मुंबई : गॅरेजमध्ये उभ्या असलेल्या कारची नंबर प्लेट विकून चोरलेल्या कारमध्ये खोटा चेसीस नंबर टाकणाऱ्या टोळीचा गोरेगाव पोलिसांनी Mumbai police arrested 7 car thieves पर्दाफाश केला. चोरीच्या कारचे चेसीस क्रमांक selling stolen cars by changing chassis number आणि इंजिन क्रमांक असलेले डुप्लिकेट आरसी बुक विकणाऱ्या कार चोर टोळीतील ७ जणांना मुंबई गोरेगाव पोलिसांनी Mumbai Goregaon Police arrested seven car thief अटक केली आहे. पोलिसांनी आतापर्यंत 5 गाड्या जप्त केल्या Mumbai Police seized stolen cars असून अन्य मुख्य आरोपींचा शोध सुरू आहे. चोरीतील एका कारचे ट्रॅफिक चालान आल्यानंतर हे प्रकरण उघडकीस आले आहे. stolen car thief arrested in mumbai
कारची नंबर प्लेट, इंजिन क्रमांक बदलायचे - गोरेगावचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक दत्तात्रय थोपटे यांनी दिलेल्या माहितीनुसार, गोरेगाव येथील रहिवासी असलेल्या फिर्यादीने सचिन विमा कंपनीकडून ऑक्सनची कार विकत घेतली आणि ती गोरेगाव येथील कार मेकॅनिकला बनवण्यासाठी दिली; परंतु कार मेकॅनिकने त्याच्या साथीदारांसह अशीच एक कार चोरली ज्यामध्ये फिर्यादीच्या कारची नंबर प्लेट आणि फिर्यादीचा इंजिन क्रमांक व चेसीस नंबर बदलला. यानंतर नाशिकमध्ये कारची विक्री केली. चोरीच्या गाडीवर ट्रॅफिक चालान येऊ लागल्याने गाडी गॅरेजमध्ये असताना चालान कसे येणार असा प्रश्न फिर्यादीला पडला. याबाबतची तक्रार गोरेगाव पोलिसांकडे देण्यात आली.
असे फुटले चोरीचे बिंग- पोलिसांनी या प्रकरणाचा तपास केला असता कार पार्क केलेली आढळून आली. गॅरेज आणि अशाच दुसर्या एका कारचे लोकेशन ट्रेस केले असता, दुसरी चोरीची कार ओशिवरा परिसरात चालत असल्याचे आढळून आले. यानंतर पोलिसांनी तात्काळ कारवाई करत गॅरेज मालक आणि चोरीची कार ताब्यात घेतली. गोरेगाव पोलिसांच्या तपासात असे आढळून आले की, गॅरेज मेकॅनिक आणि त्याच्या इतर चोरट्यांनी मिळून गॅरेजमध्ये जी कार आली होती तीच चोरली आणि नंतर त्याची नंबर प्लेट आणि पार्क केलेल्या कारचे इंजिन नंबर लावून ती विकली. गोरेगाव पोलीस याप्रकरणी अधिक तपास करीत आहे.