मुंबई - राईस पुलरच्या नावाखाली 12 जणांना 2 कोटी रुपयांना चुना लावणाऱ्या 5 जनांच्या टोळीला मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच 11 ने अटक केली आहे. मुंबईतील मालाड परिसरात एका बंगल्यात कहाणी इसम कॉपर इरेडियम या दुर्मिळ धातूचा वापर करून राईस पुलरचे सर्वेक्षण करत असल्याची माहिती मुंबई पोलिसांच्या क्राईम ब्रँच युनिट 11ला मिळाली होती. 3 ओक्टॉबरला पोलिसांनी मालाड पश्चिम येथे एव्हरशाईन नगर या ठिकाणी छापा मारून 5 आरोपीना मुद्देमालासह अटक केली आहे. अटक आरोपींकडून पोलिसांनी इलेक्ट्रॉनिक इक्युपमेंट, वेगवेगळ्या कंपन्यांची कागदपत्रे, शिक्के, ओळखपत्रे, केमिकल्स बॉटल, मोबाईल फोन हस्तगत केला.
काय आहे राईस पुलर -
अटक करण्यात आलेल्या 5 जनांच्या टोळीने राईस पुलर या पद्धतीचा वापर करून आपण संशोधन करत असल्याचे काही जणांना भासवले होते. कॉपर इरेडियम या धातूचा वापर अंतराळात सोडण्यात येणाऱ्या सॅटेलाइट, लॉन्च व्हेईकल मध्ये करण्यात येतो. त्याची मोठी मागणी असल्याचे ही टोळी भासवत होती. या साठी या टोळीने Franklin power material center व supremo international centre या बनावट कंपन्या स्थापण करून त्यांची वेबसाईट सुद्धा सुरू केली होती. कॉपर इरेडियमने तांदळाचा एक तुकडा 1 इंचावरून स्वतःकडे खेचल्यास त्याची किंमत प्रति नग 5 हजार कोटी मिळत असल्याचे आरोपी गुंतवणूक दारांना सांगत होते.
कॉपर इरेडियम मध्ये अल्फा बीटा, गॅमा सारखी किरणे उत्सर्जित व आकर्षित करण्याचे नैसर्गिक गुणधर्म असल्याने त्याचे परीक्षण तांदळात असलेल्या गुणांमुळे केले जाऊ शकते. मात्र, आतापर्यंत टप्याटप्यात करण्यात आलेल्या संशोधनाला भारताच्या डीआरडीओ व रक्षा मंत्रालयाने मान्यता दिली असल्याचे ही टोळी बनावट कागदपत्रांच्या आधारे दाखवत आली होती. संशोधन पूर्ण झाल्यावर Franklin power material center व supremo international centre सारख्या कंपनी या हे कॉपर इरेडियम विकत घेतील. यातून संशोधनात पैसा गुणविणाऱ्या गुंतवणूक दारांना शेकडो कोटी रुपये मिळतील असे आमिष ही टोळी दाखवत होती. मुंबई, नवी मुंबई, ठाणे, सातारा, सांगली, पुणे सारख्या शहरातील 12 जणांना या टोळीने 2 कोटींना चुना आतपर्यंत लावला आहे. विकास कानेश्वर सिंग (49), कलीम निजाम शेख (38), विप्लब हारान डे (40) साजिद अल्लाखी शेख (48), शिवाजी विनयशंकर तिवारी (32) या आरोपीना अटक करण्यात आली आहे.