वनी संभाषणानुसार आरोपींनी त्यांना सायन कोळीवाडा येथील नर्सिंग होममध्ये भेटण्यास बोलावले. आरोपीने साडेचार लाखांची मागणी केली आणि दावा केला की ती बाळाच्या वास्तविक पालकांना ते 4 लाख रुपये देणार आहेत तसेच 50 हजार रुपये स्वत: ठेवणार आहेत. त्यानंतर पोलिस अधिकाऱ्याने सायन कोळीवाड्यातील नर्सिंग होमला भेट दिली आणि जेव्हा आरोपींनी बाळाला दिले तेव्हा त्या दोघींना लगेच पकडण्यात आले. आधिक तपासात हे समोर आले की, ती मुलगी दिल्लीतील एका जोडप्याची होती. ज्याने तिला एक आठवड्यापूर्वी बाळ विकण्यासाठी दिले होते.